पत्रांक १७
श्रीशंकर.
१६८५ फाल्गुन वद्य ११.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री
बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः--
विद्यार्थी नारो कृष्ण जोशी कृतानेक नमस्कार विनंति येथील कुशल ता फाल्गुन वा ११ मुक्काम लष्कर नजीक मनोली जाणोन स्वकीय कुशल लि. हित जावें. विशेष. आपलीं एकदान पत्रें आलीं कीं, ऐवज घेऊन जावा.
आणि राजश्री धोंड जोशी यांसीं भाषण केलें. त्यांनी आझांस लिहिलें. त्यांत मजकूर त्यांनीं सुचविला कीं, तीर्थरूप राजश्री भाऊचें पत्र पाठविणें कीं, ऐवज देणें. ह्मणोन, त्यावरून, तीर्थरुपाचें पत्र पाठविलें आहे. पावेल. ऐवजाचा मजकुर तरी. श्रींत देविला असतां तरीं उतरून घेतों. हा मजकूर राजश्री जोशी यांनीं आपणांसी केला. आपण उत्तर केलें कीं, येते समयीं बरोबर आणिला. बरें ! उत्तम ! हालीं मशारानिल्हेचे आपलें भाषण जाहालें आहे, त्याप्रमाणें ऐवज पुणियांत उतरून द्यावा, सोनें व रुपें याचे दागीने आणिले असतील ते दागीने यादी बरहुकूम द्यावे, नख्तऐवज पुणीयांत उतरे तें करावें याजखेरीज चौकडा व आणखीं कांहीं मोतेंयाचे दागीने असल्यास, तेहीं त्यांचेच हवालीं करावें. राजकी वर्तमान तरी: हैदरनाइक बिदनूरची झाडी धरून बसला आहे. बाहेर निघत नाहीं. श्रीमंत मनोलीस लागले होते. आठ रोज ठाणे मांडले. हस्तगत करून धारवाडास जाणार. तो कांहीं यांसी सन्मुख येऊन भांडतां दिसत नाहीं. फौज यांजबराबर वीसपंचवीस हजार जमा जाहाली. मागाहून आणखी येत आहे. पुढें होईल तें लिहून पाठवूं. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे विनंति,
पौ. चैत्र वद्य ६ शनवार शके १६८६
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)