[ १०१ ]
शके १६५६ फाल्गुन बा। १४.
० श्री ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
मुख्य प्रधान.
मा। तुंगचोरघा पा। खोचीवडें व पापडी शिंदे भंडारी यांस :--
बाजीराव बल्लाळ प्रधान. सु॥ खंमस सलासीन मया अलफ. तुमचें वर्तमान रा। अंताजी रघुनाथ सरदेशाई यांणी कुलवृत्त विदित केलें त्याजवरून कळलें. ऐशास, तुमची बोली मारनिलेशीं जाली. धर्मरक्षणास तुह्मी सिद्ध आहां. तदनुरूपच ईश्वर मनोभीष्ट सिद्धीस पावील. चिंता न करणें. तुमचें ऊर्जित मा।रनिले सांगतील त्याप्रों। केलें जाईल. छ. २१ सवाल.
लेखन
सीमा.