[ ३०८ ]
श्री शके १६७६ भाद्रपद शुद्ध ११.
**** छ २१ जिल्हेज आश्विन वद्य ८.
तीर्थरूप मातुश्री आमा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बापूनें व पुरुषोत्तमानें कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ९ माहे जिलकाद मु॥ इंद्रप्रस्थ जाणून वडिलीं आपलें स्वकुशल लिहीत असिलें पा।. विशेष. बहुत दिवस जाले आशीर्वाद पत्र येऊन सांभाळावासि न जाली. याकरितां चित्त सचिंत्त असे. तर आलिया मनुष्याबराबर सदैव पाठऊन सांभाळ करीत असिलें पाहिजे. यानंतर येथील वर्तमान पेशजी अजूरदार जोडीसमागमें ****कल्य लिहून पाठविलें व देवाजी नाईक यांणीं मुखवचनें निवेदन केले असेल, त्याजवरून विदित जालें असेल. सांप्रत राजश्री दादा कोणे स्थलीं आहेत, पुण्यास परमारें गेले कीं गांवीं येऊन आपली भेटी घेतली, हें साकल्य वर्तमान लिहून पाठवणें. आह्माविशंई इतकें विस्मरण पडलें की पत्रही व असिर्वादही न लिहिला. रिणानुबंधेकडून भेट होईल तो सुदिन. कृपा केली पाहिजे. दर्शणाचा लाभ होईल तो सुदिन. हे विनंति.
सौ। मातुश्रीसमान माउस सां। नमस्कार. कासीस नमस्कार. चिरंजीव मन्याबाईस आशिर्वाद. तुह्मी कधीही पत्र न लि॥. कारण आह्मांवर रागें आहां की काय ? मातुश्री आमांस आह्मांविषई चिंता करूं न देणें. सत्वरच भेटीस येऊं. हे आशिर्वाद. गंगीस आशिर्वाद.
सौ वज्रचुडेमंडित तुलजा वहिनीस व रेणुका वहिनीस नमस्कार. सदैव कुशल वृत्त लिहित जाणें. हे विनंति.