लेखांक २०५
श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३२ पार्थिवनाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री माणको गोविंद यासी आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रात वाई हा गाव श्री सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून विदित जाले तरी गोसावीयाचे (इ) नाम गावास उपद्रव द्यावा ह्मणजे काय याउपरी त्या गावाचे वाटे नव जाणे बोभाट आलीय ताकीद होईल जाणिजे लेखनालंकार
रुजु
सुरुसुद बार