लेखांक ३७
इष्टजनमनोहर अखंडितलक्षुमीविराजित माहामेरू राजमान्य राजश्री रामाजी देसपांडे पा। सुपे
०॥ स्वामी गोसावी यास सेवक ठेवणाईत पिराजी व सुभानजि देसमुख व नरसोवा देसपांडे पाए दोणी कर जोडुनु दंडवत अनुकर्मे नमस्कार विनति उपरि एथील क्षेम जाणउनु माहाराजे आपले स्वस्तिक्षेम लेखन केले पाहिजे यानंतर माहाराजे कृपा करुनु पत्र पाठविले ते सिरी धरुनु सनाथ जालो यावरी माहाराजे पैकियाचे विशी लिहिले तरी दासोपंत कामास गेले आहेत व ते आलियावरी स्वामीचे पैकियाचे विल्हे करुनु देउनु दासोपंत ८॥१० रोजा एतील सर्वेच माहालीस पाठउनु देणे आणि आपले पैकियाचे निर्गम करुनु घउनु जाणे बहुत लेहू तरी आपण सेवक असो माहाराजाचे पायासी बहु अतर पडले आतां अंतर पडणार नाही कोप न कीजे सोडउनु लौकिक केला तो कीर्ती माहाराजाची जाली आहे आह्मी तो माहाराजाचे बहुत कृतउपकारी जालो आहो यावरी आह्मी लिहितां पुरवत नाही बहुत काय लिहिणे हे विनति