लेखांक ३४४
१६१०
पातशा
इजतीअसार बाजी सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे सु॥ सन १०९८ मालूम दानद की तुला हजूर सिवाजीपत पाठविला होता त्याणे हकीकत जाहीर केली त्यावरून तुझे इसापतीचे गाव व हक तुझे दुमाले केले व तुझा गुमस्ता सिरोली चाकरीस देणे तुला हजूर येणे हजूर आलियावरी तुह्मास हजरती जादे याचा कौल आणून मन तुह्माबराबरी भले माणूस देऊन त्याची भेटी करून फर्मान करून देऊ जरी तू हजूर न येस तरी गाव दुमाले नाहीत दिगर बाजी घोलप व बकाजी नावडकर यासि कोल दिधले त्यास बराबरी घेऊन येणे कोणे बाबे शक न धरणे तुह्मी हजूर न या तरी जे सनद दिधली ते मजुर नाही तुह्मानजिक जमाव कितेक होईल ते लेहोनु घेऊन येणे