[ ९९ ]
श्री. शके १६५६ भाद्रपद शुद्ध ८.
राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित राणोजी शिंदे दंडवत विनंति येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. सांप्रत तुह्मांकडू ( न ) कागदपत्र येऊन वर्तमान कळत नाही. येथू (न) काशिदाची जोडी पेसजी रवानगी केली आहे, ती पावलीच असेल. हाली श्रीमंत राजश्री राउप्रधान यांकडून पत्रें नवाब अमीरलुमराउ यांसि थैल्या आल्या त्या बजिन्नस तुह्मांकडे पाठविल्या आहेत. त्यांस प्रविष्ट करून आपले कार्यभाग उरकून शीघ्रवत् आलें पाहिजे. छ. ६ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मोर्तब
सुद.
पो छ० १४ जमादिलाव,
संदोसरीं आला.
श्री
जोतीस्वरूपचरणीं तत्पर
जनकोजीसुत राणोजी सीदे
नीरंतर.