Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ६०५

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध अखेर
.

श्रीमंत राजश्री वैद्यबोवा मोकाशीसाहेब, साहेबाचे सेवेसी:-

अर्जदास्त अर्जदार बंदेगी शरीकर मोकदम मौजे कराठी प्रां। सुपें दंडवत अर्ज विनंति विज्ञापना कीं, मौजेमारचें वर्तमान तरः शेतमळे झाडून लुटले गेले कांहीं एकदोन मळे राहिले होते. गणपतराव पानसे यांच्या मुकामामुळें तेहि नवमीचे दिवशीं कूच करून गेले नंतर दस-याचे दिवशीं झाडून कही आली. त्याही मळ्याचा फडशा जाला. खरीफाचीहि अवस्ता तीच जाली. रब्बी पेरावी तर प्रजंने नाहीं. यामुळें दोन्ही पिकांची निराशा जाली. मान्याचे लष्कर पूर्वेस बारामतीचे खालते सा कोसांवर आले. जरीपटकाही आज एकादशीस कूच करून बारामतीवर गेले. मान्याचे धास्तीनें गांव झाडून वस झालें. आपल्याभोंवते लोणीमोरेश्वर येथील वस्ती आहे. याजवेरान शेवेसी अर्जविनंति लिहिली. गांवचा धर सुटला आहे. आपली आज्ञा तर, गांव वस करू नये. त्यास, खंडनीचे रोखे मान्या मनसरी करितो. पैसा द्यावयास ताकत नाहीं. गांव क्सबा, तर जाळतो. ऐसें संकट प्राप्त झालें आहे. येविषईंची आज्ञा येईल, त्याप्रों वर्तनूक करू. येथें तर घटकेचा भरवंसा नाहीं. कळावें. सेवेसी अर्ज विज्ञापना. दहाकाचा बंदोबस्त करावा. दोनसे रुो गांवच्या बच्यावाकरितां कृपा करून रा नारोपंत नाना यांसी पाठवावे. वितके दिवस गांवच्या बच्यावाचा लौकिक जाला. आताही आमचा संकटाचा प्रानअवस्ताचा दिवस आहे. साहेबीं ये येळेस कृपावंत होऊन दोंशां रुपयाचें काम करावें, म्हणजे श्रमाचे पाडऊ होऊं. निआधारी झालों, याकरितां संकटाची अर्जदास्त पाठविली आहे. हे अर्जविनंति.

१ धाकाचा. दहशतीचा. २ प्राणावस्थेचा. ३ गुलाम, ४ निराधार,

पत्रांक ६०४

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध १२

सेवेसीं बापूजी गणेश साठ्येदोन्ही कर जोडून शिरसां। नमस्कार विज्ञापना. ता। आश्विन शुा १२ पावेतों सुखरूप मौजे कराठी येथें असों विशेष. स्वामीकडून अलिकडे पत्र येऊन सेवकांचा सांभाळ होत नाहीं. तरी असें नसावें. सदैव पत्र पाठवून सांभाळीत जावें. यानंतर इकडील वर्तमानः मान्याच्या दहशतीनें भोंवरगांव उजाड जाहाले आहेत. जरीपटका व मान्यास च्यार केसांचा अंतर आहे. काराठी पासून नऊ कोस आहेत. आज उद्या तोंड लढाईचें लागणार, गांव तजावजा जाहला आहे. गांवकरी यांनी अर्ज दास्त पाठविली आहे, त्याजवरून कळों येईल. ब्राह्मण नित्य येत असतात. आज्ञेप्रमाणें भोजनाचा बंदोबस्त करीत आहें. व पेशजीं यमाजी भोसला यानें वर्तमान विदित केलेंच आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक ६०३

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध १२

चिरंजीव राजश्री विसाजीपंत नाना यांसीं बापूजी गणेश साठये आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता। आश्विन शुद्ध १२ येथें सुखरूप असों, विशेष. तुह्मां कडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. समाचार घेत नाहीं. तरी असें नसावें. सदैव पत्र पाठऊन संतोषवीत जावें. इकडील मार गांवच्या पत्रावरून कळेल. होळकराकडील मान्या व श्रीमंतांची फौज यांस च्यार कोसांवर अंतर आहे. सरकारची फौज बुनगे बारामतीस येऊन, पुढें सड्या फौजा होऊन गेल्या आहेत. बारामतीस वस्ती आहे. गांव दहशतीनें उज्याड जाहलें. हा गांव उज्याड होणार. मुलें माणसें सुद्धा येथें आहों. छत्राकडील काम आम्हाकडे सांगितलें आहे. लष्करचा भरंवसा नाहीं. घरांत भांडे व चीजवस्त आहे. ती गेली म्हणजे कठीण. याजकरितां यजमानास विनंती करून अगर तुमच्या विचारास येईल त्याजप्रों उत्तर पा।. ती। राजश्री दादा कोठें आहेत ते लिा. बहुत काय लि। ? लोभ करावा. हे आशीर्वाद.
हें। पत्नीं हावलदार व नारोपंत यांस सां नमस्कार सांगावा.

पत्रांक ६०२

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध १२

सेवेसी नारो कृष्ण दोन्ही कर जोडून सां नमस्कार विज्ञापना तो। आश्विन शुद्ध १२ पर्यंत मुा। मौजे काराठी सुखरूप असों. विशेष. आपण आज्ञापत्र माहाराजाबरोबर पाठविलें तें पावलें. लिा सविस्तर कळलें. मौजे मजकूरचें वर्तमान तरः गांवचीं शेतेंमळें तमाम, लष्करें नजिक होतीं, त्यांणीं कापिलीं. बहुत नाश जाला. हालीं लष्करें येथून कूच करून जळगांवांवर गेलीं. बुधवारी दोन प्रहरा रात्रीं कूच्य करोन, बारामती व मेंढध्याचें मधें बुणगें ठेऊन, सड्या फौजा पुढें बारामतीचे नजीक काठेवाडीवर गेल्या. माने यांचे फौजेस व सरकारचे फौजेस दोन कोसांचे अंतर आहे. त्यांचीहि जमात वीसपंचवीस हजारपर्यंत आहे, म्हणोन वदंता आहे. येथें चीजबस्त आहे. त्यास, बहुतेक गांव उज्याड जाहलें. येथील मार तरः च्यार रु। सिलक जवळ बाळगोन राहणें तेव्हां ठीक व गांवचाही बंदोबस्त राहील. त्यास, सिलक तो मजजवळ नाहीं. व गांवांत पट्टी करावी. हरएक पीक अगदींच गेलें. पुढे दुसरे पिकावर च्यार रु। तुह्मापासोन घ्यावे तर गांवची वस्ती होणें कठीण. त्यास, गांव राहे तो अर्थ करणार स्वामी समर्थ आहेत. येविशींचें विनंतिपत्र गांवकरी यांणीं लिहिलें आहे. त्याजवरून श्रुत होईल. दंगा बहुत आहे. त्यास, छत्राकडील भांडी वगैरे येथें आहेत. त्यास, येविशींची आज्ञा यावी. वरकड मार अधिकोत्तर नाहीं. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति.

पत्रांक ६०१

श्री.
१७२४ आश्विन शुद.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गंगाधरराव गोविंद स्वामी गो। यांसीः-

पो। बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. बळवंतराव माधव, माधवराव अनत रास्ते यांचे पुत्र, पुण्याहून निघोन जाऊन होनवाडास जमाव करीत आहेत. सबब, त्यांचे पारिपत्यास डफळे व थोरात व वागमारे व पोळ यांस फौज व पायदळ जमा करून एकत्र होऊन जावयाची आज्ञा केली असे. तरी तुह्मीं पत्र पावतांच फौज व पायदळ जमा करून, सारे एकत्र होऊन, बळवंतराव माधव यांस हस्तगत करणें आणि हुजूर पोंहोंचाऊन देणें. जाणिजे छ ५ जमादिलावल, सुा। सलास मयातैन व अलफ, बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
श्री राजा शाहूनरपति हर्षनिधान बाजीराव रघुनाथ मुख्य प्रधान.

पत्रांक ६००

श्री. ( मतलब. )
१७२४ भाद्रपद

यादी मतलब सीतलगीर गोसावी पो। पाटण प्रांत गढेंमडलें.

१ पो। पाटण येथें आमची लेवादेवी वडिलांपासोन गला व नगदी दीन वगैरे लोकांकडे येणें आहे. त्याचा तगादा आह्मीं करूं. जसें जेथून निघेल, असामीची अबादी राहून, तसें घेऊं. येविसीं सरकारचा पक्ष असावा. कलम.
१ मंडल्याचे संस्थान जेव्हां राज्याकडे होतें तेव्हां पामजकूरची मामलत आह्मांकडेच होती. ते वेळेस आमचा मठ वगैरे राहाणें गढींतच होतें. नंतर संस्थान सागरवाले यांणी घेतलें. त्या वेळेस आह्मीं निघोन काशीस गेलों, तें आज वीसपंचवीस वर्षे तेथेंच आहों. सांप्रत पा सरकारांत आला हें ऐकून एथें आलों. त्यास, कसबें पाटण येथें आमच्या मठाची योजना करून, जागा बांधावयास परवानगी द्यावी. दोन तीन बाग आमच्या वडिलांचे हातचे आहेत. ते आमचे आह्मांकडे देवावे. कलम.
१ वस्तीमधें आह्मीं राहिल्यावर चार रुपये व नाजपाणी देणें घेणें करूं, येविशीं सरकारचा पक्ष असावा. कलम.
१ कसबें मजकुरीं आह्मीं राहिल्यावर, दाहा पंचवीस अतीत आम्हांजवळ राहतील. तेव्हां सरकारांतून कांहीं निर्वाहा आमचा चालावा. आह्मीं सरकारचे उपयोगाचे आहों. हरएकविशीं चाकरी सांगितल्यास करूं. कलम.
१ आमचे राहणें कसब्यांत जाल्यावर च्यार सुष्ट आहेत व च्यार दुष्ट आहेत. आपलेकडील कमावीसदार तेथें आहेत. त्यास आमचे प्रतिपाळाविशीं निक्षून आज्ञा असावी कीं, हरएकविसीं यांचा सांभाळ करावा, कोणाचा उपद्रव वगैरे वाजवी लागूं नये. म्हणून कलम.

पत्रांक ५९९

श्री.
१७२४ भाद्रपद

याद रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित कायगांवकर यांचा फडच्या निजाम नवाजंग याजकडून होणें ताः-
१ दीक्षित यांजपासोन रोखा ( सा इ-)जार रुपयांचा घेतला. शाहा... .......( मा )णसें लष्करचे बाजारांत नेऊन......से प्यादे पाठऊन वाड्यांत दंगा करून बायकांस धरून नेलें. सबब, ......यासी बशर्थ रोखा हरएक उपद्रव होणार नाहीं. कलम.
१ कायगांवचे वाडे लुटून पठाणांनी नेले आणि मातुश्रीस धरून लष्करात नेऊन गांवचे मुकामीं नेलें. तेथून पठाणांनी मातुश्रीस माघारें पाठविलें. तेव्हां मार्गांत वकिलांची गांठ पडून, तसदी करून, वाटेंत रोखा नेऊरगांवीं साईएकवीस हजार रुपयांचा घेतला आहे. कलम.
१ सातारें येथील वाडे तीन पठाणांचें नांव करून लुटून गाड्या भरून शाहरास नेल्या. चीजवस्त वगैरे सर्वहि गेले. त्याचा फडशा होणें, कलम.
एकूण तीन कलमांचा फडशा करून देवणें. पुढें उपद्रव न व्हावा. तपसोंलाची याद.........पाहावी.

लेखांक ४३                                                                    श्री                                                            १६४४ श्रावण वद्य ९                                                                                            

श्री शके १६४४ सुभकृत नाम संवछरे स्त्रावणवदि नवमी गुरुवार ते दिवशीं झालेल्या सुपे एथील एका महजरावर खालील शिक्के आहेत :-

                                                                      होनाजी अनंत न्यायाधीश यांचा शिक्का

                                                                                43 1

                                                                     
                                                                   शाहूछत्रपती देशमुख प्रा। वाई यांचा शिक्का

                                                                               43 2

 

                                                                   देशमुख सरकार दौलताबाद यांचा शिक्का

                                                                               42 3

                                                                 ही सनद सुप्याच्या देशपांड्याजवळ आहे

पत्रांक ५९८

श्री. (मसूदा)
१७२४ भाद्रपद शुद्ध ८

जगंनाथपंत यांचे नांवें पत्र पाटणास लि। दिल्हें.

विशेष, सीतलगीर गोसांवी का। पाटण येथें राहत होता. त्यास सागरवाले याणीं संस्थान घेतलें त्यावेळेस गोसावी मजकूर परागंदा होऊन श्री काशींत वीसचवीस वर्षे राहिले. हालीं संस्थान सागरवाले यांजकडोन राजश्री सेनासाहेबसुभा यांजकडे सरकारांतून देविलें. तेव्हां पाटण माहाल सरकारांत ठेविला. हें वर्तमान गोसावीमार यानें आइकिलें. त्याजवरोन काशीहून निघोन पाटणास तुमची भेट घेऊन आला. यासी, येऊन आह्यांस भेटला. आपलें वर्तमान सांगितलें. त्यावरोन गोसावी तेथील स्थाईक आणि सरकार, उपयोगी, तेथें राहिल्यानें हरएक कामीं पडतील, ऐसें जाणोन, गोसावीमार याची खातरी करून तुह्मांकडे पाठविला आहे. त्यास का पाटण येथें

१ का मारीं मठ बांधावयासी जागा नेमून द्यावी. महिना पंधरा दिवस दाहा पांच बेगारी लागल्यास द्यावे. याचें बोलणें कीं, तीन बागा कसब्यामध्यें आपले गुरूच्या हातच्या आहेत. त्यांची चौकशी करून त्यांतील एक बाग यांस द्यावा. गरीबगीर गोसावी याचा मोठा बाग द्यावा. कलम १.
१ पो। मारीं गोसावी याची सावकारी बीज व नगदी वगैरे येणें आहे. त्यास, रयत रजावंतीनें सरकार-नुकसान न होतां, जसें ज्यापाशीं निघोन असामी कायम राहील, अशा त-हेने हे मागतील. येविसीं तुह्मीं ताकीद रयतेस वगैरे करावी.
१ वस्तींत राहिल्यानंतर नवी देवघेव करितील, येविशींचा तुमचा पक्ष असावा.
१ गोसावीमजकूर कसब्यांत मठ बांधन राहणार, तेव्हां दाहा पंचवीस याजपाशीं अतीत राहातील. त्यांचा योगक्षेम चालला पाहिजे, व सरकारचे उपयोगाचे आहेत, याजकरितां यास पड जमीन पडली आहे. त्यापैकीं तीनशां रुपयांची कामारीं अगर हरएक गांवीं पाटणचे माहालांत चला बांधोन सरकारची सनद करून द्यावी.

१ गोसावीमार तेथें राहणार, तेव्हां याचे किती ब-यावर व किती वाईटावर असतील. याचें लक्ष तुह्मीं ठेऊन, हरएकविसीं याची गौरसी करीत जावी. सदरहू कलमें ५. गोसावीमार तुह्मांजवळ आल्यानंतर लिाप्रों त्याची खातरी करून याचा पुस्तपाना करीत जावा. फिरोन बोभाट येऊं न द्यावा, रा छ ७ जावल, सुा। सलास मयातैन व अलफ.

[ ६६ ]                                            श्री.                                      २३ मे १७०८.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३५ सर्वधारी सवत्सरे ज्येष्ठशुद्ध चतुर्दशी मंदवासर क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति याणीं राजमान्य राजश्री खडप्रभू चिटनवीस यास आज्ञा केली ऐसी जे - तुमचेविशी कित्येक राजश्री रामचंद्र पडित अमात्य याणीं विनंति केली त्यावरून कळों आले. ऐसियांस, तुह्मी स्वामींचे कदीम विश्वासू सेवक आहा. तुमचे हाते सेवा घेऊन तुमचें चालवणें स्वामीस अगत्य आहे याकरितां कांही सदेह न धरितां व अनमान न करितां, विलंब न लाविता, तेथून स्वार होऊन स्वामीसंनिध दर्शनास येणें. स्वामी तुमचें पूर्ववत चालवितील येविशीं आनसारिखें न मानितां सिताब स्वार होऊन येणें. येविशीं सविस्तर पंडित मशारनिल्हेनीं लिहिलें आहे त्यावरून कळो येईल. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
                                                                                                                                 मयादेयं
                                                                                                                                 विराजते.