पत्रांक ५५६
पो छ ६ मोहरम शके १७२४
श्री.
१७२४ चैत्र वद्य ८
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसी:-
इंडवत विनंती उपरी गोसावी यांनीं खासदस्तुरपत्र पाठविलें तें पावोन जाहला. राजश्री नारायण बाबूराव यांसीं व उभयतांसीं बोलणीं जाहला. याचा मजकूर मशारनिलेनीं लिहिला असेल. सांप्रत समक्षता व्हावयाचा विचार जो दूरंदेशीनें ठहरला तो त्रिवर्ग लिहितील. त्याप्रों परस्परें मनांत वागावा, यांत बहुत चांगलें आहे म्हणोन लिहिलें तें कळलें. व त्रिवर्गोचे लिहिल्यावरूनहि येविशींचे सर्व भाव समजण्यांत आले. त्यांस, आपण इकडेस अंतःकरणापासून लोभ ममता ठेऊन आहेत, हें समजोन खातरजमा पहिली होती ती अधिकोत्तर जाहाली आहे. येथीलहि निःसीम भाव जातीशीं खचित आहे. हा प्रकार उभयतांनीं बोलण्यांत आणलाच आहे. तेव्हां याचा तपशील पत्रांत ल्याहवा, ऐसें नाहीं, जो बेत उभयतांनीं आपणांसी केला आहे तो दूरदेशीचे मार्गे फारच चांगला पोख्त आहे. तोच खचित असे. यांत येथून कदापि दुसरें व्हावयाचें नाहीं. जो बेत होईल त्याप्रोंच तेथून घडल्यास तैशा सारिखे इकडून घडेल व जैसा इशारा येऊन पोहोंचल तदनुसार अंमलांत येईल, हे खातरजमा पुर्ती असावी. एतद्विषयींचा मजकूर उमयतांस व राजश्री नारायण बाबूराव यांसीं लिहिण्यांत आला आहे. बोलतील त्याजवरून कळों येईल. रा छ २२ माहे जिल्हेज. सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति. मोर्तबसुद. *
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)