[ ३११ ]
श्री शके १६७६ आश्विन शुद्ध १३.
राजश्री दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--
उपरि. तुह्मी चिठी पाठविली ते प्रविष्ट झाली. लिहिलें वृत्त कळलें. त्यास, काल नवाब येथें आले होते. त्यांचे आमचें भाषण स्पष्टच जालें. मल्हारबाही होते. पैकियाची निशा करून देतों ऐसे नवाब बोलोन गेले आहेत. त्यास, निशापात करून देतील. उत्तम आहे. नाहीं तरी तुह्मीं उठोन येणें. जाणिजे. छ. ११ जिल्हेज.
लेखन
सीमा.