लेखांक २०३
श्री १६२७ चैत्र वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी पा। वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे पा मजकूर हा गाव राजश्री सदानंद गोसावी याच्या मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून हुजूर विदित जालें तरी हे दराहा वर्तणूक स्वामीस मानत नाही हे जाणून याउपरी मौजे मजकुरास एकजरा उपसर्ग न देणे मठाकडे इनाम सुरळीत चालो देणे फिरोन बोभाट आलीया स्वामीस मानणार नाही जाणिजे लेखनालंकार
रुजू सुरनिवीस
सुरु सूद बार