कित्ता एक. रदबदल राजश्री निळोपंती केली कीः-
साहेब वतनी कारभारास ठेवीत आहेत. यास, कोण्ही कैसा वर्तेल, कोण्ही कैसा वर्तेल. यास, आपणास जे गोष्टी दाखल होईल ते गोष्टीची वाजीखुसी करुन. जे दखल नव्हे आणि साहेबास कळेल ते ते साहेबीं आपणास सांगावी. आपण वाजीखुसी करुन. परंतु लोक गैरमाकुल आह्मांस नकळत वर्तले तरी त्याची बदलामी आपणावरी न ठेवावी. आपण खुतुत गैरमाकुल सहसा वर्तणार नाही. कारभारमुळें दाहा लोकांसी बरें वाईट बोलावे लागत आहे. एखादियाने लटकेंच कांहीं सांगितलें तरी ते गोष्टीटी बरी चौकशी करावी. सांगितलियावरुनच मनांत गैरमेहेरबानी न धरावी. बाजी खुसी करिता नेमस्त खुतुतु तमा आढळिली तरी मग जे नामेहेरबानी करणें ते करावी. लोक गैरमाकुल वर्तले तरी जो जैसें करील तो तैसा पावेल. त्याची बदलामी आपणावरी नाहीं. येणेंप्रमाणे साहेबीं मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
कित्ता एक. रदबदल कीं वतनीचा कारभारसाहेबीं आपणास सांगितला आहे. यासी, काय गैरमाकुल कारभार होईल त्याची मुनसीफी साहेबीं करावी, किंवा आमची आह्मावरी टाकावी. रा । अनाजीपंताचे सांभाळी न करावी. ऐसे बोलिलियावरी साहेबीं मान्य केलें असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
कित्ता एक कलम. पंडित मा । इलेनें अर्ज केला केला कीं :- आपण कारभार करणें तो ऐसा करुन की जैसा आपले घरींचा खुतुत कारभार. ज्यान फाइदा समजोन करीजेत आहे ( त ) तैसा करुन साहेबीं मेहेरबानी मात्र असो द्यावी. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )
येणेप्रमाणें सदरहू कलमांचा तह साहेबीं दिधला असे. मोर्तब सूद.
( मर्यादेयं )
( विराजते )