[ ३२४ ]
(पैवस्ती) शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ११
पौ छ २४ सफर.
भगवान सुरखरू करील तोच सुदिन जाणावा. वरकड राजीक वर्तमान तरः— दिवान हरि गोविंदजी व पेमसिंगजी दहा पंधरा हजार फौजेनसी रेवाडीपावेतों पावले आहेत. वजिराचे पुत्राचे जागिरीचे गांव या प्रांतांतील कुली एक दोनी जबातींत आणिले. तेव्हां त्याणी श्रीमंत बापू यांसी जाबसाल लावून मामिलत इछून माणिकराम यांसी हरि गोविंदजीसमीप पाठविलें. येथून लक्षा एकाची हुंडीहि जापेदरायाची दिल्लीस गेली आहे. पुढे पाहूं तर इंतजामुद्दौलानीं अंमल उठवून घेतला. हरि गोविंदजीसहि तेथील लोक बोलावितात. परंतु जातां दिसत नाहींत. इतकियावर, पहावें, काय घडून येतें. हंकुमतराय वगैरे जागीरदारांचे गुमास्ते मामिलतेस्तव येथें येऊन पावले आहेत. परंतु कांहीं मामिलत त्यांची तूर्त फैसल होते तो अर्थ दिसत नाहीं. मोठा भरणा सरदारांकडील यांच्या र्हद्रोगापुढें कांहीं भासत नाहीं. श्रीमंत बापू यांनी तर महाराजा रामसिंगजीनिमित्य बहुत कांहीं जोर मारिला. परंतु बख्तसिंगासी टिका त्यांनी पाठविलाच. सारांश, सरदार ज्यासी टिका देतील तोच टिकेल. आजिचे समयांत सरदार जे चाहातील तेंच होऊन येईल. जगू पुरोहित तेथें सरदारांसमीप पावले. त्यांनी सन्मान केला. याजवरूनच बख्तसिंगजीचे रजपूत तुहिले जाहाले. जरी सरदारांचा इकडील ह्मणजे मारवाडाकडील रुख जालिया, तमाम रजपूत उठोन रामसिंगजीचे शामील जाहाल्याविरहित राहणार नाहींत. ऐसा रंग दिसतो. शहराहून वर्तमान आले कीं:- श्रीमंत पंस प्रधान यांसी व निजामपुत्रांसी सख्य जाहालें. आतां मार्गहि सुपथ जाहाला. पशमी न्यावयास्तव स्वामीनी आज्ञा केली. त्यासी, यंदा तर हंगामसर जाऊन पावणें तरी कठिणसेंच दिसतें. दस्तक व जोडी श्रीमंत स्वामीस विनंति लिहून गडबडेकरितां आणविली होती. जरी येऊन पावते तरी पशमीना मार्गस्त केला जाईल. वरकड सर्व कुशल असे. स्वामींनी राजश्री त्रिंबकपंताचे घरीं दोनी हजार रुपयांची हुंडी पाठवायानियित्य आज्ञा केली. तदनुरूप हुंडी मातबर शहरची करून पाठविली. रसीद आल्यानें विनंति केली जाईल. वरकड वसईचा सी साल यांचा वसूल आणविला. त्यास, जमाखर्च तर देवाजी त्रिमळ आल्यानंतर पाठवितो. परंतु हाल आडसट्टा मात्र श्रुत व्हावयानिमित्य निराळे फर्दावरी लिहून पाठविला असे, त्याजवरून अवगत होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दिधली पाहिजे. हे विनंति.