[ ३९५ ]
श्री शके १६८० फाल्गुन शु॥ १५.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी
प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता। छ ११ रजब जाणून स्वकीय कुशललेखन करीत असले पाहिजे. यानंतरः राजे नागर. मल्ल यांनी मिश्र सुजान येथून सुरजमल्लाकडे पाठविला होता. त्याजवरून मिश्र. मजकूराबराबर सुरजमल्ल जाटानें रूपराम कटारा याच्या लेकासमागमें दिल्हे; आणि दोन लाख रुपयांची हुंडी, शर्ती, शिकंदरियाच्या सनदेस्तव पाठविली आहे; आणि मशारनिलेंसमक्ष ताकीद केली आहे की, प्रा। शिकंदरियाची सनद घेऊन लाख रुपये राजेमजकूर ज्यास देवील त्यास देणें. याप्रमाणें जाबसाल करून येथें आले आहेत. उदईक लष्करास येणार. सूचनार्थ लिहिलें आहे. दुसरें :– इनायत पातशाई झालरदार पालखी व खिलत व जवाहीर वगैरे फत्तेसिंग मुनशीस व हिरानदास वरचेवर लेहून पाठवितो की, लौकर घेऊन येणें. त्यास, तेथें त्याची तजवीज करून पाठविजे. नाहीं तरी, ज्याप्रमाणे प्रतिउत्तर येईल त्याप्रमाणे करूं. शिकंदरियाचे सनदेचा मजकूर बहुत सावधपणें येथें ताकीद करून हें काम शिरां न चढे ते केलें पाहिजे. मार्गाचें दुर्घट, यास्तव तीर्थरूप मातुश्रीचे व सौ। रेणुकेचे पाठवावयाची तजवीज न केली. * सुरजमल्लांनी हे तजवीज केली आहे जे, शिकंदरा घेऊन कांहीं फौज मर्हाटी
असली.
पौ। छ १३ रजब.