पत्रांक ५७३
श्री.
१७२४ वैशाख.
विशेष. राजश्री येशवंतराव होळकर याजकडील फौजा या प्रांतीं येतात. याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण भयभीत जाले. परंतु सर्व ब्राह्मणांची काळजी आपणासच, याजमुळें येविशींचा बंदोबस्त जालाच आहे. येणेंकरून रा फत्तेसिंगराव माने व नबाब अमीरुद्दौलाबहादर यांणीं उपसर्ग दिल्हा नाही. परंतु अमीरुद्दौला यांचे ठाणें के।। बीड किनगांव वगैरे पौ। पैठण येथें आहेत. ते तेथून का सातारेंनजीक औरंगाबाद येथें स्वारासमागमें ठाणेदार चिठीपाली जे, नबाव यांनीं आह्यांस वरात कायगांवसातारे हरदू गांवावर दिल्ही आहे. त्यास, कमरखुलाई वगैरे रु। ६०० देऊन वरातीचे जावसालास येणें. याप्रों चिठी घेऊन स्वार
साता-यास गेले. त्यांनी तेथें उपद्रव विशेष दिल्हा. याच अन्वयें चिठी मी।। मारीं कायगांवीं आली. क्षेत्रास उपसर्ग होऊं नये, याप्रों आज्ञा निक्षुन आहे. असें उभयतां सरदार यांचेंहि सांगणें पडलें. परंतु या संस्थानाकडे का। सातारे पार मार व पा गांडापूर पा। कायगांव व कांठेपिंपळगांव व पो। नेमके पौ। मौजे जलकें ऐसें च्यार गांव सरकारांतून सदावर्ताचें बेगमीस देणें आहे. यास्तव, सदरहू च्यारी गांव व व्यस्थळी क्षेत्रास उपसर्ग हरएकविषयीं देऊं नये. याप्रों माने व अमीरुद्दौला यांस पत्रें असावीं. या अन्वयें सख्त आज्ञा आहेच. परंतु पत्रें असल्यास विशेष बचाव होईल. संस्थानाचा अभिमान सर्वोपरी आपणासच, त्याअर्थी विशेष लिहावेसें नाहीं.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)