Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५९७

श्री.
१७२४ भाद्रपद शुद्ध ७

अमीरतद्दौला बाहादरः-

खां साहेब मुशाफक मेहेरबान मीर कमोयनुद्दीन अल्लीखां बाहादूर यांसी लक्ष्मीबाई व सौ मैनाबाई दीक्षित पाटणकर व परशरामभट व लक्ष्मणपंत मौजे कायगांव आशीर्वाद. उपरी. नबाब यांचे खंडणी पौ रु।। २०५०० अक्षरीं वीस हजार पांचसें राहिले. त्यास, सदरहू ऐवज त्यांचे सरकांत तुह्मांकडोन देविला असे. हा ऐवज शहरीं गेलियावर चौवथे दिवशीं दाहा हजार रुपये आपलियास देऊं. व पुढें आठवे दिवशीं साडे दाहा हजारांचा भरणा करून देऊं.सदर वाइद्याप्रो झाडा करून देऊं हा करार लिहून दिल्हा. सही दस्तुर लक्ष्मण रावजीचा असे. सके १७२४ दुंदुभीनाम संवत्सरे * भाद्रपद शुद्ध ७
साक्ष रतनगीर बोवा गोसावी.

पत्रांक ५९६

श्री.
१७२४ भाद्रपद

यादी रामचंद्र दीक्षित व लक्ष्मण नारायण दीक्षित कायगांवकर यांचा फडच्या निजाम व नवाजजंग यांजकडून होणें:-

कायगांवीं पठाणाची फौज येऊन ब्राह्मण गांवांतील धरून मारहाण क (रून) पैका मागूं लागले तसदी बहुत होऊं लागली.........घेतले; आणखी दाहा मागों लागले, घरें खणों लागले. सबब सुभ्यास मार सांगिला. सुभे यांणीं करार केला कीं, पांच हजार रुपये, व एक हजार रुो। दरबारखर्च ऐा साहा हजार रुो द्यावे. पठाणाची तोड आह्मी पाडितों. तुह्मांस कांहीं तोशीस न लागतां कुचे करवितों. याप्रमाणें ठरून साहा हजार रुो चा दस्तऐवज सुभे यांणीं घेतला. तेव्हां, पठाणाकडील आह्मांस एक पैसा न पडतां त्यांणी कूच करून जावें, कायगांवचे ब्राह्मण वोलीस पठाणापाशीं होते ते सुभे यांणीं आणून अवरंगाबादेस आह्मांपाशीं पावते
( करावे ), तें कांहीं एक केलें नाहीं. पठाणांनी मारहाण ब्राह्मणास करून * लष्करांत गेले.

पत्रांक ५९५

श्री.
१७२४ भाद्रपद शुद्ध १

स्वामीचे सेवेसी. विनंति सेवक मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां नमस्कार विनंति विज्ञापना ता। भाद्रपद शुद्ध परियंत आपले कृपेंकरून यथास्थित असें, +++ अलिकडे वर्तमानः-डालटन साहेब याचा मुख्य सरदार दीपन साहेब ब-हाणपुराकडून आला. भाद्रपद शुद्ध १ आपले गांवीं आला. त्यानें हि बहुत गर्दी केली. शिवरामपंत तात्याची हवेली उघडून राहावयास येऊं लागला. मग मोठे प्रयासें अंबादासपंत सेंदुरणीकर यांणीं बाहेर अभ्यंकराचे वाड्यांत उतरविला. मोठी मारामार केली. ब्राह्मणांची आब ठेविली नाहीं. सदाशिव दिक्षितांचे आंगणांत घोडे बांधून माहाराची राहोटी दिली. मग, मोठ्या प्रयासें दुसरे दिवशीं तो माहार काहाडला. त्यानेंहि दोन हजार कडबा घेतला. कडबा कोठें मिळेना. उशीर लागला ह्मणोन, परसरामभटाचा हात बांधला, व मकवा होडले ! दाहापंधरा चाबूक मारले. अंगुठा पिरगाळला. तो अद्यापि नीट जाला नाहीं. मग काल मंगळवारी दीपनसाहेब सडा उतरोन पुन्यास आला आहे. अंबादासपंतहि त्यासमागमेंच आहे.

आपले गांवीं कंपू उतरला, यानें अगेदर चंदी वगैरे घेतलें. तो मार सविस्तर पत्रीं लिहिलाच आहे. त्यावर, त्यानें आणखी चिठी मनश्वी सरंजामाची केली. आजमास चिठीचा पाहतां, दोनशें रुपये होऊं लागले. मग बहुत प्रयत्न केला. अंबादासपंतांनी बहुता प्रकारें प्रयत्न केला. परंतु तो ऐकेना. अंबादासपंतासीं त्यानें करार केला कीं चिठी माफ करतों, अंबादास पुंन्याकडे आला. दुसरे दिवशीं नेहमीं शिपाई पाठवून साहिंकाळपरियंत मला बसविलें. साहिंकाळीं दाहापांच ब्राह्मण तेथें पाठविले. तो मनश्वी बोलूं लागला. सेवटीं चिटीपो कांहीं जिन्नस घेतली. बाकीहि उदईक द्या ह्मणतो, याप्रमाणे मोठी धूम केली. पुढें कुचहि करित नाहीं. राण फार तुडविलें, तरी बाजरी तमाम बैलांस तोफेच्या चारलें. याप्रमाणें आजपरियंत गर्दी केली. पुढें काय करील, हें नकळे, +++ हे विनंति.

पत्रांक ५९४

श्री. ( नकल. )
१७२४ भाद्रपद

यादी श्रीमंतांस विनंति करावयाची निरउपाय जाणोन. १ येथें आजपर्यंत आमचें राहणें श्रीमंताचे प्रतापेंकरून बहुत दिवस. त्या लौकिकाप्रमाणें वागणें प्राप्त. त्याकाळीं आम्हांसही येथें फारसा खर्च लागत नव्हता. याचें कारण काय म्हणाल तर, आम्हीं येथें सडेच राहणार, त्याजमुळें व काम पडल्यास कोठेंहि दहापांच हजार उसने मिळत होते. ते सांप्रत हिकडे पेंढारी वगैरे ह्यांचा दंगा व राजकीय ही कित्येक उपद्रव, याजमुळें कांहीं खराबी व ज्यापास असेल तोही छपून वागतो. अशी अवस्था. याजमुळें हजार पांचशांचा मोबदला होऊं सकत नाहीं. सांप्रतकाळीं काशीयात्रेचाही मार्ग हाच पडला. चार देशांतील ओळखी भेटतात त्यासंबंधें यात्रा जातां येतां आगतस्वागत मिळून तीन हजार रुपये खर्च लागतो. व लग्नकार्याचे दिवस आले असतां, येथील सरकारी वे संभावित स्नेही ग्रहस्त मंडळीच्या येथें कार्यों जाहालीं असतां अहेर करणें प्राप्त. परत अहेर करण्याचा सांप्रदाय नाहीं. तेव्हां त्यासंबंधी दोन हजार रुपये खर्च लागतो. याजकडून पंधरा हजार रुपये मिळतात. परंतु ओढीमुळें चार सहा महिने हातास येत नाहीं. त्याजपुरती घरबेगमी घोडी सिबंधीं वगैरे व भोंसले यास मेजवान्या भोजनखर्च वगैरे मिळून, त्यांत कांहीं न रहातां, तीन चार हजारपर्यंत अधिकच लागतात. शिवाय, आला गेला याचा उपद्रव, याजमुळें दिवसेंदिवस खर्च अधिक वाढला, हें ध्यानांत यावें, म्हणोन तपशिलें लिहिलें आहे. सरकारची गांवखेडीं सरंजामास आहेत. तेथील ऐवज तुम्हांस व खंडोपंतास पुरत नाहीं. याजमुळें तेथून हुंड्या करितात तें वेगळें, याचे साक्ष तुम्हींच आहां.

देशापेक्षां हिकडे सवंगाई, व नारायणराव आमचे तेथें रोजगारी सरकांतुन आहेत, असें म्हणून जांवई व मामा, मावसबंधू आप्तविषई, चार इष्टमित्र, भिक्षुकब्राम्हण बहुतां दिवसांचे आश्रित तेथें आले आहेत. तेव्हां इतक्यांचा निरवाह करणें प्राप्त. व आपला विषय तो असा आहे !

मी पुण्यांत असतां, कोणीएक सावकारास काम पडलें. तेव्हां, श्रीमंतांनी त्याचा अब न जावा, याकरितां रात्रीस दोन लाख रुपये दिल्हे. दुसरे दिवशीं त्या गोष्टी निघाल्या. तेव्हां आज्ञा जाहली कीं, जो माझा आहे तो समक्ष असतां त्याचे जसें चालवावयाचें तसें चालत आहे. परंतु तो दूर देशीं असतां व त्यास संकट पडलें असें मजला समजलें असतां, असेल तेथपर्यंत अशाची उपेक्षा करणार नाहीं. त्या गोष्टीची आठवण मजला वारंवार होते. व तेथेंही स्मरण व्हावें म्हणोन ही गोष्ट लिहिली आहे. सावकार कोणता तें ध्यानांत येईलच. सांप्रत तसा प्रसंग प्राप्त जाहला आहे. तो कसा म्हणाल तर, काशीयात्रेचें देणें तसेंच आहे. व नित्यनैमित्य ज्या काळीं जें प्राप्त होतें त्याप्रमाणें खर्च करून आला दिवस लौकिकाप्रों कंठावा लागतो. येथील जन्मापासून स्थाई परस्परे सोयरेधायरे त्यांस देखील कर्जवाम मिळत नाहीं. तेव्हां आह्मी परकीय आह्मांस कर्जवाम कसा मिळेल ? तेव्हां हाही उपाय राहिला. भोंसले यांस तो दैन्य दाखवावयाचें नाहीं. येथील चार इष्टमैत्र म्हणावे तरी, दरबारीयांचें घराऊ सुख दुःख सांगावें, असें नाहीं. अशा चहूंकडोन अडचणी जाणोन याची तोड मनांत आणिली कीं, श्रीमंत सर्वज्ञ, धणी, वडील, आम्ही अज्ञान, त्यांची लेंकरें, तेव्हां तेच संकटांतून पार पाडतील, असें समजून, पंचवीस हजार रुपये खासगीकडून कर्ज घ्यावे आणि त्याच्या हुंड्या तुम्ही तेथून करून पाठवाव्या. याची फेडीविषई जशी आज्ञा येईल तसें करावयास येईल. त्याप्रों कांहीं काशीस पाठवीन. म्हणजे उसार खावयास जागा होईल. आजपर्यंत सालाबाद बारा महिन्याचे बेगमीप्रों दोन महिन्यांची बेगमी शपतपुरस्कर नाहीं. तेथून असा उपराळा जाहला असतां उपयोग होईल. माझी उपेक्षा समक्ष होणार नाहीं. मग परकी स्थळीं असतां कशी होईल ? हा भरवंसा जाणोन लिहिलें आहे. परंतु तुह्मांकडून पत्रें दाखविण्यास व विनंती करावयास आळस जाहल्यास उपाय नाहीं. तेथें विनंती केल्यावर जशी आज्ञा होईल तसें करावें.

खर्च वाढला असे. कालदेशवर्तमान पाहून, कर्जास भेऊन, बंधू वेगळे निघावें अशा बेतांत आहेत. वेगळे जहाल्यास निर्वाह कसा करावा, हाही अंदेशा वागवून आहेत. मग पाहावें. आमची सोय सरकारांतून काढावयाची कल्पना कोणती म्हणाल तर, पंचवीस तीस घोडीं घरचीं आहेत. व आणखी पंचवीस घोडीं घरचीं करून, पंनास घोड्यांची पागा व त्यास हरकोठें बेगमी पुरते चार गांव वराडांत वगैरे लावून दिल्यास, बंधू हुजूर राहून चाकरी करितील, येणेंकरून त्याची सोय निघाली. वहिवाट्यास पडलेसें होतील, येविशीं त्यांची इच्छा बहुत आहे जे, नांव लौकिक करावा. आण मीही घोड्या माणसांचे खर्चातून मोकळा होईन. मग वडिलांची मर्जी असेल तसा निर्वाह करोत.

१ पेशजीचा संग्रह काय आहे, तोही तुम्हांस माहीत आहे. त्याजवर साल गुदस्ता चिरंजीव बंधूचें लग्न केलें. त्याचें कारण, आम्ही उभयतां बंधूंपैकी पुत्रसंतती एकासही नाहीं. चार उपाय करणें ते केले. तसा हाही उपाय सर्वांनुमतें करावा असें जाहालें. सबब, त्यासही नांव लौकिकाप्रमाणें वस्तवानी वगैरे खर्च केला पाहिजे, हात तर कोठें चालेना. सबब, मातुश्री व भावजई वगैरे बायकांची वस्तभाव घेऊन नवरेमुलीची भरती मात्र केली.

१ शिवाय, पाटण परगणेंयासी सालदरसाल पेंढारी यांचा दंगा जातां येतां, व होळकराकडील नागो जिवाजी व बंडवाले राजेरजवाडे वगैरे यांचा, व हालीं मीरखान याचा दंगा, याजमुळें प्रांतांत खराबा. तेव्हां ठाणें राखावयासंबंधी व बंडवाले यांच्या खंडण्यासच ऐवज कर्ज काढून घालावा लागते. हें पहिलेपासून तुम्हांस माहित आहेच व हिशेबही तेथें गेलेच आहेत. त्याजवरून समजलेंच असेल.

श्रीमंताच्या कृपेंकरून नांवलौकिकासही आलों व चार पैसे मिळवून संसारासंबंधी जीं जीं सुखें तीं सर्व भोगलीं. हें गृहकृत्य गौप्य असावें यास्तव सूचना लिहिली आहे. तुम्हीं विनंती करितां अशीच करावी, व तेथूनही घडेल, ही खातरजमा आहे.

पत्रांक ५९३

श्री
१७२४ श्रावण.
लक्ष्मी नारायण दीक्षित.

हरतर्फ एखलास चांदसाहेब दुवा आंकी. तुम्ही खत पाठविलें तें पावलें, गांडापुरीं ठाणें घेऊन आलां, म्हणोन ऐकिल्यावरून बहुत खुषी जाली. तुम्हीं आहां यांजवरून गांवास खातरजमा जाली. तुमचे भरवशियावर आहों. गांवची काळजी तुम्हांसच आहे. जानवी जोड ? पाठविला आहे. स्वार आा ५ माघारे पाले आहेत. काळे ढालाईत येथें ठेऊन घेतले. स्वारास तुमचें लिो प्रों दाणा व पोटास सिदा दिल्हा, मीरखां पठाण कोणीकडे जाणार हें ल्याहावें. कायगांवची सर्वोपरीं तुम्हांस काळजी आहे. ज्यादा काय लिहिणें ? सिदोजी पाठविले आहेत. जबानीं सांगतां कळेल. हे किताबत.

पत्रांक ५९२

श्री ( नकल. )
१७२४ श्रावण शुध १३.

राजश्री केसो गंगाधर साठे गोसावी यांसीः-

सु। सलास मयातैन व अलफ. राजश्री येशवंतराव होळकर याची नजर सरकारावर वांकडी दिसोन, मान्येपठाण वगैरे फौजा जांबगांव पावेतों आल्या. सरकारांतूनही होळकर यांचे मनांतील वांकडेपणा समजोन फौजा तोंडावर पाठवावयाची तजवीज करून, पुरंधरे व पानसे बाहेर काहाडले. दहापंधरा हजार फौज व पांचसात हजार माणूस पायचें जमा करून, मानेपठाण यांस तंबी पोंचावी हा विचार केला आहे. पांडवगडचे मसलती......ध गेला आहां तर जेथपर्यंत जवळ......(फौजे) निशीं देखत चिठी गारदवंड येथें जाणें आणि लिहून पाठवणें. या कामास हुजुरून रा। बापू विठ्ठल व हुजरे आ॥ २ पो। आहेत. तरी विलंब न करणें. आरब माणूस शिपाईगिरीस चांगलें. होळकराची फौजकही, तेथें, योजना तशांचीच जाहली पाहिजे. तरी, लौकर जाणें, पांडवगडचा शह सुटल्यास चिंता नाही. किल्याचा कद फारसा नाहीं. या वेंकटराव दंवडेस पोंचोन, रा। बाळाजी रामचंद्र व लक्ष्मण महादेव व खंडो धोंडदेव यांजपाशी हजीरी देऊन, याचे गणतीचें पत्र हुजुर पाठऊन देणें. जाणिजे.

छ, ११ रा। खर.

[ ६५ ]                                            श्री.                                      २३ मे १७०८.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३५ सर्वधारी संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं समस्त सेनाधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापति जप्तनमुलुख यास आज्ञा केली ऐसी जे- तुमचेविशीं कित्येक राजश्री रामचंद्र पडित अमात्य यांणीं विनंति केली त्यावरून विदित जाहालें. ऐसियास, तुह्मी स्वामीचे एकनिष्ठ, विश्वासू, कार्यकर्ते, सेवक आहा. तुमची ही निष्ठा स्वामीच्या पायाशीं आहे. याकरितां सर्व प्रकारें तुमचें चालवणें स्वामीस अगत्य आहे. तरी तुह्मी सर्व प्रकारे आपलें समाधान असो देऊन कांहीं अनमान न करितां व कांहीं सदेह न धरितां तेथून निघोन सदुबा यासहवर्तमान स्वामीसंनिध दर्शनास येणें. स्वामी तुमचें पूर्ववत् विशेषात्कारें चालवितील. येविशी सविस्तर पंडित मशारनिल्हेनीं लिहिलें आहे. त्यावरून कळों येईल. बहुत लिहिणें सुज्ञ असा.
                                                                                                                                 मयादेयं
                                                                                                                                 विराजते.

पत्रांक ५९१

श्री म्हाळसाकांत. ( नकल. )
१७२४ श्रावण शुद्ध १३

वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो येशवंतराव होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. खानदेशप्रांतीं खांसा स्वारी आल्यावर, पुढें राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजा याप्रांतीं रवाना जाल्या. जनवार्ता सैन्याचा उपद्रव ! यामुळें कायगांव, टोंकें, प्रवरासंगम तिरस्थळी क्षेत्रांची जागां ब्राम्हणांस भय उत्पन्न जालें. सालगुा। क्षेत्र कायगांव पेंढारी यांनी लुटलें. त्यामुळें भय अधिक उत्पन्न जालें. त्यावरून क्षेत्रस्थ ब्राम्हण श्रीफल घेऊन मान्याच्या भेटीस पुण्यस्तंभी गेले. त्यांनींहि अभय दिल्हें जे, आम्हांस येविशीं सुभेदार साहेबांची आज्ञा आहे जे, क्षेत्रास उपसर्ग देऊ नये. त्यावरून सर्वांस संतोष जाला. हाली राजश्री नबाब अमीरउद्दोले फौजेसुद्धां कसबे गांडापूर येथें आले. आंबडाकडे स्वारी जाणार. त्यांजकडील उपसर्ग क्षेत्रास किमपि लागला नाहीं. माने थांणीं खातरी केली, त्याप्रों अनुभवास सर्वांच्या आलें. पूर्वापार कैलासवासी थोरले सुभेदारांपासून या स्थळाचा अभिमान आहेच, त्याप्रमाणें सांभाळ करालच. आम्हांकडील गांडापूर परगण्यातील तीन गाव व नेवास परगण्यातील एक गांव, ऐ। च्यार गांव आहेत. आज पांचसाहा वर्षे पायमालीनें खराब जालीं. त्यांस, त्यांचें व तिरस्थळीचें संरक्षण घडावें, याकरितां नवाबास पत्र दिल्हें पाहिजे, म्हणोन विस्तारें लिहिलें तें कळलें, ऐशियास, तुम्हांकडील लक्ष्मण उमाजी यांजबराबर राजश्री अमीरुद्दौले यांजला पत्र पाठविलें आहे. हें त्यांजकडे पावतें करावें. गांवांस उपद्रव देणार नाहींत. सर्वदा पत्र पाठवन संतोषवीत जावें. रा। छ ११ रबिलाखर, सु। सलास मयातैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति मोर्तबसुद. सिक्का.

पत्रांक ५९०

श्री.
१७२४ श्रावण शुद्ध १३

श्रीमंत राजश्री जनार्दनपंत दादा स्वामींचे सेवेसीः-

सेवक शिवराम कृष्ण कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल श्रावण शुध त्रयोदशींपर्यंत आपल्या कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस जाले, पत्रीं परामर्ष न जाला. सेवक पदरींचा, सांभाळ करावा. आपणास विदित असे. यानंतर आपणाकडे जोडी गोवर्धन यांजकडील आली. त्याबरोबर माझें पत्र चिरंजीव चिटकोपंतास पा। होतें. त्यांत चिठी आहे. ऐशियास, तें पत्र पुणेंस पोचेन प्रत्योत्तर आपणापाशी येईल तें करावें, बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दीजे हे विनंति.
हे। राजश्री दादोपंत स्वामींचे सेवेसी. सा। नमस्कार. लोभास अंतर न होय, ते करावें. लोभ कीजे हे विनंति.

पत्रांक ५८९*

श्री.
१७२४ श्रावण वद्य मध्य ७।८

यादी. रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित कायगांवकर. सुा। सल्लास मयातैन व अलफ, उर्फ श्रावण वा। ५ समीरखान पठाण निा रा। येशवंतराव होळकर याची फौजसुद्धां मुा। मौजे कायगांवीं आला. तेव्हां गांवांत त्यांणीं दंगा केला. त्याचे पुरवी एक दिवस आह्मीं फौजेचे भयामुळें मुलेंमाणसेंसुद्धां गांवातून निघोन सातारियास गेलों. तेथें राहन्याचा धीर पुरवेणा, ह्मणोन औरंगाबादेस आपल्या वाड्यांत मुलेंमाणसेंसुधां जाऊन राहिलों आणि सुभ्याची भेट घेऊन त्यास वर्तमान सांगितलें. त्यांणीं बहुतप्रकारें आमची खातरजमा केली, तुह्मांस कोणतेहि गोष्टीची तोशीस लागणार नाहीं, तुह्मीं आपले घरांत स्वस्त राहाणें. त्याजवरून आह्मीं घरांत स्वस्त राहिलों. इकडे कायगांवीं पठाणांनी उपद्रव करून, गरीबगुरीब ब्राह्मण गांवामध्ये सांपडे त्यास धरून, बहुत मारहाण केली. त्यांत च्यार ब्राह्मण मेले. गावच्या
-------------------------------------
* ह्या पत्रांतील खोडाखोडीवरून हें पत्र मसुदा म्हणून लिहिलेलें असावें पुष्कळ ठिकाणीं खोडलेलें असून आजूबाजूनेंहि शोध घातले असल्यामुळें ह्या पत्रास वैश्वदेवांतील बलिहरणाची उपमा देण्यास हरकत वाटत नाही. वर पत्रांत ज्या शब्दांवर आंकडे घातले आहेत त्या शब्दांपुढें जे शब्द खोडलेले आहेत ते पुढे दिले आहेत ?. पठाणांनी गांवांत दंगा केला. त्यास. २. बहुत उपद्रव केला. गांवांतील घरें उघडून चीजबस्त उकरून नेऊन घरांस ब्राह्मणांस व आमच्या मातुश्रीस धरून लशकरांत नेऊर गांवचे मुकामीं घेऊन गेले. गावची खंडणी पस्तीसहजार रुपये करून व गांवकरी मिळून वसूल देऊ लागले. कांहीं वसूल दिल्हा. बाकी दाहाहजार रुपये राहिले. तेव्हां गांवकरी दोन ब्राह्मण पठाणाकडील दोन प्यादे घेऊन, औरंगाबादेस आम्हांकडे आले. आमची त्यांची गांठ पडली, ब्राह्मण आम्हांस म्हणूं लागले कीं, दाहा हजार रुपये पठाणाचे देणें राहिले आहेत त्यांची तजवीज जाली पाहिजे. आमचे वाडे उभयतांचे लुटले. नंतर मातुश्रीस लष्करांत घेऊन गेले. नंतर पठाण यांणी विच्यार करून त्यांची घरेंहि खानलीं आणि मातोश्रीस आणावयाचें प्रयोजन काय, हें समजून मातुश्रीस सोडून दिल्हें. नंतर आपण कूच करून गेला. मातुश्री गंगेचे कांठीं येऊन बसली. तेव्हां सुर्तवाले याचा वकील पठाणाचे लष्करांत होता. तोहि तेथें आला. मातुश्रीची त्याची वाटेस नेउरगांवीं गांठ पडली. तेव्हां मातुश्री कायगांवास घेऊन आला. मातुश्रीची व सुरतवाल्याकडील वकिलाची नेवरगांवीं गांठ पडली. तेथें वकीलयाणीं तसदी केली कीं, तुम्हांस एकवीस हजार रुपये करार करून सोडविलें असें. तेव्हां मातुश्री बोलिले जे, सोडावयाचें कारण नव्हतें, पठाण समागमें नेते तरी जातें ! तेव्हां तसदी करून मातुश्रीपासून वाटेमध्ये रोखा रु। साडेएकवीस हजारांचा लिहून घेऊन कायगांवास घेऊन आला. तेथेंहि पैक्याकरितां तसदी केली. पैसा निघणा, सा। दुसरे दिवशीं शहरास घेऊन जाऊन परभारे पंधरा दिवस अटखात्या लावल्या-कांहीं. ३. हें वर्तमान शहरास आलें. बायकामुलें सुद्धां. ४. आणि गांवची खंडणी पस्तीस हजार रु। केली.त्याचा वसूलहि त्यांणीं बहुतकरून घेतला. हजार दोन हजार रुपये बाकी राहिली त्याजवरून आमचे वाडे उभयतांचे लुटले आणि मातुश्रीस लष्करांत घेऊन गेले. ५. तेथेंहि तसदी मातुश्रीस रु। विशीं केली. त्यांनीं उत्तर केलें कीं, मजपाशीं रु। नाहीं. तेव्हां दुसरे दिवशीं मातुश्रीस घेऊन आवरंगाबादेस आला, आणि कोठ-यांत कैद करून ठेविली. हें वर्तमान आम्हांस समजल्यानंतर आह्मी छेपून राहिलों. सुभ्याकडे जाऊन बोलणें बोलावें, त्यास आम्हांसहि कैद करतील हें मनांत आणून त्यांजकडे गेलों नाहीं. तेव्हां तीवारांनीं त्यांनीं मातुश्रीस सोडून घरास आणून घातल्या त्या संधींत सुभ्यानें पठाणाचें नांव करून सातारियांत वाडे तीन होते ते लुटून गाड्या भरून शहरास आणिल्या. या प्रों। वर्तमान असे. हे सर्व ध्यानास आणून आम्हांपासून व मातुश्रीपासून रोखे लिहून घेतले आहेत व सातारे येथील वाड्यांतील चीजवस्त नेली आहे ती माघारी देवावी व सातारियास हरएक विशीं उपद्रव होतो तो होऊं नये असें जाहलें पाहिजे. ( शेवटच्या टिपेंतील मजकूर खोडलेला नाहीं. एका बाजूस अलग लिहिला आहे. )
-----------------------
केंत ठेविलें, आम्हांस आश्रय कोणाचाच नाहीं. ज्याचा आश्रय केला तोच आम्हांस मारता ! असें समजलें म्हणून तेथून निघोन धण्याच्या पायांजवळ आलों. पठाणाचे प्याद्यां समवेत बसलों आहों, तों इतकियांत सुरतवाले याजकडील पन्नास माणूस येऊन आम्हांवर दगा केला. आम्हीं तोंड चुकविले. तेव्हां घरांतील बायका नेऊन लष्करांतील बाजारांत बसविल्या. तेव्हां आम्हीं गुलामहुसेन, सुभ्याकडील कारभारी, याजकडे गेलों आणि मजकूर सांगितला. आम्हांस म्हणूं लागला कीं, तुम्हीं सरकारांत पांच हजार रुा देणें व हजार रु। आम्हांस अंतस्थ देणें, एकूण सा हजार रुा देणें, म्हणजे तुमची मुलेंलेंकरें व चीजवस्त जी गेली असेल ती आणून देतों. त्याजवरून आम्हीं कबूल करून सा हजारांची चिठी बशर्त मुलेंलेंकरें व चीजवस्त आणून दिल्हा तर आम्हीं देऊं, म्हणोन लिहून दिल्ही. नंतर बायका बसल्या होत्या त्या सुटोन घरास आल्या. पठाणाचे दोन प्यादे आले होते. त्यांणीं दोघां ब्राह्मणास घेऊन कायगांवीं गेले, च्यार ब्राह्मण व आमची मातुश्री यांस आणि आमचे दोनी वाडे लुटून खणून चीजवस्त घरांतील घेऊन गेले.