Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ६१४

श्री.
१७२४ पौष वद्य ७

राजश्री बाबूराव आंगरे वजारतमाब सवाईसरखेल गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। बाजीराव रघुनाथ आशीर्वाद विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष, राजश्री खंडो मुकुंद सरकारांतून बडोद्यास जात आहेत. त्यास मारनिल्हे तुमच्या तालुक्यांत आल्यावर यांजसमागमें लोक पंचवीस देऊन कल्याणास पोंहचवून द्यावें. रा छ १९ रजब, सु। सलास मयातैन व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

पत्रांक ६१३

श्रीलक्ष्मीकांत.
१७२४ कार्तिक शुद्ध ११

राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंति उपरी येथील कुंशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुमचे नातवास देवआज्ञा जाली, हें वर्तमान सरकारांत ऐकून चित्तास फारच वाईट वाटलें, तुझांस तो महत दुःख जालें. ही ईश्वरीइच्छा. ल्याची सत्ता बलोत्तर ! यास कोणाचा उपाय नाहीं. तो जसें ठेवील तसें राहणें प्राप्त. त्याजला मुख्य विवेकच प्राधान्य.........तुह्मी सारे गोष्टीस समजता...............तुह्मांस कोण्ही सांगावें ?.........करून शांतवण करावें. येविशीं सरकारांतून ल्याहावें ऐसें नाहीं. रा। छ ९ माहे रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

पत्रांक ६१२

श्री.
१७२४ कार्तिक शुद्ध ९

राजश्री नारायण राव गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाबूराव आंगरे वजारतमाब सवाईसरखेल रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष, राजश्री येशवंतराव होळकर यांसी लढाई जाल्याचा मजकूर परस्परें तुह्मांस समजलाच असेल. फौजेंतील सरदार उपाय नाहीं तेव्हां निघाले. नंतर आह्मीं पांच चार स्वारानसीं निघोन छ ३ मीरहूस जजीरे कुलाबा येथें येऊन दाखल जालों, राजश्री राऊ पंडितप्रधान घाटं उतरून कोंकणांत आले. समागमें तुह्मी आहां ह्मणोन समजल्यावरून, येथून राजश्री दिनकर नारायण याची रवानगी केली आहे. येऊन तुह्मांजवळ बोलतील. राजश्री राऊपंडित यांसी विनंति करून, पुढें कर्तव्य असेल तसें लिहिण्यांत यावें. सरकारचाकरीस सिद्धच असों. रा छ ७ माहे. रजब, बहुत काय लिहिणे? लोभ कीजे हे विनंति. मोर्तबसुद. ( शिक्का, )

पत्रांक ६११

श्री.
१७२४ कार्तिक शुद्ध १

राजश्री नारायण रावजी वैद्य स्वामीचे सेवेसी:-

पो सदाशीव रंगनाथ वानवळे सां। नमस्कार विनंति येथील कुशल, ता। का शु। १ बुधवार मुा। चिखलगांव, नजिक किल्ला रोहिडा, येथें स्वस्तक्षेम असों विशेष. गांवांतून स्वारी निघाली तें समईं घरीं भोजन करीत होतों. नंतर निघोन स्वारी टेंकडीवर होती तेथें आलों. नमस्कार करून पाठीमार्गे टेकडीखालें उभा होतों. तेथें गडबड जाली. सा।, मागें अंबराईंत आलों. तेथें उभा होतों. तों तेथें रा। श्रीपतराव मैराळ व राजश्री दाजीबा आले. त्यांणीं सांगितलें, येथें उभें राहूं नये, मागें गर्दी जाली. मी श्रीमंताजवळ होतों. स्वारी तेथून निघाली. कोणाकडे गेले हें समजलें नाहीं. तुह्मी येथें उभे राहूं नका, आमचे बराबर चला. ते व मी दोन कोस बराबर होतों. पुढें त्यांची आमची चूक पडली. आह्मीं सोमवारीं रात्रीं तोरणा किल्यानजिक किल्यांत राहिलों. तेथून दुसरे दिवशीं आंबवड नागनाथाचे येथें आलों. तेथून आज बुधवारीं मु। मारीं येऊन, एका ब्राह्मणाचे घरीं राहून, श्रीमंत यजमान साहेबांस विनंति लिहिली व आपल्यास हें पत्र लिहिलें आहे. तर, स्वारी कोठें आहे हें कळावें, म्हणजे सेवेसीं येऊन पोहोंचतों. वेळेस तेथें गडबडीमुळें स्वारी अंतरली. त्याणें अशा फे-यांत पडलों. जवळ पाणी पिण्यास पात्र देखील नाहीं, अशी अवस्ता आहे. तर, देखतपत्र उत्तर यावें, जेथें आपण व श्रीमंत माहाराज यजमान साहेब असतील, तेथें येतों. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ६१०

श्री शंकर, १७२४
आश्विन-कार्तिक

श्रीमदगुरुवर्य राजमान्य राजश्री दीक्षितबावा वडिलांचे सेवेसी:-

विद्यार्थी रावजी खमलाखर कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी. आपण कृपा करून आशीर्वाद पत्र पों तें पावलें. सैन्याचे, पठाणाचें वर्तमान तरः या प्रांतीं संवत्सरवारी पो रोखे खंडणी घेतली. करंजगांव सायखेडें करून, येथें ब्राह्मणांची विपत्ती फार केली. नायगांवीं मुकाम आहे, असें ऐकितों. येथें तो मान्याचें ठाणेंच आहे. इकडे येत नाहीं. कोल्हारचें वर्तमान कांहीं समजलें नाहीं. आज्ञेप्रमाणें आल्यागेल्याबा। वर्तमान लिहित जाईन. येथील वर्तमान तरः पूर्वी आबांचे पत्रीं लिाच होतें. त्यावरून समजलेंच असेल, बहुत काय लिहिणें? हे विज्ञापना. इ.

पत्रांक ६०९

श्री.
१७२४ आश्विन

भाई नाना दिक्षितः-

पंडत साहेब बिसियार मेहेरबान अजतरफ महमदशाहखां सलाम नियाज़ आके तुह्मी खातरजमेने येथें येणें. तुमचे व आमचे मध्यें कुरान व गंगाजी आहे. कोनेहि विशई दगाफटका होणार नाही. व जे रुा। आमचे बाकी राहिले, त्याचा बंदोबस्त करून पाठविणें. व तुह्मी जरूर जरूर येथें येणें. मागती औरंगाबादेस जाणें असलें तर जावें. खातरजमेनें यावें. कांहीं वसवास न करावा. व ज्या वेळेपासोन हें लष्कर येथें आलें किती बंदोबस्त घराचा व गांवचा करारवाकी लोक वे कोनीहि तुमचे असबावास हात लावित नाहीं. मा। ऐवज बाकीचा द्यावा. नाहींतर मुखत्यार आहांत, तुह्मी येथें आले, म्हणजे ऐवज तनखाचा आमचा वसूल होईल तो घेऊं, व पेहेरे वगैरे अवघे उठून घेऊन जाऊ, व पुढेंहि मानसें रखवालीस गांवच्या ठेऊ, व हरएकाची खातरजमा करुन देऊं. व अगर तुह्मी हाजर न व्हाल व रुा। न पाठवाल, तर तुमचा अंमल गांवांत बसणार नाहीं व आतां ज्या पैस्याचा करार लक्ष्मण बापू याणें केला तो पैसा आह्मी घेऊं कळावें हे किताबत.

[ ६७ ]                                            श्री.                                    १४ ऑक्टोबर १७१०

छ मा। अनाम देशमुख व देशकुलकर्णी का। ठाण सुभा प्रा। पनाळे यांसीः-
रामचंद्र नीलकंठ अमात्य हुकमतपन्हा सु।। इहिदे अशर मया अलफ वेदमुर्ती राजश्री बाळंभट बिन विश्वनाथभट, जोतिषी उपनांव वडणगेकर, सूत्र आश्वलायन, गोत्र गार्ग्य, हालीं वास्तव्य कसबे कोल्हापूर हे बहुत थोर, योग्य, शिष्ट, जोतिष विद्येंत निपुण, सिद्धांतावगत आहेत जोशी यासा कुडालकर सावंत याणें राजश्री छत्रपती स्वामीच्यापासी दुर्बुद्धि धरून दुष्टाचरण आरंभिलें होतें त्यास नतिज्या पावायानिमित्य आंगेज केला ते प्रसगीं याणीं मुहूर्त पाहोन दिला त्या मुहूर्ते वाडीवरी चालोन घेऊन वाडी घेतलीं. फत्ते झाली. यास्तव यावरी संतोषी होऊन यास नूतन इनाम कार्यात मा।र पेll विसी पांडाच्या बिधियानें अव्वल तुमसीम तिन्ही प्रतीची जमीन चावर एक बितपशीलः- 

मौजे वडणग अर्धा चावर ०ll०
मौजे भुये तीस बिघे ०l०
मौजे निगवे तीस बिघे ०l०

येणेप्रमाणे एक चालू सदर्हूप्रमाणें जमीन दिली आहे यापो। एक तक्षिमा किर्दी व तीन तक्षिमा पडी, कुलबाब, कुलकानू, हालीपट्टी, व पेस्तरपट्टी सहित खेरीज हकदार इनामदार करून, दिल्ही असे तरी सदर्हू जागा मोजून चतु सीमा करून देऊन यास व याचे पुत्रपौत्रीं वंशपरंपरेस उत्तरोत्तर चालवीत जाणें नव्या पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तालीक लिहून असलपत्र परतून भोगवाटियास वे ll जवळ देणे सदर्हू जागा इनाम देविली आहे ये विषयी अलाहिदा देशाधिकारी याच्या नावे सादर आहे त्याप्रमाणें ते दुमाले करून देऊन चालवितील. जाणिजे छ २ रमजान. निदेश समक्ष.

                                                                                                              बार.

पत्रांक ६०८

श्री.
१७२४ आश्विन

यादी रामचंद्र दीक्षित व लक्ष्मण नारायण दीक्षित कायगांवकर यांचा फडव्या निज्याम व नवाजजंग यांजकडून होणेः-

१ कायगांवीं पठाणांची फौज येऊन गांवांतील ब्राह्मण धरून मारहाण करून पस्तीस हजार रुपये खंड ठराऊन निकड मांडिली. गांवकरी यांणीं गांवांत पट्टी करून पंचेवीस हजार रु। दिल्हे. दाहांस जागा नाहीं. सबब दोघे ब्राह्मण पठाणाकडील दोन माणसें समागमें घेऊन आवरंगाबादेस आले. ब्राह्मणांचें वर्तमान ऐकून विचार केला कीं, इतःपर जो पैसा देणें तो मातबर मध्यस्तीच्या विद्यमाने देऊन, घरें, वाडे जगऊन पुढें उपद्रव लागूं नये. या भावीं सुभे यासीं बोलावें. ऐसी योजना करीत असतां, इतक्यांत सुभ्याकडील पांत्तपंनास जमाव येऊन घरावर दंगा करूं लागले. दरवाजे बंद करून, सुभे याजकडे बोलावयास ग्रहस्त पाठविले. तेव्हां, सुभे यांणीं सांगितलें कीं पांच हजार रु। ऐन व एक हजार दरबारखर्च, एकूण साहा हजार रुा द्यावे. पठाणाचें कूच करीवतों, ब्राह्मण त्याणें धरले आहेत ते आणून आवरंगाबादेस तुमचे हवालीं करतों. याप्नों बोलणें नेमांत येत आहेच, तों तेच समई इकडे वाडियावर सुभेयाची जमीयत आली होती त्यांनी बायका बाहेर काढून चावडीपुढून लष्करचे बाजारात गेल्या. हें वर्तमान आनंदराव निा। लक्ष्मणराव पेषकर यांजला समजलें. त्यांणीं सुभे यासीं बोलून बायका सोडऊन आणवून घरीं पाठविल्या, सुभे यांणी साहा हजार रुाचा दस्तऐवज लिहून घेतला. त्यांत लिहून दिल्हें आहे, बशर्थ बंदोबस्त कायगांवचा. तें पत्र पाहिलें असतां मारि ध्यानास येईल, अस्तु ! सुभे यांजकडून पठाणाचा बंदोबस्त कांही एक जाला नाही. आह्मीं सुभ्याच्या भरोंसियावर बेफिकीर बसलों, तिकडे पठाणांनी वाडे लुटोन, लाखों रुपयांची चीजवस्त नेली. ब्राह्मण व मातुश्रीबाईस धरून घेऊन गेले. बाईपाशीं कांहीं नाहीं समजोन, ब्राणह्मस. हित बाईस पठाणांनी सोडलें. इकडे सुरतवाले यांणीं जमीयत पाठऊन सातारियास वाडे लुटून चीजवस्त गाड्या भरून पैठणदरवाज्यानें शहरांत आणिल्या. तिकडे बाई लष्करांतून येतांना सुरतवाले यांचे वकिलांनी अडविलें कीं, तुमचे सुटकेनिमत्य पठाणांसीं एकवीस हजारांचा करार करून हवाल्यांत आलों ते द्यावे. ऐसी निकड करून एकवीस हजार रुपयांचा दस्तऐवज करून घेतला आहे. याप्रमाणें वर्तमान आहे. त्या प्रकरणीं त्याजकडून फडच्या व्हावा.
१ साहा हजारांचा दस्तऐवज माघारा यावा.
१ एकवीस हजारांचा दस्तऐवज माघारा यावा.
* +++ चीजबस्त कुल माघारी यावी.
------

१ डुकरखोरा पहाड सातारियाचे राणांत आहे. तेथें आमचा रमणा आहे. येविशीं सरकारची सनद असतां, हालीं औरंगाबादेकडील आहे, ह्मणून आपण घेतात. आह्मांस गवत घेऊं देत नाहीं. त्याविशीं ताकीद होऊन पूर्ववतप्रमाणें चालावें.

पत्रांक ६०७

श्री.
१७२४ आश्विन वद्य २

विज्ञापना ऐसीजे, राजश्री व्येंकटराव यांची भेट जाहाली. तिकडीलइडील सर्व भाव समजलें, श्रीमंताच्या चिठ्या चहूंकडे जातात. दाहा पांच जण मध्यस्त पडले आहेत. एवंच अद्याप जें आहे तेंच आहे. रा। बाजीराव बरवे व पाराजीपंत यांणीं मोठे प्रातःकाळीं होळकराकडे जावें आणि खातरजमा करून घ्यावी, ऐसें श्रीमंतांचे विचारें ठरलें. तेव्हां पाराजीपंतांनीं याजकडे सांगून पा कीं, याप्नों तेथून चिठ्या आल्या, आतां माझा उपाय नाहीं, तुमचा गृहस्थ गेला त्याचें उत्तर कळावें, प्रहर दिवसपर्यंत वाट पाहतों. त्याजवरून राहिले आहेत. त्यास, अझूनहि पहिलेसारखी व्यवस्था जाली म्हणजे कोणतेहि घडत नाहीं. मातबर मध्यस्ताचे हातें समेट जाहल्यास फार उपयोग. दादा ! काय कोठवर ल्याहावें ? नगरावर फौज रवाना होणार. होळकरानें हा कालमर्याद श्रीमंताचे पायासीं अमर्यादा केली नाहीं. जेव्हां अंबा-या दृष्टीस पडल्या तेव्हां घोड्याखालीं उतरून नमस्कार केला. फौजेस ताकीद केली कीं, कोणी श्रीमंताचे फौजेकडे जाऊं नये. मीं आपलें तोंडास काळें लाऊन घेणार नाही., माझा अव्हेरच केला तर मी लाच्यार आहे वगैरे बोलणीं व चाली पत्रांत कोठवर लिहूं ? सारांष, समेट करून घ्यावी, हे सलाह पक्षपात कोणाचाही करू नये. दौलतीवर लक्ष, ज्या गोष्टीनें दौलतीचें कल्याण. सर्व प्रजा आशीर्वाद देईल. समेट करून घेतली असतां, श्रीमंतांची चाकरी होळकर करून दाखवील, ऐसें आहे. गणोबा अद्याप आला नाहीं. वाट पाहतात. राघोपंत रात्रीं पावला, वेंकटराव यांणीं चिठी वडिलांस लिहिली आहे, त्याजवरून कळेल. ज्यास्थळीं आहां तेथून अन्यत्र स्थळीं जावयाचा विचार मसलतगार यांचे विचारें दिसतो. त्यास असें जाहलें म्हणजे सर्वहि गोष्टी बिघडल्या. पक्केंपणें मनांत यावें. मग कोणाच्यानेंच कोणताच विचार घडावयाचा नाहीं. इतके दिवस मसलतगारांनी मसलत दिल्ही. त्यांतून हे निघाले. पुढें अणीक असें घडल्यास ईश्वरेच्छा म्हणावी. मग मनुष्याचा उपाय राहिला. पुढें कोणास आपण दोष ठेऊं म्हटल्यास, दोष. घेणार नाहीं. इतःपर मर्जी. कालचे चिठीचें व या चिठीचें उत्तर मनन होऊन लवकर यावें, अज्ञानपणें माझें लिहिणें पडत असलें, तर विचार करून विनंति करावी. रा। बुधवार, प्रातःकाळ, प्रहर दिवस हे विज्ञापना. इ. इ.

 

पत्रांक ६०६

श्री.
१७२४ आश्विन वय २

राजश्री नारायणराव गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाबूराव आंगरे वजारतमाब सवाई सरखेल रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें, विशेष, तुह्मीं पत्र राजश्री ज्यगंनाथपंत यांजबराबर छ ५ राखरचें पाठविलें तें छ १३ जमादिलोखरीं पावलें, गांव व मडीविसीं मार लिहिला त्यावरून व राजश्री बळवंतराव नेने यांणीं पत्र पाठविलें त्यावरून, कळों आला. ऐशास तुम्हांकडून बहुत दिवस पत्रें येऊन कांहींच मजकूर समजल्यांत नव्हता. त्यास हाल्लीं मारनिल्हेनीं मुखोत्तर सांगितलें, त्यावरून अवगत जालें, ऐसेंच हमेषा पत्र पाठऊन आनंदवीत असावें. गांव व मडीविसी लिहिल्यांत, त्यांस तुमच्या स्नेहापुरता दुसरा अर्थ काय आहे ? घडोन येईल. वरकड मार मशारनिल्हे लिहितील त्यावरून कळेल. रा छ १५ माहे। जमादिलोखर बहुत काय लिहिणें ? लाभ कीजे. हे विनंति. श्री मोर्तबसुद.

श्री ९ राजा शाहु नरपती चरणीं सादर येसाजीसुत बाबूराव आंगरे वजारतमाब सवाई सरखेल निरंतर.