पत्रांक ५८८
श्री.
१७२४ श्रावण शुद्ध २
श्रीमंत सौभाग्यवती वज्रचुडेमंडित मातुश्री चिटकाबाई बया यांसीः-
प्रति भास्कर विठ्ठल पटवर्धन सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। श्रावण शुद्ध २ मंदवार पावेतों मुा काळसूर वर्तमान यथास्थित असे. विशेष. मान्ये यांचा रोखा कान्हुरावर होऊन वीस हजारांचा खंड जाला. त्याचे वसुलास स्वार आले ते वाड्यांत राहून दंगा बहुत केला आहे. तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? ऐवजाचा भरणा होत नाहीं. पुढें काय होईल तें तें पाहावें. आपणाकडून सावजी गायकवाड आला. त्याणें आपल्याकडील सविस्तर...प्रसूत होऊन कन्या जाली, पंधरावीस दिवस जाहले, पठाणाचा मुकाम कापशी वडगांववर होता, तेथून स्वार रोखा घेऊन कायगांवीं आले आहेत म्हणोन सांगितलें. त्याजवर कांहीं समजत नाहीं. यामुळें चिंता बहुत लागली आहे. याजकरितां घमाजी ठवळे मुजरत पा। आहे. तरी कायगांवास कांहीं उपद्रव लागला किंवा निवारण जालें, येविशीं सविस्तर लिहून पाठवावें. आपण सध्याकाळी कोठें आहेत तेंही ल्याहावे. खांसा होळकर चाडवडास दाखल जाले, व पठाणही पैठणाकडे जाणार, म्हणोन इकडे वर्तमान ऐकण्यांत आहे. मान्ये यांणीं खंडण्या घेतल्या, त्या गांवापासून फिरोन पठाणाच्या खंडण्या होतात किंवा कसें आहे, हें सविस्तर लिहून पाठवावें, यजमान स्वामी उभयतां मुलांमाणसांसुद्धां पुण्यास सुखरूप आहेत. +++ हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)