Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८९
श्री
१७०० आषाढ वद्य १०
रावसाहेब आदा मुलाजमें एकबालहू.
जयेर दौलत व एकबाल रफात वे अवालि मर्तबा तफीस खातम बख्तदारीं आबेजव्हार आलम परवरी फरोजी पेचराग हिशमत फराजी देली वायम करमत अजयुफी कड बाबत व कामरानी दाई. मजश्यारे कवताल्याबाद अजि खैर आपेश उइलम लुइस एस्कोयर बाद अर्जुए हुजुर मोफसरूर इनशाफ खातीर मेहेर मजातीर मेरार्दा नव.........फनामा तिराज सादर केला तो पोंचून हिसियार खुरमी हांसल जाली. एकबालपन्हांचे लिहिल्यावरून श्याहामत व एकबालपन्हां गवरनर जनराल कलान कलकत्ते जंगबहादुर यांचीं खतें पाठविलीं आहेत. येऊन पावतील. कलकत्तेयाहून खुदाएवंद न्यामत हनरावेल कोंपनीची फौज येत आहे. रहदारीस दस्तक द्यावें विसीं गवरनर जनराल यांहीं कलमीं केलेंच आहे. त्यास तर्फ इंज्यानेब अर्ज ऐसाजे, मेहेरबानी करून बंतरपासून व सरकारचे सरदार जागजागांचे यासीं दस्तक द्यावें. येथून फौजेच्या सरदारांस पाठवून देऊं. दस्तक असल्याने दुतर्फेच्या फौजेशी मुलाखत जाहील्यास कोण्हेविशीं रहदारींत हरकत वगैरे नाहीं. बेहत्तर असे. कलकत्तेचे खलिते पावल्याचा दरजबाब पाठवावें. येथूनं रवाना केले जातील. रा छ २४ जमादिलाकर, ज्यादा एयामशादमानी जुमाबंद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८८
श्री
१७०० चैत्र वद्य ३
पौ छ १५ रबिलावल, सन समान सैबन.
रावसो मेहरबान करमफर्याय मोखलिसां बाळाजीपंडत फडणवीस
सलमला हुताला.
बादज षौक मुलाकात मसरत अयात मषहुद खातर इतिहाद मासरबाद, येथील खुषी जाणून आपली शादमानी हमेघा कलमी करीत आलां पाहिजे. दरीं बिला, बहुत रोज जाहाले, आपणाकडील खैर आफियतेचा खबर मालूम होत नाहीं. दोस्तीचे जागां ऐसें न व्हावें. हमेशा आपली शादमानी कलमी करीत यावें. हाली नरसिंगराव कारकून या बा चे थानपारचे पाठविले असे आजराः एखलास घेतला पाहिजे. जिआदा लिहिणें काय असे ? हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८७
श्री
१६९९ माघ शुद्ध १३
राजश्री महिपतराव तो रत्नागिरी गोसावी यांसी:-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावे. विशेष. राजश्री आपाजीराम दाभुळकर यांची कुणबिण कस एक पळून गेली, ती ता लांजें उमगिलो आहे, म्हणून कळलें. त्यावरून, हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी यांची कुणबिण ज्याचे घरीं असेल त्यास ताकीद करून, यांचे माणसांचे स्वाधीन करवावी. रा छ १० मोहरम, बहुत काय लिहिणे ? हे विनंति. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८६
श्री
१६९९ पौषवद्य ११
राजश्री महादजी शिंदे गोसावी यांसीः -
छ सकल गुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री महिपतराव कृष्ण साठे यांजकडे पो हुकेरी वे मनोळी
हे तालुके कर्जांत. त्यास सन सितांत एसाजी शिंदे फौजसुद्धां पो मजकुरी येऊन गांव घेतले. त्यांपैकी कांहीं गांव राजश्री रामचंद्र गणेश यांणीं घेऊन मारनिलेचे हवालीं केले. कांहीं गांव ठाणें, सेंदूर व हासूर वगैरे येणें राहिलें आहेत. त्यास तिकडे सांप्रत तुझी गेलां आहां, याजकरितां तुह्मीं यांजकडील गांव घेऊन मशारनिलेचे हवालीं करणें, मारनिलेचे कारकून तुह्माकडे गेलेच आहेत. ते तिकडील माहितगारी तुम्हांस सांगतील. त्याप्रमाणें जरब पोंचाऊन ठाणीं घेऊन हवालीं करणें. जाणिजे. छ २४ जिल्हेज, सुा समान सबैन मया व अलफ, बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद. लेखन सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८५
श्री.
१६९९ पौष शुद्ध १२
जंजीरेकरांचे पत्राची नक्कल.
......मान जयराम त्रिंबक सोमण.
मुफावीजा मरकुम केला तो पोहचून खुषजुदी हांसल जाली. लिहिला मजमून मालूम जाहला. ऐशास, गणेशराम दातार हक झाले. पुढें दुतर्फा जाबसाल सुरळीत अमलांत यावें, सां आंअमारतपन्हांकडून भलें माणून रा करावयाविशीं इबलाग केलें. त्यावरून भलें माणूस रा करितों ह्मणोन कलमीं केलें असतां, प्रांतांतील दंगा होणें तो, होतच आहे. हें एखलासींचे जागा दुरुस्त नाहीं. सरकार तर्फेनें निखालसीचा मार दर्याफ्त करून भले माणूस बलाविले आहेत. तरी जलदीनें रा करावें. अकरा माहालची दुतर्फा पाहणी होणें, त्याचा हंगाम हाच आहे. याजकरितां भलेमाणसाची रवानगीस दिरंग न लावितां लौकर रा करावें. रयतीस तसदी लागते ये बाबेचा बंदोबस्त करवावा. दोस्तीचे जागां असें अंमलांत नसावें, रा छ २२ जिल्हेज, जादा काय लिहिणें हे किताबत.
सन समान पौषमास मा परंधर येथून रा जालें, खान अजम याकूतखान दाम मोहबत हु.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८९
१५४३ माघ वद्य १०
राया राऊ साहेबू
अज दिवाण पा। पुणा ता। हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानी व रयानी मौजे वडिगौ निजीक पेडगौ पा। मा। दा। सु॥ इसने इसरैन अलफ दा। निसली राजश्री छ २४ रबिलोवल सादर जाले तेथे रजा जे रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर एउनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर वाहातिकास देखील मलई रुके .।. बारा दर सवाद मौजे वडिगौ ना। पेडगौ का। पाअस पा। मजकूर कारकीर्दी खा। हैबतखान व मलिक अजमा चालिले आहे हाली विलायती साहेबास अर्जानी जाली आहे माहाली कारकुनु खुर्द खताचा उजूर करिताती सरजाम होय ह्मणौनु तरी रामेस्वरभट बिन नारायणभट सो। मा। यासी इनाम जमीन चावर दो। मलई वाहातिकास रुके .।. प्रज माहाद पाटील ठोबरा दर सवाद मौजे मजकूर सालबाद कारकीर्दी व मलिक अजम हैबतखान चालिले असेल तेणेप्रमाणे तसरुफाती व भोगवटा खातिरेसी आणौनु सदर्हू इनाम इनामधाराचे दुमाला कीजे तालीक घेउनु असली फिराउनु दीजे ह्मणौनु रजा तरी बा। रजा सदर्हूप्रमाणे भोगवटे व तसरुफाती कारकीर्दी हैबतखान व मलिक अजम सालाबाद ता। सालगुदस्ताप्रमाणे चालिली असेली तेणेप्रमाणे चालवीत जाइजे दर हर साल खुर्द खताचा उजू न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे मो।
तेरीख २४
रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८४.
श्री.
१६९९ पौष शुद्ध २.
रा छ ३० जिल्काद, सन समान XXX जंजीरेकर हबशी यांचें पत्र. आंमरतपन्हांनी मुफाविना इबलाग केला तो उसूल होऊन खुरमी हांसल जाहाली. कितेक मजमून बयावार कलमीं केलें, ते आंयां जाले. लेकिन ये बाबेचे मजमून मुफसल गणेशराम दातार यांस हुकूम करून रा केलें असतां, रहादरायान त्यास लासूर पैदा होऊन घांटमाथां छ जिल्कादीं फोत जाले. बिनाबरा, दुतर्फा कित्तेक मुकदमेंयांचा फैसला होणें, सबब मोहिबांकडून वाकफगार शाहाणें माणूस रा करावें, समजोन घेऊन जाबसाल करून रा केले जातील. सरकार तर्फेनेंही शाहाणें माणूस रुखसत होतील. बिलफैल, प्रांतांत दंगा होऊन रयतीस उपसर्ग होतो, ये बाबेचे हूजूर बोभाट येतात. हें एखलासीचे जागां मुनासीब नाहीं. ताकीद करून उपसर्ग प्रांतांत न होय तें.........कीजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८३.
श्री. (नक्कल.)
१६९९ मार्गशीर्ष शुद्ध १२.
राजश्री वर्तमान व भावी कादार पा विसनपूर गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड. सुा समान सवैन मया व अलफ. वेदमूर्ती राजश्री शिवरामभट बिन निलकंठभट, उपनाम भंडारी, गोत्र भारद्वाज, सूत्र कात्यायन, शाखा वाजसनी, वास्तव्य शहर मुलेर, हे सत्पात्र थोर ब्राह्मण जाणोन, प्रा मजकुरीं सालमजकुरापासोन नूतन धर्मादाय दररोज रुपये पाव रुपया रोज करार करून दिल्हा असे, तरी पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें सदरहू, रोजचा ऐवज आदा करीत जाणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. पत्राची प्रत लिहून घेऊन, असल पत्र वेदमूर्तीजवळ भोगवटेयास देणें. रा छ १० जिल्काद. बहुत काय लिहिणे ? मोर्तब. शिक्का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८२.
श्री.
१६९९ कार्तिक
खान अजम याकूतखान दाममोहबतहू
अमारत व आयालत मर्तबात हशमत शौकात मंजील तमलाज मुखलिसां इस्तिनहार दोस्तां बादज पौक मषहूद जमीमोनीर गर्दानीदः मेखामददरीं वेला आं अमारत पन्हांनीं मुफाविजाईबलाग केला तो उसूल जाहाला व सदालत अतवार रामचंद्र हरी दातार यांणीं मोहिबांकडील कित्तेक सफाईचे मजमूल जाहाहीर केले ते मालूम जाले. सरकार तालुकीयांत येऊन खलकास तोशीस होऊं देत नाहीं व रुजुवातीचा मजमून कलमी केला ( तो ) आंयां जाहला. आं अमारतपन्हां सरकार तालुक्यांत येऊन रयतीस छडाछड़ बहुत होते. सरकारतर्फेकडील चाकरमानेयाचे कबिले धरून नेले व भातें भरून नेलीं, ये बाबेचे बोभाट बहुत येतात. लेकिन हुजूर वकील रवाना केला असतां सरकारचाकरमानेयांचे कबिले धरून नेऊन खेलकास तसदी देणें व भातें भरून नेणें हे ताजुब आहे! मोहिबांकडून असे अमलांत येत असतां, सरकारतर्फेनें पेषदस्ती होत नाहीं. गुदस्तांपासून वकील हुजूर दरसाल करावे, हें कलमी करीत असतां, मोहिबांचे जानीबानें वकीलांचे रवानगीस मुदत लागली. इंग्रजांचे गडबडीची फुरसत पाहून सरकारतालुक्यांत लोक रवाना करणें व इंग्रेजाची कुमक करितों ऐसें कलमी करणें तहाखेरीज असे. दुतर्फा दोस्ती चालावी हें बरज्याः लेकिन, रुजूवातीविसीं मोहिबांकडून बारबार कलमी होतें. बिनांबरां, येणे देणें काय निघतें हो कलमी जाबसाल असतां, आं अमारतपन्हांकडील वकील हुजूर आलेयाचे हमराई कागदपत्र मरसूल केले नाहींत. जबानीचे वाकफगारीनें मालूम कैसे होतें ? येबावे रामचंद्र हरी यास हुकूम केला आहे. लेंहाजा, कागदपत्र हिशेबाचे हुजुर येऊन, जाहीर होऊन, त्याची जुजरुसी करून दातार मुमाइलेयास हुकूम केला जाईल. खलकास मुजाहमत होणें हें मुकदमेवाची अजतर्फ आं अमारतपन्हां होत आहे. अजि जेहत नुकसान कदाम तर्फेने अमलांत येईल हे मोहिबांस मालूम न होय ऐसें नाहीं. रामचंद्र हरी यास हुजूर ठेऊन घेतले आहेत. यास कित्तेक मुकदिमेयांचा हुकूम केला आहे. मारनिल्हे कलमी करतील. ते दर्याफ्त करून दोस्तीची तरकी चाले तें करणे. अमारतपन्हांस मुनासीब आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८१.
श्री. ( नक्कल. )
१६९९ कार्तिक शुद्ध १३
राजश्री बाळाजी नाईक भिडे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. तुह्मांपासून कर्ज घेतलें येणेंप्रो:
३००००० सरकारांत भरणा, मार्गशीर्ष शुद्ध १.
५०००० सखारामपंत बापू, पौष शुद्ध १.
२५००० नानाफडणीस सवादोन लाख पौष शुद्ध १५.
---------
३७५०००
एकूण पावणेचार लक्ष. यास व्याज दरमहा दर सेंकड़ा रुा १। सवा बिन सूट देऊ. शके १६९९, हेमलंबी नामसंवत्सरे, कार्तिक शुद्ध १३. बहुत काय लिहिणें. हे विनंती. मोर्तब. शिक्का,