लेखांक ३३८
श्रीशंकर
.ll श्रीमत सकलगुणअलंकरणअखंडितलक्षमीअलंकृत राजमान्यराजश्री कान्होजी जेधे देशमुख तपे भोर किले रोहिडा प्रति राजश्री सिवाजीराजे जोहार येथील क्षेम जाणौनु स्वकीय कुशल लिहिणे तुह्मी पत्रिका पाठविली त्यावरुनु अभिप्राऊ कलो आला लि॥ की खान अलीशान खान अजम येही लिहिले आहे की जावलीवरी सुरु केले आहे तरी तुह्मी आपले जमेतीसी सीताब येणे ह्मणौनु लिहिले आहे तरी तुमचा व त्याचा पहिलेपासून घरोबा आहे गेले तरी पाहिजे आमा खासा अगर पुत्र पाठवावयाचे जाले तरी त्याचा बोलभाक बरवे रिती घेउनु मग जाणे दगा होये ऐसे न करणे एक भले माणूस दरम्यान देउनु मग जाणे तुमचे नजरेसी पडत असिले की खासा च जावे जरी तुमचे मन बार देत नसिले तरी कौल बोल घेउनु पुत्राबराबरी लोक देउनु पाठविजे हरयेक बाहाणा करुनु तुह्मी राहाणे दोन्ही गोस्टी तुह्मास लिहिल्या आहेती यात तुह्मी स्याहाणे असा बहुत लिहिणे नलगे
पो। छ २४ रजब