लेखांक ३८५
१५४० आश्विन वद्य ७
(फारसी मजकूर)
अज दिवाणि रखतखाने रवास बजानेबु कारकुनानी व देसमुखानी सा। दौलताबाद व मुकासाईयानी व हुदेदारानी अजहती मुकासाई हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे चाभारवाडी पा। एळूर सा। मजकूर बिदानद सु॥ सन तिसा असर अलफ नारायणभट बिन दामोधरभट व प्रभाकरभट बिन रामेश्वरभट सो। आरवी मुदगल बदगी हजरती मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक गज सरायनी दर सवाद मौजे चाभारवाडी पा। एळूर सा। दौलताबाद देखील नखतयाती ता। देहाये व ता। ठाणे व पायपोसी व वेठीबेगारी कुलकबाब व कुलकानु बाहुजती विठोजी राजे भोसले अर्बा असर व अलफ छ २० माहे सौवालु आहे फर्मान बसिके खास मर्हामती होय मालूम जाले बाइसारुफाती दिवाणआला बराये इलतमेस देवविले नारायणभट बिन दामोधरभट व प्रभाकरभट बिन रामेस्वरभट सो। आरवी मुदगल यासि इनाम जमीन चावर एक गज सरायनी दर सवाद मौजे हुजती सदर्हूप्रमाणे करार केले असे ता। समान असर अलफ जैसा भोगवटा व तसरुफाती चालू असेली ते चि दर निसबती दुमाला कीजे औलाद व अफलाद चालू दीजे दर हर साल फर्मानाचा उजूर न कीजे तालीक घेऊन असेली फिराऊन दीजे
मलिक अजम एकदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० माहे सौवालू जमीन चावर एक बा। सवाद दफता खास मोर्तब सुदु
तेरीख १७ माहे
पा। हुजुरु