[ ३१० ]
श्री शके १६७६ आश्विन शुद्ध ४.
राजश्री बापूजी माहादेव व दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--
उपारि. तुह्मांकडील कारभार आजि आजि उद्यां उद्यां ऐसेच दररोज ऐकतों. परंतु अमलांत येत नाही. याचा विचार काय ? त्यास, आह्मी ऐसेच चैत्रवैशाखपावेतों दिल्लीचे लोकांच्या गोष्टी ऐकत राहावें की काय ? त्यास, तुह्मी याजउपरि तेथील भाव काय तो पष्ट लिहिणें. तदनुरूप पैरवी केली जाईल. जाणिजे. छ. २ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? येथें दोन नावा आल्या. आणिक दोन तीन पाठविणें.
( लेखनसीमा.)