[ ९८ ]
श्री. शके १६५६ श्रावण-भाद्रपद.
राजश्री सुभेदार गोसावी यांसीः-
॥ अखंडितलक्ष्मीआंलकृत राजमान्य स्नो। अंबाजी त्र्यंबक आशीर्वाद. विनंति उपरि. रा। संभाजीबावांस वाताची वेथा जाली होती. हातापायास जीव नव्हता. अंग थंड पडत होतें. त्यास, तुह्मी अवशध उपाय केला, हें वर्तमान ऐकिलें. त्यास, आह्मांसही तैसेंच जालें. डावा पाय व डावा हात बाहीस अगदीं निश्चेष्टित जाली. तर ज्या वैदांनीं र॥ संभाजीबावांस वोखद दिल्हें असेल, तो वैद्य पाठवून दिल्हा पाहिजे. अगर तुमच्याच उपायानें बरें जालें असलें तर वोखद व अनुपान पथ लिहिली पाहिजे. आणि वोखद लौकर मकाजी बा। पाठविलें पाहिजे. बहुत काय ।ला। ? लोभ असो दीजे. हे विनंति.