[ ३२५ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ११.
राजश्री दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--
उपरि. तुमचें प्रयोजन अगत्य आहे. व खासा स्वारी लष्करसुद्धा गंगास्नानास जाणार, याजकरितां तुह्मीं बराबरी असावें. व त्यास डेरादांडा सरंजामसुद्धा येणें. येथें येऊन माघारे तुह्मास जाणें असेल. तरी राजश्री मल्हारबा अलीकडे आले नाहीत. याजकरितां उदैक येथें मुक्काम आहे. त्यास, तुह्मी उदैक जरूर येणें. माघारें जावयाचे असल्यास पुन्हा माघारे जाऊन, डेंरादांडा वगैरे सरंजामसुद्धां येणें. परंतु उदैक लौकर प्रातःकालींच येणें. दिरंग न लावणें. जाणिजे. छ २५ सफर. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.