Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५८०

श्री
१७२४ ज्येष्ठ शुद्ध १३

वेदमूर्ती राजमान्य राजश्री हरभटबाबा व सखारामभट स्वामीचे सेवेसी:-

सेवक रामराव बगाजी कृतानेक सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। ज्येष्ठ शुद्ध १३ मुकाम लष्कर नजीक पुण्यस्तंब जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. ( सर ) कारी फौजा गंगातीरीं आल्यामुळें तिरस्थळीचे ब्राह्मण बहुत भयाभीत जाहले आहेत. त्यावरून पत्र पाठऊन, क्षेत्रींचे ब्राह्मणांची खातरजमा करून, फौजेकडील सरदारांकडूनही कोणेविशीं उपसर्ग न लागे, तो अर्थ करावा. म्हणोन विस्तारें लेखन केलें. त्यावरून राजश्री फत्तेसिंगराव माने यांजली पेशजीं सांगून खातरजमाचीं पत्रें दिल्हींच होतीं. हालीं आणखी सांगून सरकारीपत्र व कोणी हरामी यांचे नांवें चिठी असें पाठविले असेत. येथूनही ताकीद करावयाची तितकी करीतच आहोंत. सरकारीपत्र तुमचे क्षेत्राचे नांवें व स्वारप्यादा यांचे नांवें ताकीदपत्र दिल्हें आहे. तें ठेऊन घेऊन, जो कोणी येईल त्याजला दाखऊन, आपले जवळ ठेवींत जावें. उपद्रव लागणार नाहीं. येविशीं रा। बाजीकडीलही ताकीद आह्मांस पहिल्यापासून आहे. परंतु आमचें चालेल तेथवर आळस होणार नाहीं. आपलेंही सर्व ध्यानांतच असेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.

पत्रांक ५७९

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध १३

वेदमूर्ती राजमान्य राजश्री हरभटबावा व सखारामबापू स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी सखाराम सदाशीव करद्वय जोडून सां नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम ता जेष्ठ शुद्ध १३ मुकाम लष्कर नजीक पुण्यस्तंब येथें आपले आशी र्वादेंकरून यथास्थित असों, विशेष. आपण कृपा करून आशीर्वादपत्र पा। ते पावलें. लिहिला मजकूर की, श्रीमंत रा। येशवंतराव होळकर यांच्या फौजा घांटाखालीं उतरल्या आहेत. त्यांचे दहशतीनें त्रिस्थळींचे ब्राह्मण भयाभीत जाले. हें ऐकून ब्राह्मणमंडळी येवल्याचे मुकामीं आली. ते समयीं रा। बाबांची भेट करून सरदारांचे अभयपत्र दिल्हेंच होतें. हालीं गांडापूर प्रांतीं या बापू माणे आले. त्यांजला व पागेपथके येतील त्यांजला एक ताकीद पत्र घेऊन पा। द्यावें. ऐशियास, आपलें पत्र आलें तें बाबास दाखऊन सकारचीं पत्रें दोन व रा। नावाचे एक एकूण येणेंप्रा सेवेसीं पा आहेत. पावतील, लष्करचा करभार. आणि वर आस्तवस्त फार. आपल्यास उपद्रव लागल्यास बाबास पत्र लिहीत जावें. ते बंदोबस्त करितील. चिंता नाही. इ. इ. इ.

मग त्रिंबक गोमदेवास बोलिले जे तुह्मी कोण एता त्यासि निंबाजी कुसाजी दाखविला मग रामाजीपत बोलिले की तुह्मीं चालणे अगर कळेचा भाऊ देणे याउपरि राजोपत आपला पुतण्या दिधला मग तैसे च स्वार होऊन अवरंगाबादेस दरबारास गेले तेथे वादियासि वाद सांगितला मग हजरतजिलसुभानी बादशाहाजादे याचा हुकूम सरदाबेग दारोगे व निळो कृष्ण अमीन प्रा। पुणे याजवरी जाला की देसपांडेपणाचा परगणे सुपाचा मोकदमास कुल परगणाचे हाली मवाली व मोकदम देहाय व गर्दनवाईचे जमीदार मेळऊन तहकीक करून महजर करून हजूर इरसाल करणे की त्याबमोजीब इनसाफ केला जाईल ह्मणौन हुकूम जाला त्यावरून रामाजी बाबाजी पुणियासि गेला तेथे वादिया हि आला मग पुणियाहून कुल परगणियासि व मोकदम व हालीमवाली व कितेक गीर्दनवाईचे जमीदार जमा केले तेथें वादिया हि आला मग पुणियाहून कुल परगणियासि व मोकदम व हालीमवाली व कितेक गीर्दनवाईचे जमीदार जमा केले तेथे देवाजी व यादव मजकुराचे बापभाऊ त्रिंबक गोमदेऊ व तिमाजी मल्हार वगैरे लाहाण थोर जमा होऊन पुणियासि गेले तेथे कचेरीस अदालत करून बमोजिब हुकूम माफीक जाबिते तहकिकाती कुल मोकदम शा शा वरसाचे व ऐशी पाऊणशा वरसाचे पुरुश होते त्यानी शाहादिया दिधल्या की रामाजी बाबाजी बिरादर विठल माहादेव व राजो सखाजी बिरादर त्रिबक गोमदेऊ याचे वडील वडील आपले देसपाडेपण करीत आले हाली हि हे च करिताति ऐसे आपण पाहातो आणि आपले वडील हि ऐसे च सागत आले आहेत ह्मणौन शाहादिया दिधल्या आण महजर करून औरगाबादेस पाठविला दखलवाकाय केले याउपेरी रामाजी बाबाजी हजूर औरगाबादेस मागती गेले वादिया मजकूर खोटा जाला याउपेरि हजरत बादशाहाजादे यानी निशाणाचा हुकूम केला त्यावरून निशाण व परवाना बमोहर मकरमतखान दिवाण याचा हासील केला आणि वादियाचे यजितखत बतरीक महजर दर कचेरीत करून घेतला मग परगणे मजकुरास आले तेथून राजश्री राजेसाहेबास सरदहू सनदा दाखविल्या बहुत खुशवख्त जाले की जबरदस्ताच्या चुगालापासून गरिबाचे वतन खलस जाले मग रामाजीपतास राजेसाहेबी फर्माविले की पताजीपताचा विश्वास न धरणे एखादे जागा दगा देईल बहुत खबरदार राहाणे मग निरोप घेऊन गावास आले तो कितेका रोजा दक्षणेचा सुबा नवाब खान जाहा बाहादूर त्याचा हरोल नवाब दलेलखान जाले ते भिवरे अलीकडे बदमवेसी करून मुलुक ताराज करू लागले आणि पेडगावी बाहादूरगड बाधाला तेणेकरून आपला परगणा कुल वैरान मुलुक बेचराग जाला ते समई माणकोपत व सिदोपत व देवाजी मजकूर बाप त्रिंबक गोमदेऊ व तिमाजी मल्हार ऐसे सासवडाकडे गेले रामाजीपत पेडगावास आले कुल ज्याच्या चित्तास. आले तिकडे गेले याउपरि हजरतजिलसुभानी बदौलत दक्षणेस आले तेथून ठाणे का। मजकूर खानवालाशान मानूरखान आले ठाणे कायम करून रसूलकान मयाणी यास ठेऊन गेले सन १०९३ याउपेरि कितेका रोजा हजरत बादशाहां तुळपुरास आले ते समई खानवालाशान जुलफकारखान रायती फते करून राजश्री स बराबर घेऊन आले ते समई कुल परगणाचे जमीदार हजूर तलब केले की तमाम मुलुक आबाद होए ह्मणौन मुचलके लेहोन घेतले ह्मणौन तलबा केल्या ते समई रामाजी बाबाजीस हि तलब केली ते दरबारास तुळापुरास कुल परगणा घेऊन गेले कुल मुलकास सिरपाव देऊन कौल घेतला तो माहादाजी यमाजी बोकिल दिवाणचे कचेरीस उभा राहिला की सुपाचे देसपाडेपण आपले आहे त्यावरून रामाजीपतास दिवाणे हजूर बोलाऊन पुसिले की हा कोण आहे त्यासी रामाजीपती जाहीर केले की हा तुफानी झुटा आहे मग माहादाजी मजकुरास पुसिले की तुजपासि सनदपत्र आहे की काय तो बोलिला जे सनदपत्र नाहीं मग दिवाणे फर्माविले की यासि बाहेर काढून देणे त्यावरी माहादाजी मजकूर कचेरीतून दूर केला तो लस्कर हि कुच जाले विज्यापुरास चालिले लस्कराबराबर रामाजी बाबाजी चालिले वादिया लस्करात आहे आपण गेलियाउपेरि मागती लबाडी करील ह्मणौन विज्यापुरास गेले तो मेहेरचद पेशदस्त दक्षण कचेरीचा त्यास खबर कळली की सुपाचे देसपाडिया हमराहीमधे च आहे अझणु परगणियात गेला नाही मग चोपदार महसल लाविले आणि लस्करातून च्यार कोसी काढिले की परगण्यास जाऊन आबाद करणे मग रामाजीपती शामजी बरवाजी व शामजी त्रिमळ ऐसे दोघे कचेरीस ठेऊन रामाजीपत व देवाजी गावास आले त्यावरी कितेका रोजा शामजी बरवाजी व शामजी त्रिमळ हे हि गावास आले याउपेरि तिमाजी मल्हार व देवाजी मजकूर बारामतीच्या कारभाराबदल खटखट केली की आपण तुमचे निमे भाऊ आण आपणास बारामतीमधे कारभार कायबदल नाही ह्मणौन भाऊपणियात बहुत च खटखट माडिली मग कुल अवघे भाऊ बसोन तह केला की मागे भाऊपणाची वाटणी आहे आण वतन खातो आणि बारामतीचा कारभार करीत नाहीत आता मागता खटखट जालिया उपर मागे वाटणी जाली ते नाही जाली जणो आता च नवे वेगळे निघालो आण वाटणी करून वतन भाऊपणा वाटून लेकराचे लेकरी खाऊन मग शामजी त्रिमळ नेऊन बारामतीस यासीनखानाचे हवाले केला की हा आपला निमेचा भाऊ बारामतीचा कारभार करील तै पासून शामजी त्रिमळ भाऊपणे बारामतीस कारभार करिताती हे तकरील कैली सही

पत्रांक ५७८

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ११

स्वामीचे सेवेसीं: सेवक धोंडो बाजीराव कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना, येथून फौज लासुरावर पठाणाचे फौजेवर जाऊन लढाई घेतली. तोफा वगैरे हस्तगत जाहल्या. खासा पठाण व मान्या शेंदोनसें लोकांनिशीं लासुरास गेला आहे. गांवचा आसरा करून जीव लपविला. आपले कृपेंकरून प्रहरादोनप्रहरांत तोही हस्तगत होईलसे दिसतें. ईश्वरस्त्रस्थळीचे आशीर्वादें फत्ते जाहली. आपणास कळावें, म्हणोन विनंती लिहिली आहे. आगाऊ ऐवजाविशीं विनंती पत्र लिहिलें आहे. तरी, या प्रसंगास तूर्त दोन हजार रुा पाठऊन द्यावे. येणेंकडून स्वामींचा लौकीक होऊन मलबादादा यांजवर बहुत कृपा केलीशी होईल. आणि उपकाराचा अर्थ बहुत दिवस आठव आहे. वाणीयास ताकीद करून जिन्नस रवाना करून द्यावा. भरंवसा जाणून विनंतिपत्र लिहिलें आहे. तरी, अगत्यरूप ऐवजाची सरबराई करावी. येवेळ अनमान करूं नये, अणमान केलियास तुह्मांस श्रीची शपत असे. शेपत घालून लिा म्हणोन रागास न यावें, जरूर जाणून विनंती शेपतपुरस्कर लिा आहे. शेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक ५७७

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ११

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नाना दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी धोंडो बाजीराव कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। ११ माहे सफर पर्यंत यथास्थित असे. विशेष. येथून सडी फौज तयार होऊन पठाण नि। होळकर यांचे फौजेवर गेली. यांची त्यांची लढाई जुंपली आहे. श्रीहरी कृपा करून यश येईल तेव्हां खरें, परंतु फौजेस खर्चास पाठविलें पाहिजे. याजकरितां रोजगुदस्तां शिदूजी पा आपणाकडोन येथें आलें होतें, त्याशींहि समक्ष बोललों होतों. त्याणीं आपणास निवेदन केलेंच असेल. अणि विनंतिपत्र लिहिलें आहे. तरी, कांहीं ऐवज पाठऊन द्यावा, एथें ऐवज येऊन दाखल जाहल्यास चिठी लेहून पाठऊं. परंतु, या प्रसंगी स्वामी महाराजांनी आनमान केल्यास आपल्यास युक्त दिसणार नाही. भरवंसा जाणून विनंतिपत्र लिहिलें आहे. अव्हेर न करितां पांचहजार पर्यंत सरबाई करून पाठवावी व गांडापूरचे वाणीउदमी निघोन कायगांवास आले आहेत. त्यांस ताकीद करून येथें पाठऊन द्यावें. आणि कांही दोन खंडीची कणीक व दाहा पंधरा मण तांदूळ व डाळ तुरीची एक खंडी व तुपाच्या जोड्या एक दोन बैलांवर घालून पाठऊन द्यावे. येविशी तिळमात्र आणमान होऊं नये. तेथून सरंजाम न आल्यास कायगांवास येईल. नंतर आपण दोष ठेवितील. जाणून सरंजाम जलद पाठऊन द्यावे. व ऐवजावीशी अनमान न करितां ऐवज हरतरवीज करून पाठऊन द्यावा. या प्रसंगास सरबराई केलि. यास. तीर्थस्वरूप राजश्री मलबादादा याजवर बहुत उपकार आहे. शेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक ५७६

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ४

राजश्री नारायण बाबूराव स्वामी गोसावी यांसीः-

विनंति उपरी. तुह्मीं छ २ सफरचें पत्र पाठविलें तें पावलें. येशवंतराव होळकर याची चाल हिकडे, याप्रों वर्तमान चहूंकडून आहे. येविशींचा विचार करणार स्वामी समर्थ आहेत, ह्मणोन लिहिलें. त्यास, या मजकुराचें रा। बाळोजी कुंजर यांजकडून काल पत्र आलें, त्याचें उत्तर सविस्तर लिहून पाठविले आहे. त्यांत तुह्मांस व रा। निंबाजी भास्कर यांस घेऊन विचार करावा. असें लिहिलें आहे. तें तसेंच करतील. दुसरा मजकूर तुह्मीं नाजुक लिहिला व नांवनिशीची याद अलाहिदा पाठविली ती पावली. संगतवार मजकूर चांगला लिहिला तो हुजूरचेहि मनास प्रशस्त वाटला. नांवनिशीं लिहिली त्यांत एकाधे ठिकाणीं एकाधा गुण मिळतो, एकाधा मिळत नाहीं. यांजकरितां आणखी नांवें, बावास व तुह्मांस सुचतील तीं या कामास योग्य अशा माणसांची लिहून पाठवणें. जाणिजे, छ ३ सफर, हे विनंती.
पो छ ४ सफर ज्येष्ठ शुद्ध ६ शुक्रवार शके १७२४

पत्रांक ५७५

श्री.
१७१४ वैशाख.

विशेष. आपण स्वारीसुद्धां खानदेशांत आला. पुढें या प्रांतीं फौजसुद्धा येणार हें वर्तमान ऐकिल्यावर बहुत संतोष जाहला. राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजासुद्धां पुढें याप्रांतीं रवानगी जाली. जनवार्ता जे, उपद्रव आहे याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण भयभीत जाले. परंतु सर्वांचे मनांत कल्पना आली जे, मुख्य ठिकाणाहून क्षेत्रास उपसर्ग होऊं नये, अशी ताकीद असेल, असें जाणून माने यांजकडे तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण श्रीफळ घेऊन गेले. तेथें गेल्यानंतर ब्राह्मणांचा सन्मान करून आपलें नांवें सर्व ब्राह्मणांस अभय पत्र दिल्हें जे, स्वस्थपणें स्नानसंध्यां करून राज्याचें अभीष्टचिंतन करून असावें. त्याजवरून परम समाधान जालें. आणि लौकिकांत ऐकिल्यांत आहे जे, ब्राह्मणांविषयीं बहुत ताकीद भक्तिपुरःसर आहे. त्याप्रो अनुभवहि दृष्टोत्पत्तीस आला. पूर्वापार आपले सरदारींत व संस्थानाविषयीं आस्थाच आहे. तेणेंकरून ईश्वरें सर्वोपरीं फत्तेच केलीं. प्रस्तुत, आपणाकडील फौजाचीहि वर्तणूक पूर्वसांप्रदायानुरूप होईल. येथील संस्थानाकडे पा गांडापूर माहालचे मौजे कायगांव व कांठेपिंपळगांव व जोगळें पो। नेवासें असें गांव आहेत. त्यास, पागेपथके यांचा उपसर्ग हरएकविशीं न व्हावा, येविशीं ताकीद आहेच. परंतु याअन्वयें ताकीदपत्र असावें. या तिरस्थळीस, शिंदे या प्रांती होते तों पावेतों, बहुत छळणा जाली. हालीं मीरखान पठाण वारीसिंगचे येथें आले. येथें गंगा उतरावयासीं येणार, ऐसें ऐकितों. त्याजवरून तिरस्थळी बहुत भयभीत जाली. त्यास या क्षेत्राविषयीं मीरखां यांस निक्षुन ताकीदपत्र * असावें.

पत्रांक ५७४

श्री
१७२४ वैशाख.

विशेष. आपण खासा स्वारी, फौजसुद्धां, खानदेश प्रांतीं आल्याचें वर्तमान ऐकून बहुत संतोष जाहला. पुढें राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजा या प्रांतीं रवाना जाल्या. जनवार्ता सैन्याचा उपद्रव. याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मणांस भय उत्पन्न जालें. सालगुदस्ता क्षेत्र कायगांव पेंढारी यांनी लुटले. त्या भयामुळें अधिक भय प्राप्त जालें ! परंतु फत्तेसिंगराव माने क्षेत्र पुणतांबें येथें आले. त्या मुकामीं त्र्यस्थळीं क्षेत्रस्थ ब्राह्मण श्रीफल घेऊन गेले. त्यांनीही अभय दिल्हें जे, आह्मांस येविशींची सुभेदारांची आज्ञा आहे जे, क्षेत्रास उपसर्ग देऊं नये. त्याजवरून सर्वांस संतोष जाला. हालीं नबाबअमीरुद्दौलाबहादुर फौजेसुद्धां का नजीक कायगांव गांडापूर येथें आले. त्याजकडीलही किमपि उपसर्ग क्षेत्रास लागला नाहीं. त्याजवरून माने यांचें सांगणें पडलें त्याप्रों ताकीद आहे, हें सर्वांस अनुभऊन संतोष जाला, तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? पूर्वापार आपले सरदारीXत या संस्थानचा अभिमानच आहे. तदनुसार हालीं आपणासही अभिमान आहे, हें दृष्टोत्पत्तीस आलें. या संस्थानाकडे पा। गांडापूर पो। कायगांव व काठेपिंपळगांव व कसबें सातारें पा मार व मौजे जोळकें पा नेवासें हे चार गांव सदावर्ताबद्दल इनामी आहेत. त्यास, साहा वर्षें या प्रांतीं शिंदे वगैरे फौजा होत्या. त्याचे उपसर्गामुळें एक पैसा नाहीं, सालगुदस्ता शिंदे हिंदुस्थानांत गेल्यापासून कांहीं वस्ती जाली. प्रस्तुत अमीरुद्दौलाबाहादर पो आंबड येथें गेले. त्यांचे मागें ठाणें बिडकी किनगांवींहून ठाणेदार यांणी सातारेयास चिठी पाठविली जे, मौजे कायगांव व सातारे दोन्ही तनखा दिल्ही आहे, त्यास कमरखुलाई व मसाला ६०० रुपये देऊन जाबसालास येणें. त्याजवरून अमीरुद्दौला याजकडेही कोणी बोलण्यास पाठविले आहेत. बहुतकरून आपली सख्त ताकीद आहे त्याजवरून निवरण होईल. परंतु वारंवार उपद्रव लागतात, त्याचा विस्तार पत्रीं काय लिहावा ? सा, रा। फत्तेसिंगराव माने व अमीरुद्दौला यांस व आणखी पागे व पथके यांस सदरहूप्रों निक्षून ताकीदपत्र असल्यानें ठीक पडेल, पूर्वीपासून या संस्थानाचा अभिमान आपले सरदारींत आहे. त्याप्रों आपण चालविल्यास श्रेयस्कर आहे. एक अभयपत्र तिरस्थळी क्षेत्रस्थ समस्त ब्राह्मणांस असावें.

पत्रांक ५७३

श्री.
१७२४ वैशाख.

विशेष. राजश्री येशवंतराव होळकर याजकडील फौजा या प्रांतीं येतात. याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण भयभीत जाले. परंतु सर्व ब्राह्मणांची काळजी आपणासच, याजमुळें येविशींचा बंदोबस्त जालाच आहे. येणेंकरून रा फत्तेसिंगराव माने व नबाब अमीरुद्दौलाबहादर यांणीं उपसर्ग दिल्हा नाही. परंतु अमीरुद्दौला यांचे ठाणें के।। बीड किनगांव वगैरे पौ। पैठण येथें आहेत. ते तेथून का सातारेंनजीक औरंगाबाद येथें स्वारासमागमें ठाणेदार चिठीपाली जे, नबाव यांनीं आह्यांस वरात कायगांवसातारे हरदू गांवावर दिल्ही आहे. त्यास, कमरखुलाई वगैरे रु। ६०० देऊन वरातीचे जावसालास येणें. याप्रों चिठी घेऊन स्वार
साता-यास गेले. त्यांनी तेथें उपद्रव विशेष दिल्हा. याच अन्वयें चिठी मी।। मारीं कायगांवीं आली. क्षेत्रास उपसर्ग होऊं नये, याप्रों आज्ञा निक्षुन आहे. असें उभयतां सरदार यांचेंहि सांगणें पडलें. परंतु या संस्थानाकडे का। सातारे पार मार व पा गांडापूर पा। कायगांव व कांठेपिंपळगांव व पो। नेमके पौ। मौजे जलकें ऐसें च्यार गांव सरकारांतून सदावर्ताचें बेगमीस देणें आहे. यास्तव, सदरहू च्यारी गांव व व्यस्थळी क्षेत्रास उपसर्ग हरएकविषयीं देऊं नये. याप्रों माने व अमीरुद्दौला यांस पत्रें असावीं. या अन्वयें सख्त आज्ञा आहेच. परंतु पत्रें असल्यास विशेष बचाव होईल. संस्थानाचा अभिमान सर्वोपरी आपणासच, त्याअर्थी विशेष लिहावेसें नाहीं.

[ ६३ ]                                            श्रीरामोजयति.                                          २९ मार्च १७०८.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३४ सर्वधारी संवत्सरे चैत्रबहुल पंचमी भोमवासरे क्षत्रियकुलावत्तंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित यासी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं आपलें वृत्त विस्तारें रा। गीरजोजी पिसाळ यास लिहून पाठविलें होतें तें पत्र बजिन्नस त्यांणीं स्वामीचे सेवेसी पाठविली. यावरून लिहिला आशय विदित जाहला. त्याचा सारांश हाच कीं, आपणास बंधूचा आग्रह सिंधुदुर्गास जावें, व तेथून आमंत्रणही साक्षेपयुक्त आलें आहे त्यास, आपला निश्चय स्वामीसमीप यावें याकरितां लोकांची स्वारी पाठऊन घेऊन जाणें ह्मणून लिहिलें. त्यावरून तुमचे निष्ठेचा अर्थ कळोन स्वामी संतोषी जाहले तुह्मीं पुरातन लोक, स्वामीचे ठायीं आर्त धरितां, तुमचा संग्रह करून चालवावें, यापेक्षां स्वामीस आवश्यक तें काय आहे ? प्रस्तुत, हें पत्र तुह्मांस लिहिले असे. तरी गिरजोजी पिसाळ याजकडील लोक तुह्मास बलावण्यासं पाठविले आहेत. तुह्मीं स्वार होऊन अवलिंबें दर्शनास येणें. तुमचे बहुमान गौरवास अंतर होणार नाहीं. प्रयोजन प्रसंगाचा अर्थ तुह्मीं कितीक लिहिला होता तरी तुह्मी कार्यभाग करावे, आणि स्वामीस संतोषी करावें, हे उचित आहे तदनुरूप दर्शनास येऊन स्वामीस संतोषी करून आपला मनोदय सिद्धीस पाववून घेणें जाणिजे बहुत लिहिणें तर तुह्मीं सुज्ञ असा. 
                                                                                                                                मर्यादेय राजते.