[ ११७ ] श्री. १७३०.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य यासीः -
प्रति सौभाग्यादि संपन्न उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें यानंतर तुह्मी पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाला. आह्मा बंधु ह्मणविलें त्याचा अभिमान धरून उर्जित करावे ह्मणून कितेक तपशिलें लिहिलें व स्वमुखें रा शिवाजी मल्हार याणीं मुखवचनें अर्थ निवेदन केला. ऐशास, तुह्मीं पुरातन राज्याची सरक्षणे करून यशें विशेषात्कारें संपादिलीं. त्यांतून विशेष सेवा करून दाखवून मजुरा करून घ्याल हा पूर्ण निशा आहे बंधु ह्मणविलें त्याचाही सार्थ अभिमान आह्मांस आहे कोणेविशीं अतराय होणार नाही. अमाधान असो देणें वरकड सविस्तर मानिल्हे यास आज्ञा केली आहे हे मुखवचनें सांगतां कळों येईल. जाणिजे छ. ५ रमजान . बहुत लिहिणें तर सुज्ञ असा.