श्रीकाशी
शक १६७१ कार्तिक वद्य ४
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७५ शुक्लनाम संवत्सरे कार्तीक वद्य चतुर्थी गुरुवासरे श्रीक्षेय कुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी यांनी वेदशास्त्रसंपन्न श्रीक्षेत्र प्रमुख समस्त क्षेत्रस्थ वैदिक पंडित ब्राह्मण यास परभू याजक ब्राह्मणाविषयी निर्णयपत्र करून दिल्हें ऐसे जे सप्तऋषीहून बावाभट्ट आठल्या याणें परभूजातीय साक्षाद्राह्मणद्वारावा वैदिकादिककर्मानधिकारी असाधारण लिपिलेखन वृत्युपजीवी बाबूराव परभू यास श्रीयात्रेस नेऊन तेथें परभूस वैदिककर्मार्थ सकळ पंडित लोभ दाखवून प्रार्थिले. तथापि त्याहीं निषेधे केलियानंतर श्री प्रयागीं जाऊन वेदमूर्ति नारायण दीक्षितप्रभृति शिष्ट ब्राह्मण निषेध करीत असतां तेथील हाकीमाचे बळानें प्यादे बसवून परभूचें होमातिरुद्राख्य वैदिककर्म करवून सप्तऋषीस आला. कर्माचे आचार्यादि ऋत्विग्व तत्संसर्गी श्रीस गेले त्यांचा श्रीस्थ समस्त वैदिकपंडिताही बहिष्कार करून बावाभट्टादिकांचे बहिष्कारार्थ सप्तऋषीस पत्रे पाठविली त्या पत्रावरून व यात्रिक शिष्टजनमुखेंही निर्णय करून बावाभट्टादिकांचा सप्तऋषिस्थ माहुली संगमप्रभृति समस्त क्षेत्रस्थद्विजमंड + बहिष्कार + लीने केला. त्यानंतर श्रीमध्यें परभू याजक कृष्ण दीक्षित देवधर व बाबाभट्टाचा बंधु यज्ञेश्वरप्रभृति याहीं अनेक उपद्रव करूनही राजा नवलराय यांजवळ फिर्याद होऊन चोपदार पाठवून श्रीस्छ ब्राह्मण नेले. त्यामध्यें राजा नवलराय याही दाहा दाही ब्राह्मण हे कर्म सत्य किंवा मिथ्या ? ब्राह्मण सत्य भाषी वा मिथ्या भाषी हा निर्णय करावयाकारणें आमचा दरबारास पाठविलेल्या उपरि ब्राह्मणाचा कलह दूर करावा ह्मणावून अंह्मी बावाभट्ट कृष्ण दीक्षितादिकास अनेकवार सांगितले. परंतु त्याही व विनंती केली जे सभा करून निर्णय करावा. सभ्यमुखें करून आपण आपराधी जाहलो तर यथोक्त प्रायश्चित करू. त्या करिता येथें धर्मसभा करून उभय गोदातीरस्थ महाबल वैराज माहुली संगम कराहाटक करवीर परशुराम क्षेत्रस्थ विज्ञवृत्धसमस्त ब्राह्मण व समस्त प्रधानवर्ग बसून बावाभट्टादिकाचे समक्ष न्याय केला. तेथें प्रश्नोत्तर भावें करून व त्यांचा हस्ताक्षरांचा अनेक पत्रावरून व आद्यंत कर्माचे साक्षि नागजोशी व नागोजीराव प्रभृति यात्रिक कर्मकालीं प्रयागीं होते. त्यास त्रिस्थळी यात्रेचा शपथ घालून त्याचा साक्षीप्रमाणें व प्रयागी अतिरुद्रकर्माचे आचार्ये सदाशिवभट्ट पिंगले यांही व अणखी कितीयेक होमकर्त्यां ब्राह्मणांही अनुतापपुरःसर ब्राह्मणास शरण जाऊन प्रायश्चितें बहुत क्षेत्री घेतली. त्यावरूनहि अयाज्ययाजनाद्यपराध बावाभट्ट कृष्ण दीक्षितादिकांचे आंगी सप्रमाण लागला ते मिथ्यावादी जाहले. त्यानंतर बावाभट्ट कृष्णदीक्षितप्रभृतींस प्रायश्चित करावयाची अज्ञा केली. जर प्रायश्चित न करा तरि आमचा देश सोडून जा ऐशीही अज्ञा केली. त्यासमयीं प्रायश्चित्त मान्य करून घरास जातों ऐसे ह्मणोन देशांतरास गेले. त्याउपरि तुह्मांस श्रीस्थ प्रमुख समस्त ब्राह्मणास हे निर्णयपत्र करून दिल्हें असे. सर्वप्रमाणें तुह्मी सत्यवक्ते बावाभट्ट कृष्ण दीक्षीतप्रभृति सर्व प्रमाणे मिथ्यावादी. अपराधी प्रायश्चित्तावाचून अव्यवाहार्य आहे. तयास्तव बावाभट्ट कृष्णदीक्षितप्रभृति परभू याजक जोपर्यंत ज्ञातीस शरण येऊन राजअज्ञापुरःसर प्रायश्चित्त न घेत तोंपर्यंत यांशी कोणी अन्नोदकव्यवहार न करावा. बहुत काय लिहिणें.