[ ३९७ ]
श्रीवरद शके १६८० फाल्गुन वद्य ५.
श्रियासह चिरंजीव राजश्री तात्यासाहेब याप्रतिः--
पुरुषोत्तम माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथीच कुशल त॥ छ १९ रजब मुकाम लष्कर राजश्री जनकोजी शिंदे जाणोन स्वकुशल लिहीत जाणें. विशेष. बहुत दिवस जाले की तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. त्यास्तव सचिंत असों. तर कुशलवृत्त सविस्तर वर्तमान लिहून पाठवित जाणें. येथील सविस्तर वृत्त तीर्थरूप राजश्री बापूस लिहिलें आहे; त्याजवरून कळों येईल. वरचेवर कुशलार्थ लिहिणें कीं समाधान होय. निश्चितमनें चाकरीचा उद्योग करूं. श्रीकृपा फार समर्थ आहे. चिंता न करणें. चिरंजीव विश्वासरायास अनेक आशीर्वाद. हे आशीर्वाद.