[ ८ ] अलीफ
श्री राऊ प्रौढप्रताप दिनकर राजाधिराज महाराज राजश्री शिवाजी राजे महाराज स्वामी गोसावी यांचे शेवेसी :-
किंकरें तापीदासदलाल अज् जाबती कपीतानें फ्रांशेश मो । पेंठ रायबाग रामराम विनंति येथील क्षेम महाराजांचे कृपेस्तव जाणोन महाराज साहेब आपलें क्षेमरोज वैभव लहावया आज्ञा केली पाहिजे. याउपरि- महाराजांनीं सेवकावरी अमृतव्रीष्टी करुन पत्र पाठविलें तें छ १५ माहे रविलोवली उत्तम समयीं पावून बहुत संतोष होऊन शिरसावंदून सनाथ जाहालों. वा । इजत रफअत द्दशागाह: मुशे दुरो साहेबासी सराफराजनामा पाठविले होते तेंहि शीरदीदे ठेवून बहुत संतोष जाहाले. आज्ञा केली होती जे दाभोळ बंदरास तुह्मीं येऊन, सौदागरी करुन सराफराज होणें. ह्मणोनु तरी पहिले आह्मीं बंदर राजापुरीं असतां राजश्री निळो सोमनाथपंतांनीं आह्मांसी किफायतीयाबाबे लिहिलें होतें. त्याचें तालीक लेहून बंदर सुरतासी आपला साहेबापासी पाठविलें होते. त्याचा जबाब अजुनी आला नाहीं. आतांही महाराज साहेबीं लिहिलेवरुन त्यां लिहिलेचें तालीक लिहोनु, तें आपलेतर्फेनें बहुत कांही लिहून, मुद्दाम अदमी करुन त्याबराबरी बंदर सुरतेसी रवाना करितों. तेथून जैसा रजा सादीर होईल त्याप्रमाणें वर्तणून केलें जाईल. विशेष लेहावें तरी महाराज साहेब आरीफ असेती. शेवकावरी निरंतर अमृतव्रीष्टी असो दिल्हे पाहिजे. हे विनंति. खामा वेक तापीदास तवाहीदास.