लेखांक ४३०
१५२३ मार्गशीर्ष शुध्द १३
ता।
महजर श्री सके १५२३ पलव सवछरे मागीस्वर सुध त्रयोदसी सुक्रवार ते दसी चाकण-स्थल-सील-सभे विदमान महजर केला ऐसा जे १५२१ विकारी सवछरी तकरीर केली ऐसी जे मुद्गलभट पुडले समस्त ब्राह्मैनी समापत्र केले जे ब्रह्मियाचे उत्पन इतके बहुताचे पींडदान व नांदीसराद व चक्रेस्वरीची पुजा व आउलीची पुजा व तुलसीची पुजा व आबिठियाचियाची पुजा व पीपलाची पुजा व स्त्री-पुरुसाची दोन अनंतव्रते होतील तेथील हि एक वाण व रोठे व थालीपाक व हिरण्या अष्ठ वर्ग इतुके बहुताचे ह्मणौनु तकरीर केली याउपरी आह्मी ब्रह्मी ह्मटिले ते सदरहू सकल हि आपले याउपरी सभा केली देवाळी मुख सभानायक देसमुख व साल पाटिल व आनाजी कुलकर्णी व देउजी तेली मुतालीक देसमुख व भिकू सुतार हे समस्त बैसोनु गावाती ग्रहस्थ + + + + गोपालबा सराफ व नरसावा खुताड व तिमाजी राम व आनाजी कुळकर्णी व नागोवा गाढवा हे पाचारुनु याचया माथिया वरी देवाचा पाला घालुनु घालू न ये तैस्या आणा घालुनु पूसिलेयाउपरि ते बोलिले जे पीडदानादी सकल कर्मे ब्रह्मियाची ब्रह्मे च खाताती यावरी सकल वादी खोटे जाले ते तकरीर नागोवा गाढवेयाने देउजीस नमस्कार करुनु तकरीर घेउनु फाडिलियावरी आजी तागाईत ब्रह्मियाचे ब्रह्मे खाताती दुसरियास समंधु नाही हा महजर सही
गोही
सीवाजी व सूर्याजी देसमुख सील सेटी सेटिया का। मा।
साल पाटिल खराबी का। मा। दसम सेटी सेटिया तांबोली
बहिरसेटी माहाजन आनाजीराम कुलकर्णी
बकाल
जानभट ढेरे जोगो पाटिल रातांधोली
पदमाजी आउदेऊ नरहरी मनाजी सराफ
जुनारदार
गोविंद पाठक देउकुले