Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९८.
श्री.
१७०० पौष शुद्ध १
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री जगन्नाथ चिमणाजी गोसावी यांसी:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा तिसा सबैन मया व अलफ. नारोराम कारकून संस्थान धावडशी यांस सवस्थानसंमंधे सवासें रुा पावत होते. त्यास, मारनिले ( याचें यो-) गक्षेम न चाले, सबब पा तारापूर प्रांत वसई येथील मजमूची असामी सांगितली होती ती सरकारांतून बाद पडली. सा हल्ली साल मजकुरापासून संस्थान मजकूर येथील लिहिण्याचे कामकाज सांगोन सालिना तैनात रुा
१२५ पेशजींची नेमणूक संस्थानाकडे पावत होती त्या प्रों रुा
१२५ जाजतीं सालमजकुरापासून.
--------
२५०
एकूण अडीचशें रुपये करार करून दिहे असेत; तरी याजपासून सेवा घेऊन वेतन पावीत जाणें. जाणजे, छ २९ जिल्काद. आज्ञाप्रमाप. मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९७
श्री.
१७०० मार्गशीर्ष शुद्ध ५
पुा राजश्री बाबूराव स्वामीचे शेवेसीः-
विनंती उपरी ममईकर इंग्रज तीन चार पलटणें व कांहीं तोफा ऐसे कोकणांत उतरले. पैकीं दोन तीन तोफा व कांहीं लोक घाटमाथा आले. हें वर्तमान कळतांच राजश्री बापू व आह्मीं हुजूरातसुद्धां, शिंदे होळकर समेत, वानवडीवरून कूच करून तळेगांवचे सुमारें त्यांचे रुखावर आलों. फौजेची समजाविश काहीं जाली. कांहीं होत आहे. हल्ली इंग्रज कोकणांत उतरले. घांटावर आले. त्यांचें पारपत्य कर्णे कठीण नाहीं सत्वरच ईश्वरइच्छेनें तंबी होईल. परंतु इंग्रजाचा बिघाड जाला हे गोष्ट खुल्ली ! हिंदुस्थानांत पलटणें आलीं तथापि पडदा होता. ते म्हणत होते कीं, आम्हांस ममईस जाणें, पंतप्रधान यांसीं बिघाड नाहीं. कलकत्याहूनहि पत्रें येत गेलीं. त्यातहि हाच भाव कीं, रावपंतप्रधान यांसी करार व आहदिया जाला तोच मंजूर. ऐसें पडद्याने होते. ते त्यांणी होऊन, उघडी गोष्ट करून, तालुकियांत चालून आले ! तेव्हां तंबी कर्णे प्राप्त. इंग्रजी चाल प्रामाणिक ऐसें होते! तें त्यांणीं लोभामुळे सर्व सोडून बदनजर धरली. ही गोष्ट दक्षणेस व दक्षणेंत नबाब, पंत प्रधान व भोंसले, हैदरखान सर्वांस वाईट ! चरकाची गत आणि इंग्रजांची चाल एक ! दौलतकतें दूरदेशीं आहेत तेच हें समजतील कीं, ही गोष्ट वाईट आहे. ज्या राज्यांत टोपीकरांची चाल झाली तेथील गति काय, हें कांहीं लोपलें नाहीं ! याचा विचार राजश्री दिवाकरपंतदादा यांणी काय केला? इंग्रजी चाल दक्षणेxतील मोडणें, त्याची कबज्या न होणें, याची त-हा व सलाह कशी योजिली, हें त्यांस पुसोन, काय मसलत सांगतात, करितात हें सत्वर लिहावें. गनीमाई राज्याची. आगत्य इकडे आहे आणि त्यास नाहीं ऐसें नाहीं. राजश्री सेनाधुरंधर व राजश्री दिवाकरपंतदादा, तुह्मी बसोन, दरदृष्टीनें पोख्त मनसबा विचारून नेक सलाह ल्याहावी. इकडे कोणतीही गोष्ट त्यांचे सलहखेरीज नाहीं. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९६
श्री.
१७०० आश्विन वद्य ४
राजश्री आनंदराव हांडे देशमुख सरकार जुन्नर गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो सुभानजी जाधवराव रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकोय लिहित गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन सविस्तर वर्तमान विदित जालें. तर्थिरूप राजश्री खाशांचा मुहुर्त वसईस जावयाचा कधींचा आहे तो लेहून पाठवावें, ह्मणोन लिहिलें. ऐशीयास, ममईच्या बायावरी दहा फरकतें थोर व दाहा बारा हजार फिरंगी आला आहे, वसईवरी यावयाची दाटी फार आहे. ह्मणोन श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांची पत्रें आलीं कीं, तुह्मीं अविलंबें स्वार होऊन जाणें. त्यावरून त्या मार्गे जावयाचा मजकूर राहिला. उदैक आश्विन वद्य पंचमीस सोमवारी भोजनोत्तर स्वार होऊन जाणार. मुक्काम उदैक आळंदीचा आहे. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९५
श्री.
१७०० आश्विन शुद्ध ६
राजश्री महिपतराव साठे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतं राजमान्य स्नों माहादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें व श्रीविश्वेश्वराचा प्रसाद पितांबर पाठविला तो राजश्री माधवराव गंगाधर यांणीं पावता केला. श्रीचा प्रसाद पावोन संतोष जाहले. आपण इकडे येऊन भेटून जावें, ह्मणून लिहिलें होतें; परंतु, योग न घडला, परभारें जाणें जाहलें. महेश्वराहून पुढें जावयासी निघणें जाहलेंच असेल. स्वस्तिक्षेम पुण्यास पावल्याचें लेहून कळवावें. र ।। छ४ रमजान. बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तब सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९४.
श्री.
१७०० आश्विन शुद्ध १.
राजश्री लक्ष्मणपंत स्वामीचे सेवेसीं:-
विनंती उपरी तिकडील वर्तमान राजकी श्रीमंत पुसतात. त्यांस, कांहीं लिहित जावें, ह्मणून लिहिलें. त्यास, इकडील वर्तमान फाल्गुन मासीं रा। मोरोबा दादा फडणीस वाफगांवास जाऊन तेथून होळकर फौज सुद्धां व यांनींहि पांच हजार पावेतों ठेविली होती. रो बजाबा पुरंदरे व चिंतो विठ्ठल ऐसे पुण्यास येऊन येथील शिक्का कट्यार व निशाण घेऊन पुढें सासवडावर मुक्काम केला. मध्यस्त रा सखारामपंत बापू व कृष्णराव बल्लाळ व माधवराव जाधवराय हे ऐसे येऊन, रा नाना फडणीस यांनीं व त्यांनीं एक विचारें कामकारभार करावा ऐसें ठराविलें. त्याप्रों कांहीं चाललें नाहीं. चैत्र व वैशाख दोन महिने तसेच रोखानें गेले. पुढें रा हरीपंत तात्या फौजसुधां कर्नाटकांतून आले; व शिंदे कोल्हापुराकडे होते, तेहि आले. तेव्हां मसलत ठरून, यांचा त्यांचा बिघाड पडोन, मोरोबादादा यांसीं नगरचे किल्यांत ठेविलें. बज्याबा चंदन किल्ला येथें ठेवलें. चिंतो विठ्ठल मुंबईस पा होते ते तेथेंच आहेत. होळकर येथें आहेत. शिंद्याच्या लगामानें चालतात. उभयतां सरदार येथें आहेत. इंग्रजांचे पारपत्य उभयतां सरदारांनी करावें, कर्नाटकांत सखारामपंत बापू व नाना यांनीं फौजसुधां जावें, याप्रों मार ठरला. फौजांची तयारी होत आहे. दसरा जालियावर मुहुर्ते करून डे-यास दाखल होणार. याप्रों मजकूर आहे. रा आश्विन शुद्ध १ बहुत कार्य लिहिणें ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९३.
श्री.
१७८० आश्विन शुद्ध १.
राजश्री लक्ष्मणपंत स्वामीचे सेवेसीं:-
विनंती उपरी छत्रपुरीं मुंबईहून दोघे गृहस्थ आले. त्यांणीं येथें पत्र पाठविले कीं, तेथून पांच लक्षांची वरात फौजेच्या खर्चाची दिल्ही आहे. तरी एक कारकून छत्रपुरास पाठवून देणें. तो वरात पाहील, मग तुह्मांस रु। देणें असले तरी देणें. नाहींतरी फिरंगीयास सांगू. त्यांस यांनीं उत्तर लिहिलें, वरात व पत्रें कैसी आहेत तीं घेऊन येणें. ह्मणोन कासीद गेला आहे. उत्तर आलें नाहीं. नागपुरी भोंसल्यास सूत्र आहे. त्याचा वकील इंग्रजांजवळ आहे. तूर्त चार महिने छावणी करून हा मुलुख काबिल करितात, ह्मणोन लिहिलें ते कळलें. ऐसीयासी, तिकडे सरदार शिवाजी विठ्ठल वगैरे सरकारचे व शिंदे होळकर यांचे आहेत. आणि शिंदे होळकरहि लौकरीच त्या प्रांतें येणार, असें आहे. ईश्वरइच्छेनें शत्रूचें पारपत्य होईल. श्रीमंतांचा प्रताप थोर' आहे. रा २९ साबान. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९२
श्री.
१७०० भाद्रपद वद्य ६
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुा तिसा सबैन मया व अलफ. तुह्मांपासून ता रत्नागिरी येथील मामलतसंबंधें रसदेचा ऐवज आगाव सरकारांत सन खमस व सन सीत सबैनांत घेतला होता. त्यांपैकी रदकर्ज पावोन बाकी ऐवज राहिला तो व त्याचें व्याज जालें तें सरकारांत कर्ज करार करून ठेविला. मित्याः-
रुा।
८८४७९।।. ऐन मुद्दल वैशाख शुा १ शके १७०० विलंबनाम संवत्सरे.
२८७०१. व्याजा बा च्यार मास वजा करून पक्की मिती भाद्रपद
शुा१ शके १७०० विलंबीनाम संवत्सरे.
------------
११७१८१
एकूण एक लक्ष सत्राहजार एकशें एक्याशीं का सदरहू मित्यांनी घेतले. यासी व्याज दरमाहे दरसद्दे रुा १ एकोत्रा शिरस्तेप्रों करार केलें असे. जाले मुदतीचें व्याज व मुद्दल हिशेब करून दिल्हें जाईल, जाणिजे. छ २० साबान. बहुत काय लिहिणें ? श्री लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९१
श्री
१७०० श्रावण-भाद्रपद-आश्विन
पुा राजश्री रावजी स्वामीचे सेवेसी:-
विनंती उपरी इकडील वर्तमान विशेष लिहिणें तरी एक वेळ आंग्रेजाचा मजकूर. त्याचा इतल्ला वरचेवरी आपले पत्रीं लिहिण्यांत आलाच आहे. आंग्रेजांची पत्नावरी पत्रें दाट आलीं कीं, आह्मीं दरमजल तुमचे प्रांतावरून मुंबईस जातों. येथून उत्तरें त्यास वरचेवरी एकदोन रवानग्या तेथील आज्ञा प्रों गेली कीं, फरांसिसांचे वकीलास बिदा केलें, तुमचा व श्रीमंतांचा स्नेह जो आहे तोच आहे. आणि दोन चार उत्तरें पाठविलीं कीं, मार्ग विशम आहे. पर्वत आहेत, मार्गांनी पाणी.............हि हरवख्त मिळणार नाहीं. अशी इकडून पत्रें लिहीत गेलों. कदाचित् कठोर ल्याहावें, तरी कटक प्रांतांत अपाय करतील, हें जाणोन उत्तरें पाठवित गेलों. परंतु त्यांची पत्रें वरचेवरी हींच येत गेलीं कीं, आह्मी दरमजल याच मार्गे येतो. त्यास अलीकडे त्यांच्या लष्करांत काशीद जोड्या होत्या, व रा बेणीराम शिवभद्र वकील त्याजवळ आहे. आपणास ठाऊकच आहे. त्यास, त्यांणीं पत्र पाठविलें जे कर्णेल लस्लीन * आणि साहा पलटणें काल्पीस आलीं आहेत. तेथून कर्णेल गांजर यास तीन पलटणें देऊन, काल्पी अलीकडे जलालपूर आहे, तेथील मजल सांगितली. त्यांणीं कूच करून, दोनप्रहर रात्रीस फौजबंदी करून, राजश्री बाळाजी गोविंद व बुंदेले यांच्या फौजा जवळपास जाणोन, रात्रीस निघाले ते जासुदांनी मार्ग भुलविला. अरण्यांत जेथें पाणी नाहीं तेथें पडले. दोन अडीच प्रहर दिवस जाहला. इतकियांत कुल लोक तृषेनें व्याकूळ होऊन रानोरान जाले. कर्णेल गाजर सरदार मातबर व तीनशें गाडदी व पन्नास गोरे ऐसे तरी मेले. हें वर्तमान कर्णेल लसलीनांस कळतांच त्यांणीं कूच करून त्याजवळ आला. यांची इतकियांची गत करून, तेथेंच मुक्काम व्यत्रवतीवरी केला. प्रथम इकडे येण्याविशीं शकून याप्रमाणें जाहला ! पुढें न यावें तरी बुंदेल्यांचे व बाळाजीपंताचा शह खाऊन माघारे हलले, ऐसें होईल. याजकरितां छत्रपुरा.........आणि तेथें छावणी केली .........हिंदुस्थानांत व बंगाल्यांत भ्रम राहतो. याअर्थी छत्रपुराजवळ आले. इकडील येण्याची चाल सुस्त आहे. पुढे वर्तमान येईल तैसें लिहिण्यांत येईल. आंग्रेज निवळ श्रीमंत दादासाहेबांचेच पक्षावर नाहींत. कांहीं आणिक चालीवर आहेत. शुजायतदौरेचे लो-लेक आपली कंपु तयार करितात. नजफखानाचें सूत्र आहे. हें वकिलीचें लिहिणें नाहीं, वर्तमानें सावकारी पक्की आहेत. याहीवर न कळे! विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९०.
श्री.
१७०० ज्येष्ठ-आषाढ.
सां नमस्कार विनंती उपरी. फरांसिसांचे येथें तीन वकील आले आहेत, त्यांचें व आमचें बोलणें जाहालें, ह्मणोन विस्तारें लिहिलें तें सर्व कळों आलें. आणखीहि कित्तेक मजकूर विस्तारें लिहिले ते कळले. तुमच्या लिहिल्याचे अन्वयें श्रीमंतांस विनंती केली. हे विशींचें बोलणें येथें बहुत जाहालें, तेव्हां खातरजमा जाहाली. उत्तम आहे, हे आज्ञा जाहाली. संशय इतकाच जे, कोणती गोष्ट करणें ते बहुत विचार करून करावी. केल्या मर्जीनुरूप फल आल्यास उत्तम. कदाचित् न घडल्यास करण्यास दोष येतो मोठ्या गोष्टीस पेंच. जे तुह्मांसीं बोलतात, त्यांची खातरजमा येथें केली. परंतु त्यांचेच स्वाधीन कोणताहि प्रकार नसिल्यास मग काय होणें हें कळतच आहे. याकरितां आज कोणतेहि गोष्ट नमुदांत आणणें हें ठीक नाहीं. यारितां याचा विचार पुर्ता करून, तेथें आपणांस त्यांसीं जें बोलणें तें बोलावें आणि जो निश्चय करणें तो करावा. सर्व अर्थ त्याचे हातीं. येविशीं तुमची खातरजमा जाहालियासच करावें. नाहींतर ठीक नाहीं. घोडे स्वाधीन नसिल्यास बसणार काय करितो ? सर्व अर्थ तुमचे ध्यानांतच आहेत. करण्याविशीं येथील मर्जीचा संतोष आहे. पक्कें मात्र असावें. घोडे स्वाधीन आहेत यांत संदेह नाहीं, हे खातरजमा तुमची जाहलियावर तेथेंच जो निश्चय करणें तो तुह्मींच करावा, येविशीं आलाहिदा तुह्मांस चिठी आहे. हेच दाखवून खातरजमा करावी आणि कार्य करावें. गुंता नाहीं. जाहिराणा पत्राचा सिलसिला हा प्रकार केव्हां घडेल ? येथील मर्जीनरूप एकदोन प्रचिती येतील तें करून दाखवितील, तेव्हां जे गोष्ट होणें ते स्पष्ट होईल. तोंपर्यंत करणें ठीक नाहीं. याप्रमाणें आज्ञा जाहाली. कळावें. तुम्हांकडून याचाविषयीं ग्रहस्थ आले ते भेटले. त्यांसहि हाच मजकूर सांगितला आहे. त्यांचें पत्र आलाहिदा गेलें आहे व हालीं आहे, त्यावरून कळेल. कार्य जाहलियावर तुमचें पत्र आलें म्हणजे येथील मर्जीनरूप जे सला तुम्हांस लिहिणें ते लिहूं. त्या अन्वयें प्रचितीस यावें ह्मणजे सर्व गोष्टी मनोदयानुरूप घडतील, भोंसले याचें व इंग्रजांचें सूत्र आहे म्हणून येथें वर्तमान दाट आहे, व बुंदेले यांचे लिहिण्यांत आहे, व पलटणें आलीं आहेत, त्या समागमें बेणीरामपंत आहेत, ऐसें असोन तुह्मीं कांहींच लिहिलें नाहीं, हें काय ? तस्मात् तुम्हांस कळलेंच नसेल. तरी येविशींचा बारिकाईकानें पक्का शोध करून लेहून पाठविणें याउपर कोणे विशींचा आळस एकंदर नसावा. बहुत सावध असावें. बारकाईनें जें वर्तमान आढळेल तें वरचेवर लिहीत जावें. दिवस बहुत नाजूक आहेत व संधीचे आहेत. फार जपावें. येविशीं सहसा सुस्ती नसावी. पत्र वाचून फाडून टाकणें. मार फार नाजुक आहे याकरितां ही विनंती. इकडे, मध्ये मोरोबाची वगैरे घालमेल जाली. त्या दिवसांत तेथील डोळे ठिकाणीं नव्हते. सरंजाम वगैरे जप्त केला होता. त्यास मागती देतात आहेत, म्हणोन तुह्मीं लिहिलें. त्यास, उत्तम आहे. द्यावा. आपण आपले तर्फेनें, त्यांचे डोळे ठिकाणीं नव्हते, हें दर्शऊं देखील नये. याचें कारण नाहीं व येथेंहि त्याप्रमाणेंचा निश्चय आहे. तुह्मींहि दर्शऊ नये. रंगामेजी व खातरजमाच आहे. हे विनंती......विनंती फरांसिसाचे वकिलाचें पत्र पों त्यास, जो येथें वकील होता तो गेला. पत्र आम्हांजवळच आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(लेखांक २७) लेख अस्सल आहे. शिवाजीच्या वेळीं मिठाचा सरकारी मक्ता होता. ह्या पत्राच्या पाठीवर खालील पद बाळबोधींत आहेः-
दारें आडकुनी गौळनी । विकु गेली सांजवणी ।
मागें कृष्णाची करणी । काये करीता जाला ।
सवे दोनी चारी मुलें । त्यासी हळुहळु बोले ।
लोनी खाल तरी यारे मज सांगातें ।
यैसें विचारून हरी । प्रवेसला येके घरीं ।
नेणो कवणिये कुसीभीतरी । संचरला ।
द्वारें तैसीचि कवाडें आपण भीतर लेकडे ।
धुंडाळीतु असे ङेरे खाई गोरसाचे ।
कृष्ण चोरटा गे माये चोरटा गो ।
ऐसा चोरटा श्रीपति । जो नकळे वेदा श्रुती ।
ती म्या लोनी खाता निऊता देखिला सये ॥१॥
पायी होत्या घागरिया । सोडुनिया ठेविल्या ।
अदु वरुते केले । वाजती म्हणुनी हळुचि घालिती पाउलें
कवणु कवणासी नो बोले । लोनियाचे माथुलें ।
आणिती पाठे वाटी । तूप होतें अळसलें ।
दूध पीती विरजलें । ठेविती झाकुनि । आजि बरवें फावलें ।
बहुता दिसी पोट घाले । अवघें कृष्णासी मानवलें ।
तुझा बरवा सगु कृष्णु ! ॥२॥
शिंका होतिया घागरिया । त्या ठेविल्या माजघरी ।
जेथ आळमाळू अंधारी तेथ ठेवितातु ।
दयावरील स्वीळरी । हळुचि काढिती कुसरी ।
तें घालिती कृष्णाकरी । हरि स्वीकारी जो ।
मग बैसोनि येकवटा । काये बोलले सुभट ।
घास घेती मटमटा । खदखदा हासतीं ।
अजी बरवें फावलें । बहुता दिसीं पोट घालें ।
अवघें कृष्णासी मानवलें । तुझा बरवा सगु ॥३॥