Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
नकल
शके १६६६ अधिक आषाढ शुद्ध १३
पु॥ राजश्री दामोदर महादेव उगो॥ यासी :-
उपरी तुह्मांस दिल्लीस जावयास निरोप दिधला ते समयीं दोन पोरी खुबसुरत दहा दहा वर्षांच्या हिंदू खरेदी करून पाठवाव्या ह्मणोन आज्ञा केली असतां तुह्मी पाठविल्या नाही. याउपरी तरी स्मरण पुरःसर दोन पोरी खुबसुरत चांगल्या खरेदी करून पाठवणें. हैगै न करणें. जाणिजे. येथून खासखत अती चांगल्या, जातीनें हिंदु, शुद्ध, वर्षे दहा, याप्रकारच्या, जरूर पाठवाव्या. पाठवितेसमयीं अति लिबासानें न पाठवणें. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३५
जवाब आनंदगीर बावा गोसावी साहेब सलामत
.ll मोहीदानपन्हाई मुखलिसान दस्तगाही अजी बुर्हानखान सेखदार सलाम बादज सलाम येथील खैरसला जाणोन तुह्मी आपली खैरसला दरवखत लिहीत जाणे गावास तुह्मास साहेबी कौल दिल्हा त्याप्रमाणे तुह्मी झाडा केला त्यावरी देसमुख देसपाडे याणी आणीख रु॥ ५० घातले ऐसीयास आह्मी साहेबासी रदबदली बहुत केली आणि रु॥ २० आणीख करार केले बाकी रु॥ ३० तुह्मास सोडविले आह्मास ऐसे जाले की इकडे साहेब राखावा इकडे यास राखावे इकडे तुह्मास राखावे ऐसे जाले ह्मणौन ऐसा करार केला की आता तुह्मी मागे दिल्हे समेत करोड रु॥ २५ दिल्हे व हाली रु॥ २० ऐसे रु॥ ४५ जाले इतक्यावरी हे साल वारले आता पुढे पुढले सालास तुह्मी येथे येणे आणि हजरती साहेबाची भेटी घेऊन आपला खड करून जाणे मालूम होय (फारसी शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३४
जोगींद्रगिरी गोसावी मो। नीब दाममो।
(शिक्का)
मुरवतशाही माहदतअसारी अजी मोहीद सिताबखान नाईकवाडी किले सतारा सलाम मकसूद ऊ की तुह्मी मौजे सेखरमधे इनाम पाहिजे होते त्याविशी व मठ सेखरेमधे केशवगिरीस बाधोन देणे व पसकी इजार करू न देणे ह्मणे तरी बरे दसरा दिवाली जाहलिया हरएक विले करून देऊन तुमचे हातरोखे होऊन सांडिले व सांडिता आह्मी काही मना केले नाही जानिजे व वरियाचे इनामविखी लिहिले तरी आह्मी तरी इनाम दिल्हा स्वये कस सागण ह्मणे तरी ते आलिया सांगोन जाणिजे तुह्मी अमीन असा जाणिजे आह्माकरिता तुमचे कामास तकसीर न व्हे ऐसे जाणिजे सवाईचे अमल आपणाकरिता तकसीर करणार नाही
(शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३३
श्रीगुरुमूर्तिप्रसन
सकलतीर्थस्वरूपअखंडितगुरुराज प्रसन माहाराज राजश्री जोगींद्रगिरी स्वामी गोसावियासि
बालके नरसो रामाजी देसकुलकर्णी किले पनाले सिरसास्टाग नमस्कार विनंती येथील क्षेम जाणुनु गोसावियानी स्वक्षेम कळ्याण पाठविले पाहिजे त्यावरी माहाराजानी राजश्री हाती आसीर्वाद सागोन पाठविला तेणेकरिता बहुत सतोश पावलो ते श्री स्वामी जाणे व गोसावियानी निरोप सागोन पाठविला की श्री स्वामीचे नदादीपाकारणे मौजे अबवडे का। बाळाघाट हकपैकी ऐवज करून दिला होता त्यासी गावकरानी अजनु काही दिल्हे नाही ह्मणे तरी त्यासी ताकीद करून रोखा पाठिविला असे गावासी पाठऊन बेमुलाहिजा पैकी त्यापासी घेतला पाहिजे व येविसी आमचे मुतालीक अतो सबाजी का। दावरघाट त्यासी कागद पाठिविला असे तो पावतो करणे आह्मी मागुते त्यास लिहून पाठवितो व स्वामीयानी चौकाल आमचेविसी श्री स्वामीस विनती करून बालकावरी क्रुपाद्रिस्टी पूर्ण करविले पाहिजे स्वामीचे व गोसावियाचे आधारे असो आमचे आठवणेसी अतर पडो ने दीजे क्रुपा निरतर असो दीजे हे विनंति
हे चि समस्त गुरुबालक गोसावियासि नमस्कार व कइलासगिरीस नमस्कार क्रुपा असा दीजे हे विनंती
हे चि भागीर्थीबाई गोसाविणीस नमस्कार क्रुपा असो दीजे विनंति
हे चि राजश्री मनसागीर गोसावियासी नमस्कार क्रुपा असो दीजे विनंति
विनंति लक्ष
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीशंकर पौ॥ छ २२ रबिलाखर
शके १६६६ वैशाख वद्य १
श्रियासह चिरंजीव राजश्री बापूस महादजी गोविंद अनेक आशीर्वाद उपर येथील कुशल ता। छ १३ माहे रा।वल मुक्काम इंद्रप्रस्त जाणोन स्वक्षेम लिहिणें. विशेष. फार दिवस जाले, तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. यास्तव, रात्रंदिवस चित्त सापेक्षित आहे. वरचेवर वर्तमान लेहावयास आळस नकरणें. इकडील वर्तमान तरः- पूर्वी तीन जोड्या तुह्मांकडे रवाना केल्या. सविस्तर वर्तमान लिहिले आहे, त्याजवरून विदित जाहालें असेल. सांप्रतचें वर्तमान श्रीमंत स्वामींचे सेवेसी लिहिलें आहे, त्याजवरून विदित होईल. इतके दिवस तों रघोजीच्या भेटीकरितां व गयेहून स्वार जाल्यावर, कितीका शहारोशहरीच्या जागा मारल्या व खंडण्या घेतल्या. कितीका भल्या माणसांनी कबिलेसुद्धां जोहार केले; वेगळिया गढीसी झुंज केलें. यास्तव जनामध्यें विरुद्धताच भासली. सार्वभौमासहि लोकांनीं नानाप्रकारें विरुद्धच जाणविली. इतक्यांत, समाचार आला कीं.:- माहामत जंगासी व श्रीमंत स्वामीसी भेटी जाल्या; स्नेह शपथपूर्वक जाला; श्रीमंत खजीन्याचीहि ताकिद केली व रकारनामकाचे पारपत्यासही सिद्धता केली आहे. ऐसें वर्तमान आल्यावर, पादशहास व वजिरास कांहजींक भरोंसा जाला आहे की, बाळाजीराव एकनिष्ठ आहेत; रघुजीस तंबी करतील. ऐसा विश्वास आला आहे. जे कोण्ही अन्यविचार भासवीत होते ते शरमिंदे जाले, फजित पावले. ईश्वरइच्छेने आजपावेतों रकारनामकाचें पारपत्य जालें असेल, इतकेच वर्तमान आलें. व खजाना येतो, इतकें पत्र मुरीदखानाचें पावलें, ह्मणजे केल्या कर्माचे सार्थक जालें, श्रीमंताचा मुजरा जाला, इतबारहि वाढला. हें वर्तमान सत्वर आह्मांस पावें तें करणें, चिरंजीव दामोदरजीनीं चांदोरीचें वर्तमान लिहिलें होते, तें पत्र बजिनस तुह्मांपासी पाठविलें आहे, त्यावरून विदित होईल. प्रस्तुत तर, चांदोरीच्या कामाचा बंद न बसला. ईश्वरइच्छेनें श्रीमंत साहेबहि त्या प्रांतांस येतात. आह्मी येऊ. सर्व कार्यसिद्ध होईल. चिंता न करणें. देशास जावयाचा हेत अहे. तुमची कुशालीची पत्रें चित्तानरूप आलीं ह्मणजे स्वार व्हावयाची पैरवी करून. चित्तांत आहे कीं, वैशाख वदेंत मातुश्रीस पुढें स्वार करावें; मागून आपणहि उदेग करावा. एक हेत आहे. ऋणानुबंधे पाहावें कैसा योग घडूत येतो ? भाईभटहि वैशाखशुद्धांत दिल्लीस आले. मातुश्री बराबर माग्तां देशास रबाणा करावे, ऐसा हेत आहे. वोडशेकरानें मल्हार कृष्णास दगा करून मारिलें; नागो महादेऊ व अंताजी कृष्ण वगैरे दाहापाच ब्राह्मण व शेसवासे माणूस बारगीर व पोरगे, चाकर नफर कुल कापून काढले. धोडीं पिढीं मालमत्ता लुटिले. झांशीस वेढा घातला आहे, पर्वतावर धोंडो दत्ताजी आहे, तो तोफा सेडितो. रंतु बाहेरून कुमक पोहचत नाहीं. पाहावें, काय होईल ! गोविंदराऊ सखाजीचें पत्र एतद्विषयीं आलें होतें, तें बजिनस पाठविलें आहे; त्यावरून, व श्रीमंतास लिहिलें आहे त्यावरून, सविस्तर वृत कळेल. गोविंद सखाजीच्या पत्रीं व बाळाजी मोरेश्वराच्या पत्रीं तों परिच्छिन्न लिहिलें आहे कीं, मल्हारपंताचा पुत्र व जांवाई हीं दोन्ही मुलेंहि वोंडशांतच होतीं, त्यांसहि जिवें मारिलें. ह्मणून लिहिलें आहे. व पिलाजी जासुद-पंधरा दिवस जाले कीं-बाडशाहून आला तो जबानी सांगत होता जे, मल्हारपंत वोंडशांत होते व खंडोबा व मल्हारपंताचा जावाई झांशीच्या किल्यावर आहे. ऐसें सांगत होता, याजवरून कांहीक उमेदशी जाली कीं, जर किल्यावरच हें दोन्हीं मुलें असतील तर वांचलीं असतील. ह्मणोन पिलाजी जासूद मागती झांशीस पाठविला आहे. जर त्या मुलाचें आयुष्य बलवत्तर आहे, व पोरीचें सौभाग्य दृढ आहे, तर कुशल वर्तमान येतच आहे; त्याचक्षणीं तुहांस लेहूं. नाहीतर; सर्वस्वें घात तो जाला !
*****ची हळहूळ प्राप्त जाली. अद्यापि हें वर्तमान मातुश्रीस कळूं दिधलें नाही. परंतु कोठवर लोपवावे ? दोन च्यार दिवस आगें मार्गे कळेलच. शोकार्णवांत बुडाले. भगवत इच्छा प्रमाण ! कोण्ह्याहि राजाने असा घात व दगा श्रीमंताचे लोकांशी केला नव्हता, ऐसा वोंडसेकराने केला. एक झांशीच्या पर्वतामुळें इतकें जालें ! त्याचें पारपत्य करणार श्रीमंत समर्थ आहेत. काळेंकरून सर्व होईल. परंतु मल्हार कृष्ण अर्थे प्राणें लेंकरांबाळांसी स्वामीकार्यावर मारला गेला ! तव्हडें मूल तरी प्राणें करून वांचलें असलें तर कृतार्थ मानू. जो समाचार येईल तो लिहून पाठवून. * हा आशीर्वाद.
राजश्री वेणाजी पंतास नमरकार उपर. लेहलें परिसोन वर्तमान वरचे वर लिहिणें. हे विनंति.
उभयथा स्वामींचे पोष्यें त्र्यंबक मलारी साष्टांग नमस्कार विनंति लिखितार्थ परिसोन दया निरंतर असो . हे विनंति. पै॥ छ २२ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३२
देसमुखानि व देसपांडिया पा। वाई सरकार पनाला सुबे दारुलजफर बिजापूर विदानद अहमद पटेल कसबे वाई याचे हकीकत तुह्मी जाहीर केले की कबील हरएक कामाचा आहे पादशाही काम त्याचे हातीने होईल बीलफैल नातवान पोटास नाही हैरान हे रोशन आहे त्याचे पोटाचे फिकीर केल्या पादशाही काम करील त्यास आदलखानीयाचे वखूती एक चावर इनाम जमीन होते हाली त्याचे इनाम चालविल्या खातिरेजमासी गावीचे आबादी करून किफायत सरकारचे करील ह्मणोन जाहीर केले बनजर किफायत पादशाही आबादी कसबे मजकूर पटेल मजकुरास खेरीज काबील जिरायत अल्फादे जमीन बिघे २० बीस बिघे दिले असे जे जमीन मजकूरचे अनाज कुत करून गावीचे आबादी करून जमा कामील कसबे मजकूर पोचाऊन दौलतखोही जाहीर करी सदरहू जमीन चालवणे तारीख १५ चमाहे रबिलोवल सन ४१ जुलूसवाला (फारसी शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥ शके १६६५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री महादेवभटजी स्वामी गोसावी यासी:-
पोप्य रामाजी मल्हारी कृतानेक दंडवत प्रो। विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपणाकडील बहुत दिवस पत्र येऊन वृत्त कळत नाहीं. तर ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवून कुशलवृत्त लिहीत गेलें पाहिजे. आपण श्रीमंतास पत्र पाठविलें, त्यावरून अर्थांतर कळों आलें. इकडील वर्तमान तरी, नबाब अबदुलअजीजखान याच्या पारपत्यानिमित्य संगमनेरास आले. यास अबदुल अजीजखान सलाबतखान उजनेस गेले. त्या उपरी सोभागसिंग पेठकरी याचे लबाडीवरून किल्ले बितिंगियास वेढा बसविला आहे. किल्ला अजी पंचवीस रोज उत्तम प्रकारे भांडत आहे. किल्ला इतके दिवस नबाबाचे सलाबती खालीं टिकावा, नबाबाच्या फौजेसी लडाई करावी, ऐसा नव्हता. परंतु ईश्वरास नवाबाचा गर्व उत्कर्श न साहे. याजकरितां श्रीमंतांचे प्रतापें करून किल्लेकरी हिंमत धरून झुजत आहे. पुढें होईल वृत्त तें आपणास लेहून पाठवूं. सारांश बिर्तीगकरांनी शर्त केली ! नवाबांनीं किल्ला घेतला तरी, नवाबाची तरीफ नाहीं, व यांची अपकीर्ति नाहीं ! रा॥ धोंडो गोविंद विवेक-गोड गोष्टी सांगून करावयास गेले आहेत. होईल वृत्त ते लिहून पाठवून. तुह्मी पर्जन्य-कालीं येऊं लागल, तेव्हां चंदेरीकडील ताट १ व वाट्याचे जोड २ रुप्याचे घेऊन येणें. पैका देऊन. व उंटीण एक आणिली पाहिजे. बहूत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६६५
राजश्री बाळाजी पंडित प्रधान दाजी गोसावी यांसी:--
सकल गुणाळंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्रे॥ मानाजी आंगरे वजारतमाब राम राम विनंती उपरि येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस कृपापूर्वक पत्र ये ऊन सांभाळ होत नाही, या वरून चित्त सापेक्षित असे तरी ऐसी निर्माया नसावी. आह्मी कायावाचामने करून आपली जोड केली आहे; दुसरा विचार नाही. राजश्री तुळाजी आंगरे सरखेल याजकडेस आह्मांकडील अपरिचय असतां त्याणीं पत्र पाठविलें; तें आपणांकडेस पाठविलें होतें. आज्ञा जाहली त्या प्रो। राजश्री साबाजी प्रभूनें लिहून पाठविलें. यावरी उत्तरच पाठवावें तर तेथील हरद्र कैसें कळेल ? ह्मणोन पांडुरंगजी ह्मणोन कारकून रवाना केले जाऊन + + + + + पत्रान्वयें कितेक बोलणें तें + + + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ।। शके १६६५ मार्गशीर्ष शुद्ध १४
राजश्री माहादेवभट गोसावी यासीः-
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्रे॥ मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील क्षेम जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मी गेलियावर हाकालपरियेंत. झाडियांनसी रुपये न पाठविले; उत्तम न केलें. एक लक्षाची हुंडी मात्र पाठविली. बाकी सवादोन लाख राहिले. ते अतिसत्वर पत्रदर्शनी झाडियनसी घेऊन येणे, येविशई क्षणाचा विलंब न करणें. बहुत काय लिहिणें ? छ१३ सवाल हे विनंति. आह्मी या प्रांतें आलों. मागें सवाई येणार ह्मणून वार्ता आहे; व नबाब खानदौराही तिकडे आहेत. त्यांचे वृत्त रोज रोज जे जे वार्ता तहकीक आणून लिहित जाणें. खबर दररोज येऊन पोहचे, तें करणें. येविसीं तुमच्या भरवशानें असों. हे विनंति.
(लेखनसीमा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २३१
सदानंद
.ll मोकदमानि मौजे गोवे प्रती दत्ताजी नाईक देसाई पा। वाई लेहवया कारणे श्री गोसावियाचे मठासी तुह्मी कुसूर करिता ह्मणौऊन तुह्मास आह्मी आपणाहुजूर सागीतले असोना मागते कुसूर करिता हे तरी काही बरवे नव्हे बोवाचे मठासी कुसूर करणे हे काही तुह्मास बरवे नव्हे आता मठासी कुसूर केला ह्मणिजे तुह्मास जड जाईल आमचे सागीतले नाइकले आणि गोसावियाचे मठासी कुसूर करणे वाजीब तव नव्हे अजीपासून कूसूर न कीजे