Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक ५४८

श्री
१७२३ फाल्गुन वद्य १
पौ फालगुन वद्य ३ इंदुवार प्रातःकाळ जाबसुद.

श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे शेवेसीः-

विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंति विज्ञापना ता। फालगुन वद्य १ परियंत आपले आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असो, विशेष. काल मंदवारी दों प्रहरा रात्रीं श्रीमंत तात्यांकडे पत्र सातारियाहून आलें. मार कीं, पेंढारी आजंठ्याचा घांट शुकरवारीं चढला. त्यावरून लोक फार भयाभीत होऊन गेले. ब्राह्मण मंडळी फार गेली. आतां राहतां पौ कुणबी व च्यार घरें ब्राह्मणांचीं आहेत. त्यांस धैर्य पुरत नाहीं. वस्ती फार गेली. याकरितां लोक भयभीत होऊन, निघावयाची जलदी करीत होते. त्यास, खातरजमा केली कीं, पेंढार घांट चहडला अशी पक्कीं बातमी आली, म्हणजे सरीसर्वत्र एकदांच निघून जाऊं. याप्रों खातरजमा केली. परंतु लोकांस धैर्य पुरत नाहीं. आपल्याकडील बातनी कांहीं कळत नाहीं. त्यास, शहरांत पक्की बातमी असेलच. त्याप्रों लिहावी. +++ हे विनंति.