पत्रांक ५८२
अलीफ.
१७२४ आषाढ शुद्ध १२
साहेब मेहेरबान दोस्तां बापूराव सलामहू.
अजतर्फ सैद जाफरअलीखां बाहादुर बादजसलाम आंकी येथील खैरयत जाणोन तुम्हीं आपली खयरखुषी कलमी करून दिल आराम करीत जावें, दिगर मजकूर, बादमुदत खत पाठविलें तें नेकशायेत पोहोंचून कमालखुषी हांसल जाली, खतांत मजकूर कीं येशवंतराव होळकर यांजकडील फौजा घाट चढोन मीरखां पठाण वगैरे आले म्हणोन वर्तमान ऐकिलें. त्यावरून आपल्यास लिहिलें असे. तरी मीरखां कोठें मुकाम करून आहेत, व जावयाचा रोख कोण्हीकडे आहे, फौज व पेंढार वगैरे जमाव किती असे, म्हणोन लिहिले, ऐसीयास, खास होळकर तर नंदुरबार, सुलतानपुरावर आहेत. मीरखां पठाण नागडे वल्हेगांवचे दरम्यान मुकाम आहे. फौजहि आठ दाहा हजार, हिंदुस्थानी जावयाचे बेत दोन आहेत. एकतर आंबाडाकडे जावें; एक गंगा उतरून पार व्हावें, येणेंप्रो।. मग पहावें, कोण्हीकडे जातात. शाहमतखां सिंद्रवर आहेत. नाशिकास खंडचा रोखा आहे. मान्याचें वर्तमान आपणास समजलेच असतील. तुम्हीं आपलें वर्तमान हरवख्त कलमी करीत जावें. रा। छ ११ माहे रबिलाखर, ज्यादासें लि। प्यार मोहबत असो दीजे हे किताबत.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)