लेखांक २४७
श्री
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख व देशपांडीये पा। सुपे गोसावी यासि
स्नेहांकित दत्ताजी राम वकील व माणकोजी गोविंद आशिर्वादपूर्वक नमस्कार विनंती उपरी येथे आनंदगीर गोसावी याचा एक सिस्य रा। खंडोजी राजे भोसले याचे खुर्दखत निजामशाहचे वेळचे घेऊन आला आहे त्याचे विशई आह्मास रा। रौद्रराव यानीही सागितले आहे तरी आनदगीर याचा इनाम मौजे मुजेवाडी पा। मजकूर येथे चार चावर तहकीक आहे भोगवटा पडिला आहे ऐसे तुह्मास तहकीक ठाऊक असले तुह्मी वतनदार आहा तहकीक करून एक अर्जदास्ती रा। राऊसाहोस पाठवणे व एक पत्र आह्मास लेहून पाठवणे आपणही रा। राऊसाहेबास लिहिले आहे त्याचे आज्ञापत्र येईल तेणेप्रमाणे वर्तणूक करणे तोवरी गोसावी गावावरी लावणी करील तरी सुखे करू देणे जरी इनाम चालवा ह्मणऊन आज्ञा आली तरी चालवणे पत्र नये तरी लावणीप्रमाणे वसूल घेणे जैसी हकीकत असल तैसी बयानवार लेहून पाठविणे रा। छ १३ माहे रमजान