Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८८
श्री.
१७२४ श्रावण शुद्ध २
श्रीमंत सौभाग्यवती वज्रचुडेमंडित मातुश्री चिटकाबाई बया यांसीः-
प्रति भास्कर विठ्ठल पटवर्धन सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। श्रावण शुद्ध २ मंदवार पावेतों मुा काळसूर वर्तमान यथास्थित असे. विशेष. मान्ये यांचा रोखा कान्हुरावर होऊन वीस हजारांचा खंड जाला. त्याचे वसुलास स्वार आले ते वाड्यांत राहून दंगा बहुत केला आहे. तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? ऐवजाचा भरणा होत नाहीं. पुढें काय होईल तें तें पाहावें. आपणाकडून सावजी गायकवाड आला. त्याणें आपल्याकडील सविस्तर...प्रसूत होऊन कन्या जाली, पंधरावीस दिवस जाहले, पठाणाचा मुकाम कापशी वडगांववर होता, तेथून स्वार रोखा घेऊन कायगांवीं आले आहेत म्हणोन सांगितलें. त्याजवर कांहीं समजत नाहीं. यामुळें चिंता बहुत लागली आहे. याजकरितां घमाजी ठवळे मुजरत पा। आहे. तरी कायगांवास कांहीं उपद्रव लागला किंवा निवारण जालें, येविशीं सविस्तर लिहून पाठवावें. आपण सध्याकाळी कोठें आहेत तेंही ल्याहावे. खांसा होळकर चाडवडास दाखल जाले, व पठाणही पैठणाकडे जाणार, म्हणोन इकडे वर्तमान ऐकण्यांत आहे. मान्ये यांणीं खंडण्या घेतल्या, त्या गांवापासून फिरोन पठाणाच्या खंडण्या होतात किंवा कसें आहे, हें सविस्तर लिहून पाठवावें, यजमान स्वामी उभयतां मुलांमाणसांसुद्धां पुण्यास सुखरूप आहेत. +++ हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८७
हू.
१७२४ श्रावण शुद्ध १
भाई नबाब अमीरउद्दौला बाहादर महफुज बाषंद:-
अजिदिल एकलास पाराशर दादाजी व गोपाळराव गोविंद सलाम आंकी, येथील खैरखुषी जाणोन, आपकी खैर हमेशा कलमें करीत असावें, दिगरः आपलेकडील ठाणें कसबें गांडापूर येथें आलें आहे, तेथून क्षेत्र कायगांव येथें स्वार पाठविले आहेत, म्हणोन क्षेत्रींचे ब्राह्मणांचे सरकारांत बोभाट आले. तेव्हां श्रीमंतांनी आम्हांस आज्ञा केली. त्याजवरून आपणास लिहिलें आहे. तरी ठाण्यांत कोण असेल त्याजला निक्षूण ताकीद पाठऊन, स्वार पाठविले असतील त्यांस मनाई पाठऊन, एक पैसा खर्च न घेतां, उठऊन न्यावे. व क्षेत्र टोंक व प्रवरासंगम व कायगांव ह्या तीहीं क्षेत्रींचे ब्राह्मण माहान समर्थ यजमान साहेबांचें कल्याणच इच्छून आहेत. त्यांस उपद्रव जाल्यानें कल्याणदायक नाहीं. व यजमानसाहेबांचें हि सांगणें आपल्यास आहे. त्यापेक्षा आपल्याकडून क्षेत्रास उपद्रव होणार नाहीं. परभारें आपल्यास न समजतां उपसर्ग होईल.तरी क्षेत्रास हरएकविर्शी उपद्रव न लागतां रखवाली होय तें करावें, क्षेत्रींचे ब्राह्मण आपल्याकडे येतील. त्यांस अभयपत्र देऊन, ब्राह्मणांत्ते समाधान व श्रीमंतांच्या मर्जीचा संतोष, व आपले यजमानाच्या कल्याणावरतीच गोष्ट द्यावी. आपण सुज्ञच आहां. त्यापक्षीं विशेष काय लिहावें ? रा छ २९ रविलावल ज्यादा काय लिहिणें ? प्यार मोहबत असों दीजे, हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ६४ ] श्री. २३ मे १७०८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३५ सर्वधारी सवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी मदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री परशराम पंडित प्रतिनि यास आज्ञा केली ऐसी जे.- तुमचेविसी कितिएक राजश्री रामचंद्र पंडित अमात्य याणी विनंती केली. ऐसियास, तुम्ही स्वामीचे, हितकृतर्मे, विश्वासू सेवक आहा. तुमचे सर्व प्रकारे चालवणे स्वामीस अगत्य आहे. याकरिता तुम्ही काही संदेह न धरितां व काही अनमान न करिता पत्रदर्शनी स्वार होऊन संतुबा यासह वर्तमान निघून स्वामीसंनिध दर्शनास येणे. स्वामी तुमचे पूर्ववत् चालवितील येविशी आनसारिखे काही न मानितां सत्वर येणे येविशी पडित मजकूरनिल्हेनी लिहिले आहे, त्यावरून कळो येईल. बहुत लिहिणे. सुज्ञ असा.
मयादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८६
श्री.
१७२४ आषाढ वैद्य अखेर.
तुह्मी छ २६ रावलचीं विनंतिपत्रें पा। तीं पावलीं. रा। येशवंतराव होळकर याची तुमची भेट होऊन तुह्मी सरकारचें आज्ञापत्र त्यांस दिल्हें व उत्तरें प्रत्योत्तरें जालीं, तो मजकूर लिा तो समजला. ऐशास येशवंतराव होलकर याची तुमची भेट जाली व सरकारचें पत्र होऊन तुम्ही देऊन बोलणें जालें. उत्तम आहे. तुह्मी आज्ञा घेऊन जाते वेळेस जें बोलणें त्याची आशा समक्ष जालीच आहे. त्या अन्वयें बोलून जसें ठेरेल तसें वरचेवर विनंति लिहून पाठवणें, मजकूर वरचेवर समजत जावा ह्मणोन तुमच्या लिा प्रों डाक बसावयाची आज्ञा जाली आहे. कळावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२ श्री १६४४ श्रावण वद्य ९
नकल बरहुकूम असल
राजश्री देशाधिकारी व देशक वर्तमान व
भावी सुभा पा। सुपे व बारामती गोसावी यांसि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्नेहांकित बाजीराऊ बल्लाळ प्रधान नमस्कार सु॥ सन सलास अशरीन अलफ नारो केशव व बाबूराऊ रामाजी देशपांडे पा। मा। याजवरी साबाजी रखमाजी व देवाजी त्रिंबक देशपांडे हे यांचे बापभाऊ तुफान करून उठले इ. इ. इ.
ह्या सनदेवर न्यायाधीशाचा शिक्का येणेप्रमाणे आहे.
*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८५
श्री.
१७२४ आषाढ वद्य ६
अज नवाब अमीरतदौला बाहादर ता। कमाबीसदारान जमीदारान मौजे कायगांव सुा। सलास मयातैन व अलफ, स्वारी याप्रातीं नजीक आली. आपले गांवास उपसर्ग होईल, सबब, अमरसिंग हलकारा पाठविला आहे. हा गांवचा बंदोबस्त आपणास सांगेले त्याप्रों करणें. च्यार स्वार ठेऊन, बाकी स्वारांस रवाना करणें, गांव घाबरें न होय, लोक जनांत आह्मांवर निमित्य न ये, तें करणें. आह्मांस सरकारआज्ञा कीं गंगातीरीची गांवें यांसीं
मुजाहीम न होणें. येविशीं आज्ञा ह्मणोन लिा असे. खातरजमेनें गांवचा बंदोबस्त ठेऊन राहणें. रा। छ १९ मोह रा।वल मोर्तब सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८४
श्री.
१७२४ आषाढ कृष्ण ४
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री यशवंतराव याप्रति-
लक्ष्मीनारायण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता आषाढ कृष्ण चतुर्थी रविवार पावेतों कायगांवीं यथास्थित असे विशेष. बहुत दिवस तुह्मांकडून पत्र येऊन कुशल मजकूर समजत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित आहे. तरी असें नसावें. सदैव पत्रद्वारें कुशलवृत्तलेखन करून तोषवीत असावें. यानंतर आह्मांकडील वर्तमान तों, या प्रांतीं फौजा आहेत. त्यांचें वर्तमान परस्परें कळेतच असेल. फत्तेसिंग माने यांनी तिरस्थळीवर हा काळ पावेतों कृपा केली आहे. पुढील न कळे ! मरिखां पठाण दाहा हजार हिंदुस्थानी, शिवाय पेंढार ऐशा जमावानिशीं वारीसिंगवे येथून वीस कोशांवर आहे. गंगा उतरावयास टोंक्यास येणार ऐसी वंदता आहे. त्याजवरून महद्धोर उत्पन्न झाला. श्री लज्या रक्षील ते खरी. असो. परस्परें सदैव पत्रद्वारें कुशलवृत्त कळवीत जावें. आह्मांस मंडूराची जरूर आहे. त्यास, दोन तोळे मंडूर कोणी सोईचा येईल त्याज बरोबर पाठवावा. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. +++++ हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८३
श्री.
१७२४ आषाढ शुद्ध १४
यादी. नाना पुरंधरे व बाळोजी कुंजरे यांजवळ ठरलें तें. सु। सल्लास मयातैन व अलफ, माहे रबिलावल छ १२ रोज बुधवार.
दाहा हजार व पागा मिळेने
दरमाहा रु। २५००० यांची हजीरी,
४००० करोल,
६००० आडहत्यारी वगैरे
--------
१००००
गाडद व तोफखामा वगैरे पुरंधरेयांचे विचारें तोफा ठरतील त्यांत माजीव तोफा पंधरा व पांच हजार गाडद व दोन हजार फौज यांचा बंदोबस्त अलाहिदा गोविंदराव परांजपे यांणीं करावा. त्यांचा दरमाहाचा आकार गोविंदराव यांचे विद्यमानें ठरला आहे त्याप्रों
शेरा सरासरी रु। २५ प्रो। तसलमात लिहून द्यावे. लोकांत शेरा जो आहे त्याची घालमल होऊं नये. याप्रों बोलणें आहे.
हुजूर फौज ठेवावयाची धोंडोबा वगैरे जे ठरले आहेत त्याप्रो। राहावें.
सरंजामी जे आहेत व येतील त्यांची रवानगी व्हावी.
१. आंगरे.
१. प्रतिनिधी.
१. मानकरी व सरंजामी पथकें विंचूरकर वगैरे.
१. चिंतामणराव
१. गोखले
नानापरंधरे यांणी तोपखान्याकडील पानशे वगैरे यापैकी जो ठरले ते बरोबर *न्यावें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८२
अलीफ.
१७२४ आषाढ शुद्ध १२
साहेब मेहेरबान दोस्तां बापूराव सलामहू.
अजतर्फ सैद जाफरअलीखां बाहादुर बादजसलाम आंकी येथील खैरयत जाणोन तुम्हीं आपली खयरखुषी कलमी करून दिल आराम करीत जावें, दिगर मजकूर, बादमुदत खत पाठविलें तें नेकशायेत पोहोंचून कमालखुषी हांसल जाली, खतांत मजकूर कीं येशवंतराव होळकर यांजकडील फौजा घाट चढोन मीरखां पठाण वगैरे आले म्हणोन वर्तमान ऐकिलें. त्यावरून आपल्यास लिहिलें असे. तरी मीरखां कोठें मुकाम करून आहेत, व जावयाचा रोख कोण्हीकडे आहे, फौज व पेंढार वगैरे जमाव किती असे, म्हणोन लिहिले, ऐसीयास, खास होळकर तर नंदुरबार, सुलतानपुरावर आहेत. मीरखां पठाण नागडे वल्हेगांवचे दरम्यान मुकाम आहे. फौजहि आठ दाहा हजार, हिंदुस्थानी जावयाचे बेत दोन आहेत. एकतर आंबाडाकडे जावें; एक गंगा उतरून पार व्हावें, येणेंप्रो।. मग पहावें, कोण्हीकडे जातात. शाहमतखां सिंद्रवर आहेत. नाशिकास खंडचा रोखा आहे. मान्याचें वर्तमान आपणास समजलेच असतील. तुम्हीं आपलें वर्तमान हरवख्त कलमी करीत जावें. रा। छ ११ माहे रबिलाखर, ज्यादासें लि। प्यार मोहबत असो दीजे हे किताबत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८१
पो। जेष्ट वद्य १३
श्री
१७२४ ज्येष्ठ वद्य ११
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी स्वामचे सेवेसीं:-
विद्यार्थी नारो बल्लाळ चितळे चरणावर मस्तक ठेवून सां। नमस्कार विज्ञापना ता जेष्ट वा। ११ मंदवार, मुा लष्कर नजीक वैजापूर येथें स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं पत्र रा। धोंडोपंत याजबा पाठविलें तें पावलें. व जबांनी मारनिलेनीं सांगितलें त्यावरून वर्तमान कळलें. लष्करचा दंगा बहुत, ह्मणून तिरस्थळीस भय फार जालें. तुमचें खातरजमेचें पत्र आलें म्हणजे आह्मी स्वस्त राहूं ह्मणून आज्ञा, त्यास आह्मी येथें आपले सेवक आहों. त्यापेक्षां आपणास कोणे गोष्टीचा उपद्रव लागणार नाहीं. त्यावरून भाईशामतखांसाहेबापाशीं बोलून आपणास एक पत्र व गांवकरी यासीं कौल पठाणाचा पा। आहे. पत्रांत आपली फार खातरजमा करून पत्र खांसाहेबांनी स्वामीस लिा आहे. त्याप्रों स्वामींनीं गांवातून बाहेर कोठें न जावें. मी येथें आहें, तेव्हां खातरजमा असों द्यावी.
आपण म्हणतील कीं, कालचें पत्रीं सूचना लिा. त्यास येथें आम्हीं खांसाहेबांशीं पक्की खातरजमा आपलेविशीं करून वचन घेतलें. तेव्हां आमचीहि खातरजमा जाली. त्यावरून धोंडोपंताबरोबर पत्रें पा। आहेत. पावतील. व जबानी मारनिल्हे विनंति करितील. त्यावरून कळेल. लष्कर बहुतकरून तिकडे येऊ देणार नाहीं. दाहापांच कोशीं जाणार.. जवळ लष्कर आलें ह्मणजे ताकीददार व कारकून गांवास पा, मौजे काठीपिंपळगांवींचा कौल पा।, तो गांवास पा। द्यावा. तेथेंहि ताकीददार पा. दोन रुख लष्करचे आहेत, मग पाहावें. + आपण स्वस्थ असावें, बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.