[ १० ] श्रीवरदमूर्तिर्जयति २५ नोव्हेंबर १६६०.
सरंमाजी. छ रबिलाखर, सु ।। इहिदे सितैन अलफ.
राजश्री निळोपंत मजमूदार यास वतनीचा कारभार करावयास ठेविलें. माहोलीपासून भीमगडपावेतों व इंदपूर, पुणें, चाकण कदीम वतनीचा कारभार करावा. यासी, पंडित मा । इलेनें साहेबासी अर्ज केला की :- आजी कागाचे दिवस आहेत. वतनीचा कारभार आणिक कोण्हास सांगावा. आपण बराबरी येऊन दाहा लोक कामें करितील तैसी करुन देऊन गड घेणें पडिलें तरी घेऊन देऊन. ऐसा अर्ज केला. त्यास साहेबीं उत्तर दिधलें कीं :- वतनी राहाणें हेंहि काम थोर आहे. वतन राहाणें. येथें तुह्मांस बकशीस इमारतीस पैके पावतील त्यास दर सदे होन २ दोनीप्रमाणें पावतील. ऐसे साहेब बोलिलियावरी पंडित मा । इले बोलिले कीं:- जरी वतनीचेंहि काम थोर आहे तरी बहुत बरें. एकानें सिद्ध संरक्षण करावें. एकानें साध्य करावें. दोन्ही कामें साहेब बराबरीनें मानिताती तरी आपण वतनीं राहोन. परंतु इमारतीचे पैके पाववून बकशीस घेणार नाहीं. मोरोपंत त्रिंबक व शिवनेर येथें पाठविले आहेत ते गड घेतील व मुलूक घेतील, कामें करितील. साहेब थोर कामास जाताती तें काम श्रीचे कृपेनें होऊन येईल. त्यास राजश्री मोरोपंतास मेहेरबानीनें पंचवीस फुलें दिधलीं तरी आह्मांसहि वीस फुलें द्यावीं. ऐसा साहेबीं निश्चय केला पाहिजे. त्यावरी साहेबीं ऐसाच तह दिधला कीं :- वतनीं राहोन कारभार करावा. इमारतीचे पैके पाववून बकशीस न घ्यावें. राजश्री मोरोपंत काम करितीली, गड घेतली, पैके मि ( ळ ) वितील, सुरगिरीचा प्रयत्न करुन घेतील. त्यास, मेहेरबान होऊन, पेशवे आहेत याकरितां पंचवीस फुलें दिधलीं तरी, तुह्मांस मजमूच्या काईदियानें, वतनीचें काम तें काम बराबरी ऐसें समजोन, त्यास द्यावीं तेच वख्ती तुह्मांसहि २० वीस फुलें पाठवावीं. या हिसेबा ( नें ) जैसें त्यास पावेल तैसें तुह्मांस देऊन. ऐसा साहेबीं निश्चय करुन पंडित मा । ईलेस वतनीचा कारभार करावयास ठेविलें असे. पंडित मा । ईलेनेहि सदरहूप्रमाणें मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )