लेखांक ३३७
श्री
सकलगुणसौजेनीसीधु अखडितलक्षमीप्रसन राजमानी राजश्री कान्होजी नाईक देसाई ता। भोर ता। रोहिडा गोसावी यासि वेदाजी अनत विनति एथील क्षेम जाणौनु तुह्मी आपले क्षेम लिहिणे विशेखु तुह्मी एउनु आमची भेटी घेतली हजरती खानसाहेबासी एख्तरी धरिला आजीपासुनु तुमची आमची एखलासी जाली तुह्मी हरएकविसी आमचे कामास अतर पडो नेदणे आह्मापासुन हि कोणेविसी हरएक तुमचे कार्यास अंतर न पडे हा पूर्ण भरवसा असे पुढे जे कार्य प्रयोजन ते आह्मास लिहीत जाणे लिहिले सारिखे सरजाम होत जाईल कोणेविसी अनमान न धरणे तुमचा आमचा कौल इमान असे छ १३ माहे सफर सु॥ सलासीन अलफ फारसी