लेखांक २०४
श्री १६२७ श्रावण वद्य ९
सदानंद
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अनाजी जनार्दन सुभेदार प्रा। वाई गोसावी यासी
सेवक परसराम त्र्यंबक प्रतिनिधी नमस्कार सु॥ सन सीत मया अलफ श्री मु॥ निंब बहुत जागृत स्थल आहे त्यास नैवेद्य व दीपास जमीन नेमून देविली पाहिजे ह्मणून रा। रगोजी गुड याही विनतीपत्र पाठविले त्यावरून का। मजकूर पैकी जिराईत जमीन पड पैकी अवल दूम सीम या प्रतीची बिघे चार देविली आहे तरी तुह्मी नेमून देऊन प्रतिवरुसी चालवणे ताजा सनदेचा उजूर न करणे तालिक लिहून घेऊन असल पत्र भोगवटीयास देवाचे पूजकापासी देणे जाणिजे छ २२ रबिलखर निदेश समक्ष
राजते
लेखना सुरुसुद बार
वधी