[ ११५ ] श्री. १७३०.
राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं नारायण हरकारा यासमागमें विनंति सागोन पाठविली याप्रमाणें विदित करितां श्रुत झाली. ऐशास, स्वामीस तुह्मापेक्षां दुसरे अधिकोत्तर कांहीं आहे ऐसे नाहीं तुह्मी चाकरी करावी आणि दिवसेंदिवस उर्जित करून चालवावें हेंच अवश्यक आहे. तुह्मांस पेशजी क्रिया दिली तेच आहे दुसरें काही नाही रा गोपाळ रामभाऊ याचा प्रसग सागोन पाठविला तर उत्तम ते धण्याचे चाकर. त्यांचें चालवावें हें आवश्यक येविशी ता । मल्हारजी सांगता कळेल याउपरि येथील प्रसगास तुह्मीं चित्तांत सशय मानावा ऐसे नाहीं स्वामीचे आगमन बहुतां दिवशीं झालें, दर्शनास येऊन संतोषी करणे येविशीं स्वमुखे मल्हारजीस आज्ञा केली असे. नारायणास सत्वरीच पाठवितो. सुज्ञ असा.