पत्रांक ५७८
श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ११
स्वामीचे सेवेसीं: सेवक धोंडो बाजीराव कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना, येथून फौज लासुरावर पठाणाचे फौजेवर जाऊन लढाई घेतली. तोफा वगैरे हस्तगत जाहल्या. खासा पठाण व मान्या शेंदोनसें लोकांनिशीं लासुरास गेला आहे. गांवचा आसरा करून जीव लपविला. आपले कृपेंकरून प्रहरादोनप्रहरांत तोही हस्तगत होईलसे दिसतें. ईश्वरस्त्रस्थळीचे आशीर्वादें फत्ते जाहली. आपणास कळावें, म्हणोन विनंती लिहिली आहे. आगाऊ ऐवजाविशीं विनंती पत्र लिहिलें आहे. तरी, या प्रसंगास तूर्त दोन हजार रुा पाठऊन द्यावे. येणेंकडून स्वामींचा लौकीक होऊन मलबादादा यांजवर बहुत कृपा केलीशी होईल. आणि उपकाराचा अर्थ बहुत दिवस आठव आहे. वाणीयास ताकीद करून जिन्नस रवाना करून द्यावा. भरंवसा जाणून विनंतिपत्र लिहिलें आहे. तरी, अगत्यरूप ऐवजाची सरबराई करावी. येवेळ अनमान करूं नये, अणमान केलियास तुह्मांस श्रीची शपत असे. शेपत घालून लिा म्हणोन रागास न यावें, जरूर जाणून विनंती शेपतपुरस्कर लिा आहे. शेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)