[ ७३ ] श्री. १ सप्टेंबर १७१५.
˜ °
श्रीरामचरण
नीलकंठ सोनदेव
शरण.
राजश्री यादोजी पडवळ नामजाद व कारकून, किले गगनगड गोसावी यासीः- अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री रामचद्र नीलकंठ आशिर्वाद व नमस्कार सु ।। सित अशैरन मया अलफ मा। कान्होजीराऊ व बापूजीराऊ राणे हे अजिरे प्रांती होते त्यांस पूर्वी पत्रे तुह्मी पाठविलीं होती व हुजरूनही पाठविलीं होती त्यास, यांणी किल्ल्याचे गावी व वरकड गावीं उपद्रव केला होता याकरितां सकोच धरीत होते व चांदजीने यास बुद्धि देऊन नेले. त्यावरी वतनी प्रसग आहे तो अवघियानीं विभागे घ्यावा. तोही होऊन न ये याकरितां बाहेर राहिले त्यास सोंप्रत दहावर येऊन निष्ठेनें वर्तावें ह्मणून चित्तीं धरून विनंतीपत्र पाठविलें त्यावरी सर्व अन्याय क्षमा करून अभयपत्र पाठविलें. त्यावरून भूधरगडचे मुकामीं भेटीस आले भेटी जालीं राजदर्शन केले. त्यास रत्नगिरीहून लोकांविशीं लिहिलें. त्यावरून कान्होजीराव खासा व उभयताचे लोक पंचवीस रवाना केलें. ते स्वार होऊन गेले. त्यास, यांचा सरंजाम याप्रो। लोक असे. त्याप्रमाणें गाणें चालवणें.-
मौजे सागुलवाडी मोकासा जमावास खारापाटण तर्फेचे गोविंद टिपसोडी व
उभयतांच्या दिली. राजपत्र सादर आहे. घाट बावडा येथें चोरघे आहे त्यास
तु्ह्मीं याकडे चालवणें तेथें उपद्रव चांदजीच खातो. हे ते चुलत भाऊ. तक्षिम
किरकोळ यास एकंदर लागो न देणें. १ देत नाहीं. याकरितां याणीं विनंति केली
जमीन इनाम पेशजी देविली होती कीं, निमे, त्याचें निमे आपलें उभयतांचें
ते चालत नाहीं ह्मणोन विनंति केली. वतन आहे तें चालवावें. त्यावरून
त्यास, तूर्त रत्नागिरीस रवाना केले. आज्ञापत्र सादर केलें आहे. तरी याचे
ह्मणोन मेहेरबान होऊन इनाम जमीन भात विभाग असतील त्याप्रमाणें तुह्मीं गावगन्ना
पडिपैकीं देविली, बिघे : - व जकात्यास सागोन देवणें. चांदजीराव५ नांदवडे. इस्किल करील तर त्यासही माकुल करून
५ नांदणे. सांगणें. हर्शामर्श याचा त्याचा वाढो न
२ सेरपे देणें. १
-------१२
हें तुह्मीं नेमून देऊन बिलाकुसूर चालवणें.
याप्रमाणे बिलाकुसूर चालवणें तूर्त कबिले पाउसाचे आणितां नयेत. याकरितां राहिले पुढें कबिले घेऊन येतील. आपल्या वतनावरी राहतील तुह्मीं सर्वाविशीं यांचें चालवीत जाणें छ २४ रमजान बहुत काय लिहिणे.
लेखनसीमा
समुल्लसति
सुर सुद