पत्रांक ५४७
श्री.
१७२३ माघ वद्य १४
राजश्री नारायण बाबूराव स्वामी गोसावी यांसीः-
विनंती उपरी. राजश्री रघोजी भोसले सेनासाहेब यांणीं सनसबा तिसैनांत दरबारखर्चाबाबत तीसहजार रुा। तुमचे विद्यमानें दिल्हे. त्यापैकी सत्राहजार सातशें पन्नास रुा। खर्च होऊन, बाकी बाराहजार दोनशें पन्नास रुा। शिल्लक राहिली. म्हणोन तुह्मीं इतवारें सरकारांत समजाविलें. तो ऐवज व्यवस्थेनें खर्चावयाचा. सा बा देणें ।। चिंतो वामन कारकून निा दफ्तर याजकडे रुपये १२२५० बाराहजार दोनशें पन्नास देविले असेत. तरी पावते करून, पावलियाचें कबज घेणें जाणिजे, छ, २७ सवाल सुा इसने मयातैन व अलफ. हे विनंति.
बार.
लिा। चिंतो वामन, सदरहू वरातेप्रो बारहजार दोनशें पन्नास रु। चांदवड भरून पावलों. छ ७ जिल्काद. हस्तें पांडुरंग रामचंद्र ढमढेरे. सुा इसने मयातैन. हस्ताक्षर खुद.