पत्रांक ५५८
श्री.
१७२४ वैशाख शुद्ध ६
अपत्य शामरावजीनें चरणावर मस्तक ठेऊन शिरसा नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागायत वैशाख वद्य ६ मंदवासर मुकाम मोलेगांव जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. वडिलीं आसीर्वादपत्र श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजश्री नाना दीक्षित कायगांवकर यांचे माणसांसमागमें पाठविलें तें पाऊन मार कळला. लिहिलें की फौजेचें वर्तमान दिनचयेंचें सविस्तर लिा पाठवणें. ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास, श्रीमंत राजश्री यशवंतराव होळकर हे अमळनेर नजीक बहादुरपुरें येथें आहे. जाण्याचा इरादा दक्षणेस नालेगांव चांदवड इकडे यावें, व एक बोलावा कीं ब-हाणपुराकडेस जावें. राजश्री माणे वे गणपतराव हे येरंडोल वगैरे येथील खंडणी घेऊन पा-होळ्यास आले. तेथें रोखा तीनलक्षांचा केला. तेव्हां पान्होळकर लढाईस सिद्ध जाला, एक लढाई चांगली किल्यासीं जाली. माणे मागें फिरोन मुकाम ह्मसवे येथें आले. मग तह पडला. नंतर पा-होळकर हे माण्याचे लष्करांत मेजवानीस गेले. वस्त्र घेऊन आले. दुसरे दिवशीं माणें यांसी किल्यांत मेजवानीस बोलाविलें. सैपाक सिध करून बोलाऊ पाठविलें. तेव्हां माणे यांचें ह्मणणें पडलें कीं, दोनहजार सरंजामानिशी किल्यांत येऊ तेव्हां पा-होळकर यांचे चित्तास आलें नाहीं. पंचवीसा स्वारांनशीं मात्र यावें. तें माण्यांनी कबूल केलें नाहीं. गग......मेजवाणीचा सरंजाम माणे याजकडेस पाठविला. तो माणे यांणी माघारा दिल्हा. तों पा-होळेकर यांनी शेला पागोटें घेतलें होतें, तें माघारें पाठऊन दिल्हें. मग तीं माणे यांणीं तीनलक्षांचा ( रोखा ) केला. यांणीं उत्तर सांगून पाठविलें कीं, दारूगोळा मात्र आहे. पैका.तर मिळणें कठीण. असें बोलणें मात्र होऊन, माणे मुकाम करून आहेत. येशवंतराव पा-होळ्यास माणे यांचे कुमकीस येणार. किल्यांत पाणी नाहीं, इतक्याणीं मात्र जेर आहे. पुढें काय होईल तें पाहावें. येशवंतराव याजकडेस गेला होता. त्याची भेटी घेऊन दरकूच ललिंगास आला. वाडी लुटली व माडीही घेतली. तेव्हां किल्लेदार तीस हजार रुपये द्यावयास सिद्ध. हें पठाणाचे मनास न आलें. लक्ष रुपये द्यावे आणि किल्ला खालीं करून द्यावा, याप्रमाणें बोलणें पडलें आहे. अद्यापि कांहीं ठरावांत आलें नाहीं. ललिंगाचा गुंता उरकला ह्मणजे पठाणांनीं मालेगांवास यावें, अशी बोलवा आहे. रोखा चौंलक्षांचा केला आहे. माण्य जाल्यास उत्तम......
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)