[ १०२ ]
शके १६५६ फाल्गुन वद्य १४.
श्री.
राजा शाहु नरप-
ति हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
मा। धाग राऊत गणराऊत शिंदे भंडारी पा। का। बहादरपूर यांस:-
बाजीराव बल्लाळ प्रधान. सु॥ खमस सलास सलासिन मया अलफ. तुमचेविशीं रा। अंताजी रघुनाथ सरदेशाई व सरदेशपांडे प्रा। फिरंगाण यांणीं हुजूर विदित केलें. त्याजवरून, सविस्तर कळलें. ऐशास, तुह्मीं मा।रनिलेशीं बोली केली; त्याप्रों। कार्यभागास सिध होऊन निष्ठापूर्वक करणार. बहुत उत्तम आहे. कार्यभाग जालियावर तुह्मांस मांव दिल्हा जाईल. आपला खातरजमा असों देणें. मारनिले सांगतील त्याप्रों तुमचें उर्जित केलें जाईल. जाणिजे. छ. २७ सवाल.
लेखन
सीमा.