लेखांक २४६
श्रीसकलतीर्थरूप राजश्री आनंदगीर बावा मोकाम नीब यासी
बाळके नरसोजी नाईक व राणोजी नाईक पिसाळ देसमुख प्रा। वाई चरणा मस्तक ठेऊन सिरसा। दंडवत उपरी कृपा करून आंबे पाठविले परंतु बावाचा भंडारा कधी जेवला नाही तुह्मी आह्मास जैसे सदानंद आणि कृस्णा असे तुह्मी आह्मास जे गोस्टीस अंतर पडेल ते चालवीत गेले पाहिजे आमचे मायबाप आहा मी काय माहाराजाचे चरणराज आहे जे घडीस चाकरी फर्मावाल ते घडी हाजीर आहे अवंदा आंबे काही मजला खायास मिलाले च नाही बावाजीने जेव्हडे दाहावीस पाठविले ते च तरी बालकास आणखी पाठविले पाहिजे मायबाप आहा ह्मणून नेणतपणे लिहितो कळले पाहिजे बहुत काय लिहिणे मी बालक आहे