लेखांक ३४७
श्री १६१२ चैत्र वद्य ८
स्वस्ति श्री राज्याभिशेकशके १६ प्रमोद नाम संवत्सरे चैत्र बदल अष्टमी मदवासरे राजमान्य राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देसमुख यासि राजा आज्ञा (अभय दिल्हे) ऐसी जे मा। रतनोजी सिंदे व शंकराजी ढागा याजबराबरी कितेक एकनिस्टपणाच्या गोस्टी सांगोन पाठविल्या सांगितलयाप्रमाणे विदित जाला ऐसियासि हे मर्हाट राज्य आहे तुह्मी लोक या राज्याची पोटतिडीक धरिता तरी ते प्रांते कितेक राजकारणे आहे ते चालणा करून ++ ण जमाव करून सावधानपणे राहोन स्वामिकार्य जे दृष्टीस पडेल ते मनास आणून हस्तगत करून ठेवणे हुजूर लेहोन पाठवणे तेणेप्रमाणे हुजरून विल्हे केली जाईल या प्रांतीचे वर्तमान तरी राजश्री छत्रपति स्वामी स्वारी करून कर्नाटकप्राते गेलियावरी तिकडे जमाव लस्कर चाळीस हजार व हशम एक लाख पंचवीस हजारन जमाव जाला आहे पुढे हि आणखी जमाव होत च आहे ते प्राती कुल पुड पाळेकर तमाम एऊन भेटले आहेती जमेती पोख्ती जाली आहे तुर्त पुढे राजश्री केसो त्रिमळ या प्रांते रवाना केले आहेती त्या बा। सगिनात स्वार पंधरा हजार व हशम पचवीस हजार देऊन रवाना केले आहेती ते हि कादळ प्राते तुंगभद्रेच्या तीरास आले आहे खजाना हि एक लाख होनु याबराबरी आहे त्यास आणावयास राजश्री धनाजी जाधव सताजी घोरपडे सेनापंचसहस्त्री पाठविले आहेती ते हि आठा पंधरा दिवसी एतील ते आलियावरी तो जमाव व हुजूरचा जमाव ऐसे करून त्या प्राते स्वारी होईल तरी हे पत्र तुह्मास सादर केले असे तेणेप्रमाणे जमावानसी सावध असणे त्या प्राते आलियावरी तुमची हि सरजामी एथे मा। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगे एही रदबदल केली त्याप्रमाणे चालऊन बिता।
तैनाती सालीना होनु गाव
५००० खासा ४ इसाती
५०० मताजी जेधे २ वेतनात गाव
--------- ---------
१००० ६
सदरहू प्रमाणे हजार होनु तैनाती व गाव इसाती व मुकासे मिळोन सा गाव कार्यभाग जाली देऊन तरी तुह्मी आपली खातरनिशा राखोन स्वामीच्या पायासी एकनिस्टता धरून स्वामिकार्य साध्य यहोए ते गोस्टी करणे गनीमाचा हिसाब काय आहे तुह्मी लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय आहे गनीमसा तुह्मी लोकी केला आहे ते तुह्मी च लोक या राज्याची पोटतिडीक धरिता जेव्हा अवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही ऐसे बरे समजोन लिहिल्याप्रमाणे वर्तणुक करणे व अवरंगजेबाने मर्हाटे लोक आहेती त्यास मुसलमान करावे ऐसे केले आहे त्यापैकी मुसलमान केले मा। नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि ए प्रांतीचे बाटविले पुढे हि तलबा गेला आहेती तिकडून तमाम मर्हाटे लोक होते ते आपला जमावानसी आह्माकडे एताती हाली रा। हणवतराऊ निंबाळकर व सटवोजी निंबाळकर बाजे सरदार आले आहेती पुढे हि कितेक एताती ऐसे गनीमाचे लस्कर उठोन हुजूर जमाव होत आहे ईस्वर करितो तरी फते च आहे लिहिलेप्रमाणे हिमती धरणे जाणिजे छ २० जमादिलाखर सु॥ तिसैन अलफ आज्ञा प्रमाण