लेखांक ८७ १५६९ आश्विन शुध्द ७
(फारसी मजकूर)
कौलुनामे अज दिवाण पा। वाई ताहा विठोजी बिन + सु + मजी पाटणा पा। मजकूरु सु॥सन समान अर्बैन अलफ कारणे दिल्हा कौलुनामा ऐसा जे तुझा दाईज सीवाजी बिन आकोजी पाटणा येउनु उभा राहिला जे विठोजी आपली पाटणेपणाची निमे तकसीम जोरी करून खातो आपणासी देत नाही ऐसे बोलिला मग देसाई व देसकुलकर्णी व सेटिये माहाजन पचनगर बैसोन मुनसफी पाहाता थोर थोर कतखुदा लोक बोलिले जे सिवाजीचा चुलता कमाजी व जाखोजी तकसीम खात होता पुढे दिवाणीचे नफर मजकुरावरी बाकी होती याबदल परागदा होउनु गेले ते बाकी विठोजीपासी दिवाणे घेतलि त्यातागाईत विठोजी सारी तकसीम खात होता हाली सिवाजी मजकूर उभा राहिला त्याचे तिसरी तकसीम त्यासी फिटते मग सदरहू पचनगराचे गोहीसाक्षीवरून सिवाजीचे तिसरी तकसीम सिवाजीचे दुबाला केली तुझे दोनी तकसीम तुझे दुबाला करून सेरणी देणे ह्मणउनु लाविले मग तुझे बाबे दताजी गगाजी देसाई पा। मजकूरु इलतमेसी केले जे साहेबी गोतपती न्याय करून हर जो जणाचे बरहक मुनशफी करून सिवाजी मजकूराचे तकसीम एकी त्याचे दुबाला केले ते त्याणे खाउनु असावे व विठोजी मजकुराचे दुबाले दोनी तकसीमा करून दिवाणनफराई करावी त्यासी दिवाणामधे यावया समध नाही ऐसी मुनशफी करून शीरणी देणे ह्मणउनु लाविले तरी नफर मजकुरु गैरमवसरदार मवसर हाल पाहून सीरणी बाधलिया नफर मजकूरु उसूल करून जगला जाईल व दिवाण नफराई करील बराय मालुमाती दखई खातिरेसी आणुउनु सेरणी बाधले होनु ३०b तीस हे बेरीज उसूल करून देउनु दिवाण नफराई करून तुवा आपलिया दोनी तकसीमा खाउनु सुखे असणे सिवाजी मजकुरु आपली एक तकसीम खाउनु जगत सालाबाद जैसे देत होता तैसे देउनु असेल तुझे दिवाणकारबारात दखल होवया निस्बती नाही तुवा कोणेबाबे शक अदेशा न करणे कौलु आहे
तेरीख ५ माहे रमजान