[ ३०९ ]
श्री शके १६७६ भाद्रपद वद्य ९.
राजश्री दामोधर माहादेउ गोसावी यांसीः--
विनंति उपरि. चांदखान बेपारी याचा वस्तभाव कापड तुह्माकडील कमाविसदारानें कनोजेमध्यें लुटोन घेतली. त्याविशीं पूर्वी तुह्मांस लिहिलें होते. परंतु अद्यापि याचा यासी माल न दिधला. त्यास तुह्मांकडील कमाविसदारानें कनोजेमधें राहून मवासगिरी गिरासेपण करावें ऐसेंच असिले तरी हे निश्चय कळलियाउपरि पैरवी करावी लागेल. मशारनिलेचा वस्तभाव देवायाची असिली तरी देवणें. नाहीं तर यांसी साफ जाब देणें. छ. २३ जिलकाद. हे विनंति.
मोर्तब
सूद.