पत्रांक १९
श्री.
१६८६ चैत्र शुद्ध ३
राजश्री जानोजी भोंसले सेनासाहेबसुभा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे, विशेष. प्रगणें सारबाड येथील जाहागिर सरंजाम सालमजकुरीं फौजेचे बेगमीस सरंजाम राजश्री नरसिंगराव जनार्दन यांजकडे दिले आहे. त्यास, त्यांचे ठाणें अद्यापि महालांत बसले नाहीं, ह्मणोन मानिल्हेनीं अवगत केलें. त्याजवरून पत्र लिहिलें असे. तरी, तुमची फौज ते प्रांतीं आली असेल. त्यास सांगून ठाणें सारबाडांत बसतें करावें. रा छ २ सवाल. बहुत काय लिहीणे? लोभ किजे, हे विनती.
